budget 2025 : शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; KCC कर्ज मर्यादा वाढणार.

budget 2025 : पी एम किसान योजने नंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC). किसान क्रेडिट कार्ड योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज वितरण केले जाते. या कर्जाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय सरकार येत्या अर्थसंकल्पामध्ये घेणार असल्याची माहिती आहे.

देशात मोदी सरकार 3.0 स्थापन झाले आहे. या सरकार कडून शेतकऱ्यांना काही तरी खास मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु सध्या तरी शेतकऱ्यांसाठी फक्त किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याची तयारी सरकार करत असल्याची माहिती मिळत आहे. अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्ड ची नवीन मर्यादा किती असणार या बद्दलची सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
budget 2025


नव्या वर्षातील केंद्र सरकारचा अर्थसंकल्प येत्या फेब्रुवारी महिन्यात सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही विशेष घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये मुख्यतः देशातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्जाची मर्यादा वाढवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. अर्थसंकल्प 2025 मध्ये शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपाया वरून पाच लाख रुपये करण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे.

budget 2025 का वाढवली जाणार मर्यादा

देशातील शेतकऱ्यांना शेती उत्पन्न मिळवण्यासाठी पैशाची गरज भासते. शेतकऱ्यांना विविध शेती खर्चासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता लागू नये म्हणून अल्पशा व्याज दरामध्ये शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा केंद्र सरकारने केली आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत तीन लाख रुपयापर्यंत कर्ज वितरित करण्याची मर्यादा ठेवण्यात आली होती. आता शेतीचा वाढता उत्पादन खर्च पाहता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याची तयारी करत आहे.

budget 2025 शेती उत्पादन खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. रासायनिक खते बी बियाणे आणि मंजूर यांचे दर वाढत आहेत. वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादन खर्च देखील वाढवावा लागत आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा वाढवत आहे.

किसान क्रेडिट कार्डची संख्या

budget 2025 देशातील शेतकऱ्यांना एकूण 167.53 लाख किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आले आहे. त्या कार्डची मर्यादा 1.73 लाख कोटी रुपये इतकी आहे. आता या कर्ज मर्यादेत वाढ करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यानसोबतच दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना 11.24 लाख किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आले आहेत. त्या कार्ड ची मर्यादा 453.71 कोटी रुपये एवढी आहे. 65 हजार किसान क्रेडिट कार्ड मच्छिमारांना देखील वाटप करण्यात आले होते याची मर्यादा 341 कोटी रुपये ठेवण्यात आली होती.

1 thought on “budget 2025 : शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; KCC कर्ज मर्यादा वाढणार.”

Leave a comment

Close Visit Batmya360