मनोधैर्य योजना manodhairya yojana maharashtra

मनोधैर्य योजना manodhairya yojana maharashtra

आज आपण केंद्र सरकारच्या व महाराष्ट्र शासनाच्या एकत्रिकरणाने सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजना manodhairya yojana maharashtra
बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

मनोधैर्य योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने बलात्कार, बलात्का वरील लैंगिक अत्याचार तसेच ऑसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्या आणि पुनर्वसनासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेची घोषणा राज्य सरकारने दिनांक 2 ऑक्टोबर 2013 पासून मनोधैर्य योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता अर्ज प्रक्रिया

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

मनोधैर्य योजना manodhairya yojana maharashtra

लेक लाडकी योजना अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे

मनोधैर्य योजना manodhairya yojana maharashtra  योजनेअंतर्गत अशा महिलांना व बालकांना पुनर्वसन करण्यासाठी किमान 2 लाख ते 10 लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे . तसेच निवारा, समुपमदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे जेणेकरून त्या महिलांना व बालकांना अशा परिस्थितीमध्ये अनेक संकटांना सामोरे जाण्याची गरज पडणार नाही या उद्देशाने सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे.

हे पण वाचा:
PM Vishvakarma Yojana PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!

बलात्कार, बलात्कार वरील लैंगिक अत्याचार, ऑसिड हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराला गंभीर शिक्षा देणे आवश्यक आहे पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे या गुन्ह्यातील पीडित महिला व बालकांना  एवढ्या मोठ्या संकटातून  सावरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या योजनेअंतर्गत बलात्कार व बलात्कार वरील लैंगिक अत्याचार  प्रकरणी किमान दोन लाख रुपये आणि 10 लाख रुपये पर्यंत मदत दिली जाणार आहे तसेच या योजनेअंतर्गत  ऑसीड  हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकांस त्यांचा चेहरा विद्रुप झाल्यास किंवा कायमचे  अपंगत्व असल्यास तीन लाख रुपये आणि ऑसिड हल्ल्यात इतर जखमा झालेल्या महिला व बालकांना 50 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे .

असिड हल्ल्यात झालेल्या महिला व बालविकास यांना पन्नास हजार रुपये इतकी अर्थ आर्थिक मदत दिली जाणार आहे.

हे पण वाचा:
Kisan Mandhan Kisan Mandhan: सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार दरमहा 3,000 रुपये पेन्शन, वर्षाला 36,000 रुपयांचा लाभ! लगेच करा अर्ज

राज्यातील बलात्कार आणि ऍसिड हल्ल्यातील पीडित महिला व बालके  यांना या मोठ्या संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे हा मनोधैर्य योजनेचा मुख्य उद्देश आहे.

योजनेचे नावमनोधैर्य योजना manodhairya yojana maharashtra
राज्य, महाराष्ट्रमहाराष्ट्र
उद्देश पीडित महिला व बालकांना मानसिक  अपघातातून सावरणे
लाभ पुनर्वसन करण्यासाठी दहा लाख  आर्थिक मदत
विभाग महिला व बालविकास विभाग
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन/ ऑनलाईन

मनोधैर्य योजनेचे उद्दिष्टे

  •  या योजनेअंतर्गत अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित महिला व बालकांना आर्थिक मदत करणे.
  •  या योजनेचे असे उद्देश आहे की अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांना व बालकांना आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणे
  •  या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार व बलात्कार आणि ऍसिड हल्ला, यासारख्या गंभीर घटकांना बळी पडलेल्या महिला व बालकांना आर्थिक मदत करणे आणि योग्य ते उपचार सेवा उपलब्ध करून देणे असे या योजनेचे उद्देश आहे.
  •  बलात्कार वरील लैंगिक अत्याचार, यासारख्या गंभीर आजाराला बळी पडलेल्या महिला आणि बालकांना या योजनेअंतर्गत त्यांच्या वारसदारांना गरजेनुसार निवारा ,  समुदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर प्रक्रिया, शिक्षण  व्यवसायिक व प्रशिक्षण, यासारखा मोठा आधार त्यांना उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहेत.
  •  या राज्यातील महिला आणि मुलावरील हिंसाचाराच्या मुद्द्याबद्दल  जागरूकता वाढवणे हे या मनोधैर्य योजनेचे उद्देश आहे.

मनोधैर्य योजनेचे वैशिष्ट्ये

  • केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या एकत्रीकरणांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाद्वारे मनोधैर्य योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  •  या योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख ही महाराष्ट्र शासनाच्या राज्य महिला आरोग्याच्या देखरेखी खाली केली जाते.
  •  या योजनेची तरतूद 50% केंद्र सरकारची व 50 % राज्य सरकारची आहे.
  •  मनोधैर्य योजनेची तरतूद ही महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेली आहे.
  •  या योजनेअंतर्गत पीडित महिला आणि बालकांची ओळख गुप्त ठेवण्यात येईल.
  •  ही योजना पीडित महिला व बालकांसाठी 2023 -24 योजना ही लैंगिक अत्याचार झालेल्या महिला आणि बालकांना पुन्हा आत्मविश्वास मिळवण्यासाठी आणि सन्मान जीवन जगण्यासाठी सक्षम करते.

मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी आर्थिक सहाय्य

  •  या योजनेअंतर्गत पीडित महिला व बालकांसाठी बलात्कार व बालका वरील लैंगिक अत्याचार झालेल्या प्रकरणी किमान दोन लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येते.
  •  मनोधैर्य योजनेअंतर्गत ऍसिड सारख्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या  व चेहरा विद्रूप  झाल्यास किंवा कायमचे अपंग असल्यास या योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांची मदत दिली जाते.
  •  या योजनेअंतर्गत गंभीर व क्रूर बलात्काराची घटना असेल तर पीडित महिलांना व लहान बालकांना या स्थितीमध्ये त्यांच्या वारसदारांना तीन लाख रुपये इतकी मदत देण्यात येईल.
  •  बलात्कार, लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ला, पीडित महिला व  बालकांना वैद्यकीय उपचार आणि प्रवास व इतर खर्च साठी प्रत्येकी प्रकरणात 50 हजार रुपये पर्यंत या योजनेअंतर्गत मदत उपलब्ध करून दिली जाते.

मनोधैर्य योजना manodhairya yojana maharashtra पात्रता

  •  मनोधैर्य योजनेचा लाभ हा पीडित महिला व बालकांना दिला जातो. पण ते या महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असायला हवेत.

मनोधैर्य योजना नियम व अटी

  •  महाराष्ट्र राज्यातील पीडित महिला व बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  •  राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत पीडित महिला व बालकांस मदत देण्यात येईल त्यामुळे ग्रह व विभागाच्या किंवा अन्य विभागाच्या योजनांमध्ये सदर पीडितांना मदत देण्यात येणार नाही.
  • पीडित महिला व बालक अज्ञान असेल तर त्यांच्या बाबतीत पालकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या नावाने बँक खाते उघडण्यात यावे.

मनोधैर्य योजना अर्ज करण्याची पद्धत

या योजनेचा अर्ज हा ऑफलाइन /ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने केला जाऊ शकतो.

ऑनलाईन पद्धत

हे पण वाचा:
PM Viksit Bharat Yojana PM Viksit Bharat Yojana :पंतप्रधान मोदींनी दिली तरुणांना खास भेट; पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15000 रुपये मिळणार
  • पीडित अर्जदार व्यक्तीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम या राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  •  या वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया करून घ्यावी लागेल.
  •  रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर Username आणि password मिळेल त्यामध्ये तुम्हाला login करायचे आहे.
  •  त्यानंतर तुम्हाला मनोधैर्य योजना या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  •  आता पुढे विचारलेली सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायची आहे आणि लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  •  अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी  ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ऑफलाइन पद्धत

  •  पीडित अर्जदार व्यक्तीला आपल्या जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागात जाऊन मनोधैर्य योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  •  या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून आवश्यक ते कागदपत्रे जोडावीत आणि तो अर्ज विभागात जमा करावा.
  •  त्या विभागाद्वारे तुमच्या अर्जाच्या आणि कागदपत्राचे तपासणी केली जाईल व त्यानंतर तुम्हाला लाभाचे वितरण केले जाईल
  •  अशाप्रकारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

विचारले जाणारे प्रश्न

  1. मनोधैर्य योजना manodhairya yojana maharashtra म्हणजे काय?
  • राज्यातील बलात्कार, बलात्कार वरील लैंगिक  अत्याचार तसेच ॲसिड हल्ला यासारखे घटकांना बळी पडलेल्या महिला व बालकांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे मनोबल व त्यांना पुन्हा समाजात चांगल्या पद्धतीने स्थान मिळवून देणे.
  1. मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित महिलांना लाभ किती दिला जातो ?
  •   मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित महिला व बालकांनात्यांना बलात्कार आणि ॲसिड हल्ल्यातील पीडित 1 लाख मदत.
  • लैंगिक अत्याचार आणि ऍसिड हल्ल्यातील पीडित महिला व बालकांना₹50 हजार रुपये मदत
  •  गंभीर प्रकारामध्ये,₹10 लाख पर्यंत मदत उपलब्ध.
  1. मनोधैर्य योजनेअंतर्गत वैद्यकीय मदत?
  •  मनोधैर्य योजनेअंतर्गत विमल्य वैद्यकीय तपासणी आणि उपचार व मानसिक आरोग्य समुपदेशन आणि समर्थन.
  1. कायदेशीर मदत?
  • पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यास मदत केली जाईल आणि खटल्यात विनामूल्य कायदेशीर साहाय्य.
  1. मनोधैर्य योजनेअंतर्गत पुनर्वसन सुविधा?
  •  मनोधैर्य योजनेअंतर्गत निवारा सुविधा व शिक्षण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगाराच्या संधी.
  1. मनोधैर्य योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
  • मनोधैर्य योजनेसाठी अर्ज महिला व बालविकास विभागात जाऊन अर्ज करू शकतात तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

मनोधैर्य योजना अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मनोधैर्य योजना PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हे पण वाचा:
Shetkari loan apply Shetkari loan apply :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ₹5 लाखांपर्यंत कर्ज कोणत्याही हमीशिवाय उपलब्ध, जाणून घ्या कसे मिळेल

निष्कर्ष

या योजनेमध्ये पीडित महिला व बालकांसाठी मनोधैर्य  या योजने संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणी पीडित व्यक्ती असेल तर त्यांना या योजनेची माहिती द्या या योजनेचा लाभ त्या व्यक्तीला मिळेल.

जर योजने संबंधित काही प्रश्न किंवा काही अडचणी असल्यास आम्हाला कमेंट किंवा ईमेलद्वारे नक्कीच कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू

धन्यवाद!

हे पण वाचा:
Kisan Credit Card Update Kisan Credit Card Update: शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! किसान क्रेडिट कार्डवर आता ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध

Leave a comment