manrega new update : रोजगार हमीच्या मजुरीत वाढ! किती मिळेल रोजगार?…

manrega new update केंद्र सरकार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला काही नियमावली जाहीर करत असतात. आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून आवश्यक असणाऱ्या काही नवीन नियमावली घोषित करण्यात येते. यातच एक एप्रिल म्हणजे आर्थिक वर्षाची सुरुवात. यावर केंद्र शासनाने देशातील रोजगार हमी योजनेतील कामगारांना रोजगार वाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन निर्णयानुसार देशातील कामगारांना किती रोजगार मिळणार व रोजगारांमध्ये किती रुपयांची वाढ करण्यात आली याची सविस्तर माहिती पाहूया.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
manrega new update

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच mgnrega अंतर्गत काम करणाऱ्या देशातील मजुरांना एक एप्रिल 2025 पासून मधुरी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन निर्णयानुसार राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतर्गत काम करणाऱ्या मजुरांना 15 रुपये प्रतिदिन या प्रमाणात रोजगार वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील मजुरांना प्रत्येक दिवशी 312 रुपये एवढा रोजगार दिला जाणार आहे.

इतर राज्यातील मजुरीत केली वाढ manrega new update

केंद्र सरकारच्या या रोजगार वाढीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातीलच नाही तर इतर राज्यातील देखील रोजगार दर वाढवण्यात आले आहेत. या नवीन नियमानुसार सर्वाधिक रोजगार हरियाणा राज्यातील मजुरांना मिळणार आहे. हरियाणा राज्यातील मजुरांना प्रतिदिन चारशे रुपये रोजगार वितरित केला जाणार आहे. तर देशातील सर्वात कमी रोजगार हा अरुणाचल प्रदेश आणि नागालँड मध्ये वितरित केला जातो. अरुणाचल प्रदेश आणि नागालँड मध्ये प्रति दिवस 241 रुपये या प्रमाणात मजुरी दर ठरवण्यात आले आहेत.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नवीन नियमावलीनुसार विविध राज्यामध्ये मजूरदारांमध्ये तफावत आढळून येते. यामध्ये हरियाणा राज्यात 400 रुपये प्रतिदिन मजुरी दर वितरित करण्यात येणार आहे. त्या पाठोपाठ गोव्यामध्ये 378 रुपये प्रतिदिन रोजगार वितरित केला जाणार आहे. कर्नाटक राज्यामध्ये 370 रुपये प्रति दिवस या प्रमाणात रोजगार व्यतिरिक्त केला जाणार आहे. तसेच केरळमध्ये 369 एवढा रोजगार वितरित केला जाणार आहे. बिहारमध्ये 255 रुपये प्रतिदिन, आसाम राज्यामध्ये 256 रुपये प्रतिदिन, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये 261 रुपये प्रतिदिन, जम्मू कश्मीर आणि मेघालय मध्ये 272 रुपये प्रतिदिन, तर अरुणाचल प्रदेश आणि नागालँड मध्ये सर्वात कमी मजुरी म्हणजे 241 रुपये प्रति दिन देण्याचे शासनाने जाहीर केले आहे.

मजुरी वाढ करण्याचा अधिकार केंद्राला

महात्मा गांधी रोजगार हमी योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते. या योजनेचा मजुरीदर ठरवण्याचा अधिकार देखील केंद्र सरकारला आहे. या अनुषंगानेच केंद्र शासनाने नवीन रोजगार दर निश्चित केले आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजना ग्रामीण भागातील व गरीब व्यक्तींना रोजगार निर्मिती देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. या योजनेचे अंतर्गत ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील नागरिकांना वर्षातील ठराविक दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी दिली जाते.

रोजगार हमी योजना या कामांचा असतो समावेश

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना काम देण्यासाठी काही प्रमुख कामांचा समावेश करण्यात येत आहे. या प्रमुख कामांमध्ये सिंचन विहीर फळबाग लागवड शेततळे घरकुल गाय गोटा शेळीपालन गोठा, बांध बंदिस्त, पांदण रस्ते,तसेच इतर शेतीपूरक कामांचा समावेश केला जातो. या कामाच्या माध्यमातून जॉब कार्ड धारकांना रोजगाराची संधी देऊन हे काम पूर्ण केले जाते.

अजूनही रोजगार कमीच..

देशातील महागाईचा विचार करता मिळालेली मजुरी दरवाढ अध्याप देखील समाधानकारक असून येत नाही. सध्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून मिळणारी मजुरी ही इतर शेती काम करणाऱ्या मजुरांपेक्षा कमीच आहे. यामुळेच अनेक मजुरांना रोजगार हमी योजनेतून मिळणारा रोजगार कमीच मिळत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा वाढलेला दर पाहता मिळणारा रोजगार हा कमी स्वरूपाचा असून मजुरांना अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. यामुळे रोजगार हमी योजनेतील मजुरांना आणखी मोठ्या प्रमाणावर रोजगार दर मिळावा अशी अपेक्षा मजुरांकडून व्यक्त केली जात आहे.

1 thought on “manrega new update : रोजगार हमीच्या मजुरीत वाढ! किती मिळेल रोजगार?…”

Leave a comment

Close Visit Batmya360