Namo Shetkari Status : राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते वितरित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये या प्रमाणात या योजनेचा लाभ केला जातो.
राज्यातील 93.26 लाख शेतकऱ्यांना अनेक एक दिवसापासून या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती आणि अखेर राज्य सरकारने 29 मार्च रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी सुरुवात केली आहे .

राज्यातील 93.26 लाख शेतकऱ्यांना 2,169 कोटी निधी वितरित
नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या राज्यातील 93.26 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने नमो शेतकरी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याची रक्कम ₹ 2,169 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 31 मार्च 2025 पूर्वी जमा करण्यात येणार आहे अशी घोषणा सरकारने केली आहे . Namo Shetkari Status
हे वाचा : सातबारावर चूक आहे अशी करा दुरुस्त.. ऑनलाईन पद्धतीने…
लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळणार DBT अंतर्गत
राज्य सरकारने प्रत्येक योजनेमध्ये सुटसुटीत पणा आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत लाभितरित करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 6 व्या हप्त्याची वितरण हे डीबीटी अंतर्गत केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधार सलग्न असणाऱ्या बँक खात्यात या हप्त्याचे रक्कम जमा करण्यात येणार आहे . या योजनेचा सव्वा हप्ता 29 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 पर्यंत वितरित करण्यात येणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला का नाही? असा तपासा मोबाईल वर
शेतकऱ्यांना तुमचा हप्ता जमा झाला की नाही, हे आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सहज घरबसल्या तपासून शकता येते. त्यासाठी खालील पद्धत वापरावी.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये https://nsmny.mahait.org ही लिंक ओपन करावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला लाल रंगातील Beneficiary Status (लाभार्थी स्थिती) या बटनावर क्लिक करावे लागेल. Namo Shetkari Status
- त्यानंतर तुम्ही तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून घ्या.
- मोबाईल नंबर टाकल्यानंतर दिलेला कॅप्चा कोड योग्य प्रकारे भरून घ्यावा लागेल .
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक 6 अंकी OTP (वन- टाइम -पासवर्ड) तो टाका .
- Get Data (गेट डेटा) या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती स्क्रीनवर दिसेल.
- यामध्ये तुम्हाला तुमचा कोणता हप्ता कोणत्या तारखेला कोणत्या बँकेत जमा झाला आहे, स्पष्ट पाहता येईल.
- अशा पद्धतीने तुम्ही तुमचा नमो शेतकरी योजनेचे स्टेटस घरबसल्या मोबाईलवर पाहू शकतात. Namo Shetkari Status
राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार
राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मदत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी स्थिर उत्पन्नाचा आधार मिळतो. राज्य सरकारने या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना वेळेवर पैसे जमा करण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या योजनेचे पात्र असणारे लाभार्थी विंचित राहणार नाही याची खात्री दिली आहे. जर तुमचा हप्ता जमा झाला नसेल, तर तुम्ही संबंधित बँक किंवा सरकारी अधिकाऱ्यांची लवकरात लवकर संपर्क साधावा. Namo Shetkari Status