ready reckoner rate : मागील तीन वर्षांमध्ये राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने रेडीरेकनर दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली नव्हती. आता महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने रेडी रेकनर दरामध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिनांक एक एप्रिल 2025 पासून रेडी रेकनर दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन निर्णयाच्या माध्यमातून निर्णय दरामध्ये राज्यात 4.39 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही नवीन वाढ शहरी भागासाठी 5.95% तर ग्रामीण भागासाठी 3.36% या प्रमाणात करण्यात आले आहे.

कोरोना सारख्या मोठ्या महामारीने मालमत्ता बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता. बाजारपेठेवर निर्माण झालेल्या या परिणामामुळे रेडीरेकनर दरामध्ये कोणतेही फेररचना करण्यात आलेली नव्हती. सध्या राज्याची आर्थिक स्थिती डगमगलेली असताना सरकारकडे जास्तीत जास्त पैसा कसा उपलब्ध करता येईल यासाठी शासनाचे विविध विभाग कार्य करत आहेत. यातच शासनाचा महत्त्वपूर्ण विभाग मुद्रांक आणि शुल्क या विभागाने देखील आपल्या महसुली आकड्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन रेडी रेकनर दराच्या वाढीमुळे आता मालमत्तेच्या दरामध्ये देखील वाढ होणार आहे. या वाढीचा नवीन जागा किंवा घर खरेदी दारावर अधिक खर्चाचा बोजा पडणार आहे. यामुळे नवीन घर खरेदी किंवा जागा खरेदी देखील महाग होणार आहे.
कोणत्या ठिकाणी कीती रेडिरेकनर दर ठरवण्यात आला
मुद्रांक आणि शुल्क विभागाने जाहीर केलेल्या नवीन रेडी रेकनर दरानुसार: पुणे शहरासाठी 4.16, पिंपरी चिंचवड साठी 6.69, ठाणे 7.72, कल्याण डोंबिवली ५.८४, नवी मुंबईसाठी 6.75, उल्हासनगर साठी 9, वसई विरार 4.50, पनवेल 4.97, सांगली आणि मिरज 5.70, कोल्हापूर 5.1, इचलकरंजी 4.46, सोलापूर साठी 10.17, नाशिक 7.31, छत्रपती संभाजीनगर 3.53, नागपूर 4.23, अहिल्यानगर 4.41, धुळे 5.7, मालेगाव ४.८८, नागपूर एन एम आर डी ए 6.60, अमरावती 8.3, अकोला 7.39, लातूर 4.1, परभणी 3.71 याप्रमाणे नवीन दर ठरवण्यात आले आहेत.
राज्यातील वाढलेल्या रेडीरेकनर दरानुसार राज्यामध्ये सरासरी 4.39 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये 5.95% ची वाढ करण्यात आली. संपूर्ण राज्याची एकूण 3.89 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. ग्रामीण भागासाठी 3.36% प्रभावी क्षेत्रासाठी 3.29% आणि नगरपरिषद पंचायत क्षेत्रासाठी 4.97% या प्रमाणात दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.
नविन दरांचा वाढीचा परिणाम (ready reckoner rate)
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रा विभागाने घेतलेले या निर्णयानुसार राज्यामध्ये रेडिरेकनर दरामध्ये सरासरी 4.39% ची वाढ करण्यात आली आहे. या नवीन दर वाढीचा परिणाम पुढील नवीन घर खरेदी किंवा जागा खरेदी करणाऱ्या नागरिकावर पडणार आहे. यामुळे राज्यातील मालमत्तेचे दर वाढतील. नवीन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना अधिकचा शुल्क भरावा लागणार आहे. नागरिकावर जरी अधिकचा भार पडणार असला तरी राज्य शासनाला या माध्यमातून मोठा आर्थिक फायदा निर्माण होणार आहे. अधिकचा शुल्क आकारल्याने राज्याच्या तिजोरीमध्ये देखील अधिक महसूल जमा होणार आहे.