mcoca kayda in marathi : 9 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला. या प्रकरणात नऊ आरोपी असून, त्यापैकी एक आरोपी अजूनही फरार आहे. तपासादरम्यान समोर आले आहे की, हा खून खंडणीच्या वादातून झाला असून, ( Santosh Deshmukh Murder Case ) पोलिसांचा संशय आहे की, यात संघटित गुन्हेगारीचा सहभाग आहे. या संशयाच्या आधारे पोलिसांनी कोर्टातही संघटित गुन्हेगारीचा उल्लेख केला आहे.

मुख्यमंत्र्यांची भूमिका
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान या प्रकरणातील आरोपींवर (mcoca kayda in marathi) मोक्का लावण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या पोलिस या दिशेने तपास करत आहेत.
बीड मधील संतोष देखमुख हत्या प्रकरणी मोक्का लावणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या नंतर मोक्का कायदा नेमका काय यात कोणती शिक्षा होते या बद्दल अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. आज आपण mcoca kayda in marathi मोक्का कायदा नेमका काय आहे यातून काय शिक्षा दिली जाते. तसेच मोक्का लावल्यावर कोणत्या पद्धतीने तपासणी केली जाते कोण कोणाला गुन्हेगार ठरवले जाते या बद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
हे वाचा : काळजी घ्यावी पण घाबरून जाण्याची गरज नाही, आरोग्य विभागाने केल्या सूचना जाहीर.
मोक्का कायदा काय आहे?
मोक्का म्हणजे “महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा”असं या कायद्याचं नाव आहे . हा कायदा महाराष्ट्र सरकारने 1999 मध्ये लागू केला. या कायद्याचा उद्देश संघटित गुन्हेगारीला आळा घालणे आणि समाजात सुरक्षितता निर्माण करणे हा आहे. खंडणी, सुपारी देणे, हप्ते वसुली, तस्करी आणि इतर संघटित गुन्हेगारी प्रकार रोखण्यासाठी मोक्का कायदा प्रभावी मानला जातो.
mcoca kayda in marathi मोक्का कधी लागू होतो?
मोक्का कायदा तेव्हाच लागू होतो जेव्हा गुन्हा संघटित स्वरूपात केला जातो. त्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक असते:
- गुन्हा करणारी टोळी दोन किंवा अधिक लोकांची असावी.
- टोळीतील सदस्यांवर मागील दहा वर्षांत किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असावे.
- या गुन्ह्यांचे आरोपपत्र कोर्टात सादर झालेले असावे.
याशिवाय, खंडणी वसूल करणे, आर्थिक फसवणूक करणे, सुपारी घेऊन खून करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मोक्का कायदा लागू केला जातो. मोक्का कायदा लागू झाल्यानंतर पोलिसांना कोर्टामध्ये आरोप पत्र सादर करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. पोलिसांना आरोप पत्र सादर करण्यासाठी कमीत कमी सहा महिन्याचा कालावधी मिळतो. शिवाय या गुन्हे मध्ये शक्यतो जामीन मिळत नाही त्यामुळे आरोपी वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात.
शिक्षेची तरतूद कशी आहे?
- मोक्का कायद्यानुसार आरोपींना जामीन मिळणे फार कठीण असते.
- आरोपींना पाच वर्षाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.
- मोक्का कायद्यामध्ये पाच वर्षे ते जन्मठेप अशी शिक्षा आहे.
- त्याबरोबरच पाच लाख रुपया पर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
- आरोपीच्या मालमत्ता जप्तीची कारवाई मोक्का कायद्याअंतर्गत होते.
- मोक्का कायद्याअंतर्गत भारतीय दंड साहित्याच्या कलमाखाली ज्या शिक्षेची तरतूद असेल ती शिक्षा लागू होते
मोक्काच्या अंमलबजावणीची तयारी
संतोष देशमुख प्रकरणात आरोपींवर मोक्का कायद्याचा आरोप ठेवण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा देऊन समाजात सुरक्षिततेचा संदेश देणे ही यामागील प्रमुख भूमिका आहे.
मोक्का कायद्यामुळे संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का बसतो आणि समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला रोखण्याचे महत्त्वाचे साधन ठरते. त्यामुळे हा कायदा गुन्हेगारी नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.(mcoca kayda in marathi )