दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, प्रति लिटर पाच रुपये अनुदान
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्य सरकारने सर्व खाजगी व सरकारी दूध संघांना शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या अगोदर सहा महिन्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दुधाचे भाव कमी झाले होते प्रति लिटर 25 रुपये पर्यंत पडझड झाली होती. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांचा सरकारने विचार केला आणि सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात गाईच्या दुधावर प्रति लिटर पाच रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. या योजनेची अनुदान ही सरकारकडून एक जुलैपासून दिले जाणार आहे. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर दुधाप्रमाणे पाच रुपये अनुदान जमा करण्यात येणार आहेत. हे अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या साह्याने जमा केले जाणार आहे. परंतु या अनुदानाकरिता गाईला एअर टॅग करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नाही तर सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित राहणार आहेत.
याच लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नाव
- आधार कार्ड
- बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे असे बँकेचे नाव
- खाते क्रमांक.
- आय एफ एस सी कोड
- बँक पासबुक झेरॉक्स.
- दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पशुधनाची संख्या
- एअर टॅग
- एअर टॅग क्रमांक
एअर टॅग म्हणजे काय
दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान
एअर टॅग म्हणजे गाईचा आधार क्रमांक होय. दूध उत्पादक शेतकऱ्यांना याची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची आहे. एअर टॅग क्रमांक मध्ये गाईची जात, गाईच्या मालकाचे नाव व मोबाईल नंबर, टॅग नोंद करताना चे वय ही सर्व माहिती दिलेली असते. हा एअर टॅग गाईच्या कानाला लावलेला असतो.
एअर टॅगमुळे गाईची ओळख पटवणे अत्यंत सोपे जाते.
हा एअर टॅग नंबर काढण्यासाठी जवळच्या गावाला जवळील सरकारी किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क करू शकता आणि त्यानंतर उपलब्ध टॅगनुसार तुमच्या गाईंना देण्यात येईल आणि यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही.
दूध अनुदान 2024
दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान
या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली सर्व कागदपत्राची पूर्तता करून दूध संकलन केंद्र चालकास जमा करायचे आहेत. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय देण्यात येणार नाही.
अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घेणे गरजेचे असणार आहे.
महत्त्वाची सूचना
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ज्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे त्या बँक पासबुकची झेरॉक्स द्यायची आहे आणि या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान