mjpsky list महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना, शेतकऱ्यांच्या खात्यावर 46.70 कोटी जमा

mjpsky list महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना : राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील 11,836 शेतकऱ्यांच्या खात्यावर 46 कोटी 70 लाख रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील 105 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना mjpsky list ही राज्य शासनाच्या वतीने राज्यात राबविण्यात आलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची नियमित कर्जफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर लाभ दिला जातो. ज्या शेतकऱ्यांनी मागच्या महिन्यामध्ये आधारित प्रमाणिकरण केले, अशा 11,836 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 46.70 कोटी रुपये शासनाच्या वतीने जमा करण्यात आले आहेत.

mjpsky list महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभापासून वंचित

mjpsky list महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पिक कर्जाची नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपयांचा लाभ दिला जातो. परंतु या प्रोत्साहन पर लाभ योजनेअंतर्गत 33 हजार 356 शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात आधार प्रमाणीकरण केली नसल्याचे असे शासनाच्या निदर्शनास आले होते. यामुळे अशा शेतकऱ्यांना या 50 हजार रुपये प्रोत्साहन पर लाभ मिळाला नव्हता. म्हणून अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणिकरण करण्यासाठी 12 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत संधी दिलेली होती. या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण केले आहे. 11,836 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 46 कोटी 70 लाख रुपये प्रोत्साहनपर लाभाची रक्कम 1 ऑक्टोंबर रोजी वितरित करण्यात आली आहे.

हे वाचा : सोयाबीन मूग उडीद हमीभावाने होणार खरेदी

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मयात शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणारा लाभ

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे शेतकरी आपले आधार प्रमाणीकरण करण्या अगोदरच मयत झाले, अशा शेतकऱ्यांच्या वारसदारांची नावे या योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रोसेस सुरू आहे. या प्रोसेस नंतर आधार प्रमाणीकरण करून लवकरात लवकर या योजनेचा लाभ देण्याची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे येथील सरकार आयुक्त व निबंधक सरकारी संस्था कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आत्तापर्यंत साडेचौदा लाख शेतकऱ्यांना लाभ

farmer waver राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये mjpsky list 2017 – 18 , 2018 – 19 , 2019 – 20 या तीन वर्षांमध्ये कोणत्या पण दोन वर्षात बँकेकडून पीक कर्जाची उचल घेऊन नियमित पणे परतफेड केलेली आहे, अशा 14 लाख 50 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत 5310 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यात मध्ये किती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला लाभ

  • जिल्हा – शेतकरी – लाभाची रक्कम (रु.लाखांत)
  • ठाणे – 14 – 6.56
  • पालघर – 10 – 3.93
  • रत्नागिरी – 503 – 133.00
  • रायगड – 106 – 42.92
  • सिंधुदुर्ग – 162 – 57.86
  • नाशिक – 713 – 354.00
  • धुळे – 140 – 68.00
  • नंदू बार – 138 – 68.00
  • जळगाव – 729 – 307.00
  • अहमदनगर – 573 – 263.00
  • पुणे – 454 – 213.00
  • सोलापूर – 309 – 151.00
  • कोल्हापूर – 338 – 143.00
  • सांगली – 256 – 117.00
  • सातारा – 424 – 162.00
  • छत्रपती संभाजीनगर – 535 – 175.00
  • जालना – 351 – 79.00
  • परभणी – 118 – 33.00
  • हिंगोली – 105 – 25.00
  • लातूर – 549 – 155.00
  • धाराशिव – 582 – 104.00
  • बीड – 256 – 93.00
  • नांदेड – 458 – 148.00
  • अमरावती – 553 – 262.00
  • अकोला – 374 – 172.00
  • वाशिम – 184 – 83.47
  • बुलढाणा – 183 – 86.00
  • नागपूर – 482 – 229.00
  • वर्धा – 380 – 186.00
  • चंद्रपूर – 415 – 167.00
  • भंडारा – 243 – 94.00
  • गडचिरोली – 123 – 48.00
  • गोंदिया – 247 – 88.00

farmer wave कर्ज माफी लाभ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे.

कर्जमाफी farmer wave हे एक महत्त्वाचे आर्थिक साधन आहे जे शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी महत्वाचे आहे. भारतातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सहसा अस्थिर असते, त्यामुळे त्यांना अनेकवेळा कर्ज घ्यावे लागते. पण कर्ज फेडता न येण्याच्या ताणामुळे त्यांना आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कर्जमाफीचा कार्यक्रम त्यांना काही महत्त्वाचे फायदे देतो.

1. आर्थिक दिलासा

farmer wave कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या भांडवलातून मुक्ती मिळते,  त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा, कौटुंबिक खर्च आणि शेतीच्या कामांसाठी अधिक संसाधने वापरता येतात. आर्थिक ताण कमी झाल्याने त्यांना अधिक आरामदायी जीवन #NAME शकते.

2.उत्पादनात वाढ

कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात नवीन तंत्रज्ञान,  बियाणे आणि यंत्रसामुग्रीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते, ज्यामुळे उत्पादन वाढू शकते. उत्पादन खर्च कमी असल्याने शेतकऱ्यांकडे नफा कमावण्याची साधने अधिक आहेत.

3. मानसिक आरोग्य

कर्जामुळे येणारा ताण कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मानसिक आरोग्य सुधारते. आर्थिक ताणामुळे चिंता आणि दबाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यात सकारात्मक बदल होतो.

4. सामाजिक स्थितीत सुधारणा

कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होते. एकदा आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले की त्यांना समाजात अधिक मानाचे स्थान मिळू शकते. यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या जीवनात सकारात्मक फरक पडतो.

5. कृषी विकास

शेतकऱ्यांना कर्ज फेडण्याची चिंता नसल्याने  ते नवीन तंत्राचा अवलंब करण्यास, विविध पिकांची लागवड करून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करण्यास तयार असतात, ज्यामुळे शेतीच्या वाढीस चालना मिळते आणि स्थानिक बाजारपेठेत अन्नधान्याची उपलब्धता वाढते.

6. अन्न सुरक्षा

कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत अन्नधान्याची उपलब्धता वाढते. यामुळे अन्नसुरक्षा सुनिश्चित होते. देशात अन्नधान्याचे उत्पादन वाढते, त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होतो.

7.सामूहिकता आणि एकात्मतेची भावना

कर्जमाफीमुळे शेतकरी संघटनांमध्ये एकजुटीची भावना निर्माण होते. जेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते, तेव्हा ते संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी लढा देण्यास तयार होतात, ज्यामुळे त्यांची एकतेची ताकत वाढते आणि त्यांच्या आवाजाची ताकद बळकट होते.

8. लहान उद्योग

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे लघु व कुटीर उद्योगांना मोठी चालना मिळते कारण त्यांचे उत्पादन वाढते आणि शेतीतुन निर्माण होणाऱ्या उत्पादनांची विक्री वाढते, त्यामुळे अर्थव्यवस्थेत स्थानिक उद्योगांचे महत्व वाढते.

निष्कर्ष

कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात, त्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो, उत्पादकता वाढू शकते, मानसिक आरोग्य आणि सामाजिक स्थिती वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीचा कार्यक्रम आवश्यक आहे.

2 thoughts on “mjpsky list महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना, शेतकऱ्यांच्या खात्यावर 46.70 कोटी जमा”

Leave a comment