मोफत सौर कृषी पंप योजना ; शेतकऱ्यांना मिळणार मोफत सौर पंप. mofat sour pump

mofat sour pump महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी सौर कृषी पंप योजना चालू केली. सौर ऊर्जेचा वापर करून अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे नियोजन केलं. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात सौर पंप बसवले आहेत. त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज देखील सादर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध होते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होते.

अर्ज प्रक्रिया आणि पेमेंट पर्याय

ज्या शेतकऱ्यांनी महाऊर्जा कडे अर्ज केले होते, त्या शेतकऱ्यांचे अर्ज आता महावितरण कडे पूर्णतः वर्ग करण्यात आलेले आहेत. आता महावितरण च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेल्फ सर्वे व पेमेंट करण्यासाठी पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यानंतर शेतकऱ्यांना आपला सेल्फ सर्वे पूर्ण करून पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पेमेंटची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात हा सौर कृषी पंप पॅनल बसवला जातो.

हे वाचा: मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ; नवीन अर्ज सुरू

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Kanda Anudan  Kanda Anudan :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! 28 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर, तुम्हाला मिळणार का? लगेच पहा

अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना मोफत सौर पंप

राज्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना विशेष तरतुदीसह सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येईल. ज्यामध्ये त्यांना 100 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारे रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील अनुसूचित जाती जमाती मधील शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना आता शंभर टक्के अनुदानावर हा सौर कृषी पंप मिळणार आहे.

mofat sour pump सौर कृषी पंप मुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते

सौर पंपामुळे शेतकऱ्यांना वर्षभर शेतीसाठी लागणारी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढते सौर ऊर्जा पर्यावरण पूरक असल्यामुळे शेतकऱ्यांना तसेच पर्यावरणाला देखील याचा मोठा फायदा पाहायला मिळतो.

त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देण्याची सुविधा बारा महिने उपलब्ध असते. ज्यामुळे शेतकऱ्यांचे शेती उत्पन्न यामध्ये वाढ होते जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती देखील यामुळे सुधारते.

हे पण वाचा:
Protsahan Anudan शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 50 हजार प्रोत्साहन योजना सुरू, पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ.Protsahan Anudan

स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल

याआधी राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करून सर्वसाधारण शेतकऱ्याला 10 टक्के रक्कम आणि अनुसूचित जाती जमाती मधील लाभार्थ्यांना 05 टक्के रक्कम भरणे आवश्यक होतं परंतु आता, अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना पूर्णता म्हणजे शंभर टक्के अनुदानावर हा सौर कृषी पंप खरेदी करण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना आता कसल्याही प्रकारचा शुल्क न भरता त्यांना सौर कृषी पंप मिळणार आहे.

हे पण वाचा:
Crop Insurance Nuksan Bharpai List शेतकऱ्यांना दिलासा! 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, पहा जिल्ह्यांची यादी.Crop Insurance Nuksan Bharpai List

Leave a comment