MPSC तर्फे गट ब, गट क सेवेतील 1813 पदांची मेगा भरती जाहीर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र अराजपत्रित गट – ब आणि गट – क एकत्रित घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या जाहिरातीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले होते. अखेर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एकूण 1813 पदांची नोकरी भरती जाहीर केली. या दोन्ही सेवांसाठी अभ्यासक्रम हा पूर्वीप्रमाणेच असणार असून, गट ब आणि गट क असा सेवानिहाय पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम स्वातंत्रपणे जाहीर करण्यात आलेला आहे.
हे वाचा : ssc मार्फत 39481 जागांची भरती.
एमपीएससीने प्रसिद्धी पत्रकाराद्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क स्वतंत्र पूर्व परीक्षेच्या जाहिराती प्रसिद्ध केले आहेत. गट – ब साठी 480 रिक्त पदांसाठी तर गट-क साठी 1333 रिक्त पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. राज्य शासनाने मेगा भरती जाहीर केल्याने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शासनाने हा निर्णय विधानसभेच्या अगोदर घेतला असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची नाराजी दूर केली आहे.
MPSC द्वारे गट ब पदांची जाहिरात प्रसिद्ध
मागच्या नऊ महिन्यापासून एमपीएससी द्वारे प्रलंबित असणारी गट – ब पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीनुसार
- सहाय्यक कक्ष अधिकारी 55 पदे.
- राज्य कर निरीक्षक- 209 पदे
- पोलीस उपनिरीक्षक – 216 पदे
अशा एकूण 480 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या दरम्यान अर्ज करता येणार आहे. आणि ही परीक्षा 5 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.
एमपीएससी द्वारे गट क पदांची जाहिरात प्रसिद्ध
महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधून 1333 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीनुसार.
- उद्योग निरीक्षक – 29 पदे
- कर सहायक – 482 पदे
- तांत्रिक सहायक – 9 पदे
- लिपिक – 17 पदे
- लिपिक-टंकलेख -786 पदे
अशा एकूण – 1333 रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 14 ऑक्टोंबर ते 4 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहेत. आणि ही परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.
एमपीएससीने स्वातंत्र परीक्षा घेण्याचा निर्णय
एमपीएससी कडून एक ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्धीपत्रकानुसार
या दोन गटांच्या परीक्षेसाठी एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत होती परंतु, परीक्षेच्या निकालप्रक्रियेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी व उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे आणि निकाल प्रक्रियेस होणारा विलंब यामुळे एमपीएससीने ही परीक्षा स्वातंत्र्य घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे.
18 जुलै 2024 रोजी राज्य शासनाने एमपीएससीच्या पक्षी बाहेरील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब (राजपत्रित) गट क संवर्गातील (वाहन चालक वरून) पदे सरळ सेवेने MPSC मार्फत भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. यानुसार शासनाच्या विविध विभागातील गट ब (अराजपत्रित) आणि गट क या सेवेतील विविध पदांची भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत केली जाणार आहे.
या गट ब आणि गट क सेवेतील विविध पदांची वाढवणारी संख्या, त्या अनुषंगाने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत होणारी वाढ, 2023 मधील निकाल प्रक्रियेत तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल प्रकरणे, न्यायालयाचे निर्णय, निकालास होणारा विलंब हे सर्व लक्षात घेऊन आणि गट क या सेवेतील विविध पदांची स्वातंत्र्यपूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार गट ब सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षेच्या परीक्षा योजना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.