msp center state : केंद्र शासनाच्या माध्यमातून 2024-25 सोयाबीन , मुग आणि उडीद या पिकांना हमीभावाने खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. काही दिवसांमध्ये या तीन पिकांची हमीभावाने खरेदी केले जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना नाव नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. केंद्र सरकार सोयाबीन, मुग आणि उडीद या पिकाची हमीभावाने खरेदी करणार आहे. ही खरेदी राज्यामध्ये नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून केली जाणार आहे. तर, यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील केंद्रावरती जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.
सोयाबीन ,मूग आणि उडीद हमीभावाने खरेदी करण्यास सुरुवात
नाफेड आणि एनसीसीएल या दोन एजन्सीच्या माध्यमातून राज्यातील जवळपास 13 लाख मॅट्रिक टन सोयाबीन 17000 मॅट्रिक टन मुग आणि 1 लाख 8 हजार मॅट्रिक टन उडदाची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे.आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सोयाबीन, मुग आणि उडीद खरेदी करण्यासाठी नाफेड आणि एससीसीएफ ने एकूण 210 हमीभाव खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यामध्ये 19 जिल्ह्यात नाफेडचे 19 खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.तर, एनसीसीएफची 7 जिल्ह्यामध्ये 63 खरेदी केंद्रास मंजुरी देण्यात आलेली आहे. तर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुग आणि उडीद हे पिके खरेदी केंद्रावर दिनांक 10 ऑक्टोबर पासून मूग आणि उडीद खरेदी सुरू करण्यात येणार आहे, 15 ऑक्टोंबर पासून सोयाबीन या पिकाची हमीभावाने खरेदी करण्यास सुरुवात होणार आहे.
सोयाबीन, मुग आणि उडीद या पिकाची राज्यात हमीभावाने खरेदी
राज्यामध्ये या दोन योजनेअंतर्गत नाफेड च्या वतीने खरीप हंगामातील किमान आधारभूत किंमत मूग हे पीक 8682, तर उडीद हे पीक 7400 आणि सोयाबीनचे पीक 4892 प्रतिक्विंटल प्रमाणे खरेदी केले जाणार आहे.
हे वाचा : कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
कोणत्या जिल्ह्यांमध्ये नाफेडच्या माध्यमातून किती खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
यामध्ये नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत यामध्ये सर्वात जास्त खरेदी केंद्र हे बीड जिल्ह्यामध्ये आहेत.
- बीड जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्र 16 सुरू करण्यात येणार आहेत
- तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 .
- तर अकोला जिल्ह्यामध्ये 9
- अमरावती जिल्ह्यामध्ये 8
- बुलढाणा जिल्ह्यामध्ये 12
- धुळे जिल्ह्यामध्ये 5 खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
- जळगाव जिल्ह्यामध्ये 14
- जालना जिल्ह्यामध्ये 11
- कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1
- लातूर जिल्ह्यामध्ये 14
- नागपूर जिल्ह्यामध्ये 8
- नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2
- परभणी जिल्ह्यामध्ये 8
- पुणे जिल्ह्यामध्ये 1
- सांगलीमध्ये 2
- आणि सातारा जिल्ह्यामध्ये 1
- वर्धा जिल्ह्यामध्ये 8
- वाशिम जिल्ह्यामध्ये 5
- यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7
अशा एकूण सर्व 19 जिल्ह्यांमध्ये 147 हमीभावाने खरेदी केंद्र हे नाफेडच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत.
msp center state च्या माध्यमातून सुरू केले जाणारे खरेदी केंद्र
एनसीसीएफ च्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सुरू केले जाणारे खरेदी केंद्र..
- नाशिक जिल्ह्यामध्ये 6
- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 7
- सोलापूर जिल्ह्यामध्ये 11
- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये 11
- हिंगोली जिल्ह्यांमध्ये 9
- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 5
- नांदेड जिल्ह्यामध्ये 14
एनसीसीएफ च्या माध्यमातून हमीभावाने खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना या खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी आव्हान केले जात आहे.
msp center state नोंदणी कशी करावी लागेल
या पिकांची नोंद करण्यासाठी जे काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा CSC सेंटर असतील. यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या लिंकच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंदणी केली जाऊ शकते. किंवा या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी केंद्रावर पण शेतकऱ्यांची नोंदणी करून घेतली जाते. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला जवळच्या नाफेड किंवा एनसीसीएफ च्या खरेदी केंद्रावरती ही नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीसाठी शेतकऱ्यांना सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकाची नोंद केली जाणार आहे.
msp center state नोंदणी करण्यासाठी कागदपत्रे
-नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकाची नोंद असलेले सातबारा अवश्य लागणार आहे.
आधार कार्ड
बँक पासबुक
मोबाईल नंबर
नोंदणी केल्यानंतर पुढील प्रोसेस
ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. हा मोबाईल नंबर शेतकऱ्यांना ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी असेल त्या दिवशी त्यांना त्यांच्या मोबाईल नंबर वर कॉल किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. मग शेतकऱ्यांनी त्या तारखे दिवशी आपला शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावरती घेऊन जायचे आहे. मग अशा पद्धतीने नाव नोंदणी केल्यानंतर ही प्रक्रिया पार पडणार आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना हमीभावाने खरेदी केंद्रांना मंजुरी दिलेली आहे. या खरेदी केंद्रावर दिनांक 10 ऑक्टोंबर पासून मूग आणि उडीद तर 15 ऑक्टोंबर पासून सोयाबीन हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी सोयाबीन, मूग आणि उडीद हमीभाव खरेदी केंद्राच्या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आहे.