msp rate rabbi देशाचे प्रंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 16 ऑक्टोबर रोजी केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून गहू, मोहरी सह 6 पिकांच्या हमीभावात msp rate rabbi वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील उत्पादक आणि हरभरा यासारखे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
16 ऑक्टोंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत पोषण तत्त्वांनी संपन्न असा तांदूळ मोफत देण्यात येतो त्यास अजून इतर काही योजना अंतर्गत मुदत जुलै 2024 पासून ते डिसेंबर 2028 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या निर्णय मुळे 80 कोटी पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे.
हे वाचा: पीक विम्याचे हेक्टरी 13700 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
16 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या दृश्य डोळा समोर ठेवून केंद्र सरकारने 6 पिकांच्या हमीभावाच्या रकमेत वाढ केली आहे. msp rate rabbi त्यामध्ये, गव्हाच्या हमीभावात 150 रुपयांची वाढ झाली आहे, तर मोहरीच्या हमीभावात 300 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 16 ऑक्टोंबर रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय त्यादिवशी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे, त्यामुळे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या 6 पिकांच्या हमीभावात वाढ msp rate rabbi
- गहू – 150 रुपयांची वाढ : गहू या पिकासाठी हमीभाव 2 हजार 475 रुपये क्विंटल असणार आहे.
- मोहरीच्या किमतीत- 300 रुपयांची वाढ: मोहरी या पिकाच्या हमीभावात वाढ 5 हजार 950 रुपये क्विंटल हमीभाव असणार आहे.
- जवसाच्या किमतीमध्ये -130 रुपयांची वाढ : जवस या पिकाच्या किमतीमध्ये आता 1 हजार 980 रुपये क्विंटल हमीभाव असणार आहे.
- हरभरा – हरभऱ्याच्या किमतीत 210 रुपयांची वाढ : हरभरा या पिकासाठी आता 5 हजार 650 रुपये क्विंटल हमीभाव असणार आहे.
- मसूर – मसूराच्या किमतीत 275 रुपयांची वाढ : मसुराच्या किमतीमध्ये आता 6 हजार 700 रुपये क्विंटल हमीभाव असणार आहे.
- करडई – करडईच्या किमतीमध्ये 140 रुपयाची वाढ : करडई या पिकासाठी आता 5 हजार 940 रुपये क्विंटल हमीभाव देण्यात येणार आहे.
महागाई भत्त्यात 3% ची वाढ
केंद्र सरकारच्या 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी पण मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या कॅबिनेटची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये DA आणि DR मध्ये 3 टक्के वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. महागाई भत्ता वाढवण्यात आलेला असून तो 1 जुलै 2024 पासून लागू असेल. केंद्राच्या सेवेत 49 लाख कर्मचारी आहेत तर, 60 लाख निवृत्तीवेतनधारक आहेत. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सला लाभ होणार आहे.
मोफत तांदूळ योजना लागू
दरम्यान, गत आठवड्यातील केंद्रीय कॅबिनेट बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पोषणतत्त्वांनी संपन्न असा मोफत तांदूळ देण्याच्या या योजनेला वाढ देण्यात आली आहे. ही वाढ सन 2028 पर्यंत मोफत तांदूळ योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 100 % अर्थसहाय्य करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत देशातील सर्व पात्र रेशन कार्ड धारकांना मोफत तांदूळ दिले जाणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत रेशन कार्डधारकांना दरमहा 5 किलो तांदूळ देण्यात येतो. आता केंद्र सरकारकडून या योजनेसाठी मुदत वाढ देण्यात आलेले आहे.