MSSC Scheme पोस्ट ऑफिसची ही योजना होणार बंद ! आजच खाते उघडा ,31 मार्च शेवटची संधी…

MSSC Scheme : महिला आणि मुलींसाठी राबवण्यात आलेली महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजना लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने 31 मार्च 2023 रोजी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ही योजना राबविण्यात आली होती. ही योजना 2 वर्षासाठी लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे 31 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे. महिला आणि मुलींना योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी फक्त आता 15 दिवस शिल्लक राहिलेले आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSSC Scheme

31 मार्च नंतर बंद होणार?

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट (MSSC) योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी महिला आणि मुलींसाठी फारच कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे . सरकारने अजून या योजनेच्या कालावधीला मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे 31 मार्च 2025 नंतर ही योजना बंद होऊ शकते. मात्र शासनाकडून मुदतवाढ देण्यात येईल का, याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे महिलांनी या संधीचा फायदा घ्यावा.

हे वाचा : उन्हाळा आलाय.. जुन्या व नव्या विहिरीचे काम सुरू करायचे असेल तर जाणून घ्या किती मिळते अनुदान!

महिलांसाठी खूप फायदेशीर योजना

केंद्र सरकारने ही योजना विशेषता: महिला आणि मुलींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी (MSSC Scheme) राबविण्यात आली होती . महिलांना आर्थिक स्थिरता मिळावी आणि बचतीला चालना मिळावी यासाठी सरकारने दोन वर्षाच्या मदतीची ही योजना सुरू केली आहे . महिलांनी या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना आकर्षक परतावा मिळतो

या योजनेअंतर्गत किती व्याजदर दिला जातो

  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना दोन वर्षासाठीची (MSSC Scheme) गुंतवणूक करता येऊ शकते.
  • यावर महिलांना 7.5% वार्षिक व्याज मिळते, जे अनेक बँकांच्या 2 वर्षाच्या एफडीच्या व्याजधरापेक्षा जास्त आहे.
  • ही (MSSC Scheme) योजना सुरक्षित आहे कारण की ती केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आहे.
  • महिलांना पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये सहज खाते उघडता येते

गुंतवणुकीची मर्यादा किती आहे

  • महिला व मुलींना या योजनेत कमीत कमी 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवता येतात.
  • या योजनेत 2 वर्षानंतर संपूर्ण रक्कम आणि व्याज परत दिले जाते.
  • खातेदाराला 1 वर्षानंतर 40% रक्कम काढण्यासाठी परवानगी देण्यात येते.

या योजनेच्या अटी काय आहेत

  • या (MSSC Scheme) योजनेअंतर्गत अशा महिलांना लाभ घेता येणार आहे ज्या महिला भारताच्या रहिवासी आहेत.
  • खातेदाराच्या गंभीर आजारामुळे किंवा मृत्यू झाल्यास खाते मुदती अगोदरच बंद करण्याची परवानगी देण्यात येते.

31 मार्च 2025 पर्यंत करा गुंतवणूक!

शासनाने सध्या तरी या योजनेला मुदतवाढ दिली नसल्यामुळे. 31 मार्च 2025 पर्यंत या योजनेमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. महिलांसाठी ही योजना सुरक्षित योजना आहे आणि या योजनेतून उच्च परतावा देणारा सर्वात चांगला पर्याय आहे .जर तुम्ही आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर, वेळ न घालवता या योजनेमध्ये लवकरात लवकर गुंतवणूक करा आणि भविष्य सुरक्षित करा! MSSC Scheme

Leave a comment

Close Visit Batmya360