Namo Shetkari Update नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात.

Namo Shetkari Update : नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य शासनाने राज्यांमध्ये नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली. योजनेचे अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये आर्थिक निधी वितरित केला जातो. दर चार महिन्याला एक हप्ता या प्रमाणात हा निधी वितरित केला जातो.

यातच शेतकऱ्यांचा डिसेंबर ते मार्च महिन्याचा हप्ता राज्य शासनाकडून वितरित करण्याची प्रक्रिया 26 मार्च 2025 पासून सुरू करण्यात आली होती.राज्य शासनाकडून डीबीटी विभागाला निधी वितरित करून देखील हा हप्ता वितरित करण्यास विलंब करण्यात आला होता. आता नमो (Namo Shetkari Update) शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करतात सुरुवात केलेली आहे.

Namo Shetkari Update

नमो शेतकरी हप्ता वितरणासाठी का झाला विलंब

नमो शेतकरी (Namo Shetkari Update) योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाने 26 मार्च 2025 रोजी निधी मंजूर केला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शेतकऱ्यांना 29 मार्च 2025 रोजी हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी देखील माहिती दिली. तरी देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनाचा हप्ता जमा झाला नाही. याचे कारण म्हणजे मार्च महिन्याचा शेवट.. सर्वच बँकांना आर्थिक वर्षाचा पूर्ण लेखाजोखा हिशोब करणे 31 मार्चपूर्वी आवश्यक असते. या कारणामुळे बँकांकडून हा हप्ता जमा करण्यास विलंब करण्यात आला होता.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : जिवंत सातबारा मोहीम सुरु! असा घ्या लाभ…

सरकारकडून सर्व प्रक्रिया पूर्ण केलेले असताना देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास विलंब करण्यात आला होता. आता ही प्रक्रिया बँकेकडून राबवण्यास सुरुवात केलेली आहे. आज दिनांक 2 एप्रिल 2025 पासून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये सर्वच पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत.Namo Shetkari Update

Leave a comment