Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana राज्यातील या मुलींच्या खात्यात 10 हजार रुपये जमा होणार, श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना आहे तरी काय?

Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : सरकार हे नेहमीच मुलींसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. तसेच राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुपरहिट ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना 1500 रुपये दिले जातात . लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारने यापूर्वीही अनेक योजना राज्यात राबवले आहेत स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत आहे . एका मुलीवरच समाधान मानणाऱ्या पालकांना 50 हजार रुपये अनुदान सरकारकडून देण्यात येत आहे, तसेच त्यानंतर लेक लडकी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वयाच्या 18 वर्षापर्यंत 75.000 हजार रुपयाची मदत सरकारकडून दिली जाते तसेच आता श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे गरजू महिलांसाठी नवीन योजना राबविण्यात येणार आहे .

Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana

नवीन योजनेला न्यास व्यवस्थापन समितीने मान्यता

श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे गरजू महिलांसाठी नवीन योजना राबविण्यात येणार आहे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी (Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana) योजना असे या योजनेचे नाव आहे , या योजनेला न्यास व्यवस्थापन समितीने मान्यता दिली आहे . लवकरच या योजनेचा फायदा गरजू महिलांना होणार आहे

हे वाचा : सरकारची मुलींसाठी खास योजना! मुलीच्या जन्मानंतर मिळणार 50,000 रुपये; पहा सविस्तर माहिती.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

राज्यात लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू होणार आहे . श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनेचा लाभ हा 8 मार्च म्हणजेच (आंतरराष्ट्रीय महिला दिन) रोजी जन्मलेल्या मुलींना दिला जाणार आहे .राज्यातील शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या मुलीच्या नावाने 10 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे .या योजनेअंतर्गत दिली जाणारी ही रक्कम त्यांच्या मातांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे . आठ मार्च रोजी शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या मुलीच्या नावाने दहा हजार रुपये फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे .आणि लवकरच याचा लाभ दिला जाईल .Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana

शासनाच्या मान्यतेनंतर योजनेस सुरुवात

श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी (Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana) योजनेसाठी न्यास समितीकडून या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे .शासनाने मान्यता दिल्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे . शासनाच्या मान्यतेनंतरच या योजनेसाठीचे निकष लवकर जाहीर करण्यात येईल,अशी माहिती श्री सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आली आहे .

सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी दिली माहिती

श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले की, श्री सिद्धिविनायक न्यासाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे . न्यासाचे सर्व विश्वस्त, प्रशासन यांची नियोजनबध्द कार्यपध्दती आणि भाविकांच्या भक्तीमय सहभागामुळे सन 2024-25 या वर्षात न्यासाचे उत्पन्न 114 कोटी इतके अपेक्षित होते पन ते 133 कोटींच्या घरात गेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत न्यासाच्या उत्पन्नात जवळपास 15% नी वाढ झालेली आहे. असे सदा सरवणकर म्हणाले

हे पण वाचा:
Mofat Bhandi yojna बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! ‘भांडी संच योजना’ सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज!Mofat Bhandi yojna

राज्यातील शासकीय रूग्णालयात जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी “श्री सिध्दिविनायक भाग्यलक्ष्मी योजना” राबविण्यात येणार आहे या योजनेला न्यास व्यवस्थापन समितीने मान्यता दिली आहे आणि लवकरच या योजनेचा फायदा गरजू महिलांना होणार आहे. Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana

Leave a comment