namo shetkari yojana : 6 वा हप्ता वितरणाची तारीख ठरली

namo shetkari yojana : नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हफ्त्याचे यशवंत वितरण करण्यात आले आहे. प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये या प्रमाणात या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वितरित केला जातो. बऱ्याच दिवसापासून सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली होती. शासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार सहाव्या हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यास सुरू केली जाणार आहे.

20250328 223458

या दिवशी होणार रक्कम जमा namo shetkari yojana

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता वितरण करण्याची तारीख जाहीर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 28 मार्च 2025 रोजी ट्विट करत शेतकऱ्यांना सहावा हप्ता उद्यापासून वितरित केला जाईल अशी माहिती जाहीर केली आहे. या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 29 मार्च 2025 पासून नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली जाईल.

namo shetkari yojana

या आधीच निधि मंजूर

namo shetkari yojana नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सहवा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाने 26 मार्च 2025 रोजी शासन निर्णयाच्या माध्यमातून निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या सहाय्यक 92 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनाचा सहावा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक लागणारा निधी मंजूर केला होता. निधी मंजूर करून डीबीटी विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया देखील पूर्ण केली. टीबीटी विभागाकडे निधी हस्तांतरित केल्यानंतर हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची सूचना देखील राज्य शासनाने डीबीटी विभागाला दिलेली आहे. या सूचनेनुसार नुसार आता 29 मार्च 2025 पासून राज्यातील नमो शेतकरी योजना अंतर्गत पात्र असणारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Kanda Anudan  Kanda Anudan :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! 28 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर, तुम्हाला मिळणार का? लगेच पहा

लाभ मिळणार डीबीटी अंतर्गतच

राज्य शासनाने प्रत्येक योजनेमध्ये पारदर्शक पणा आणण्यासाठी प्रत्येक योजना डीबीटी अंतर्गत लाभ वितरित करण्याची सुविधा उपलब्ध केली. यामुळे नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणारे शेतकऱ्यांना देखील सहाव्या हफ्त्याचे वितरण हे टीबीटी अंतर्गतच केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आधार सलग्न असणारे बँक खाते या बँक खात्यावर सहाव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांना लाभ

namo shetkari yojana 29 मार्च 2025 पासून नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता वितरित करण्याचे प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे पार पाडण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागू शकतो. शेतकऱ्यांना 29 मार्च 2025 रोजी रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसांमध्ये म्हणजे 30 मार्च 2025 पर्यंत नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

हे पण वाचा:
Protsahan Anudan शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 50 हजार प्रोत्साहन योजना सुरू, पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ.Protsahan Anudan

Leave a comment