पंजाबरावांचा हवामान अंदाज खरा ठरला,सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस;राज्यात आणखी किती दिवस पाऊस राहणार .Panjabrao Dakh Havaman Andaj  

Panjabrao Dakh Havaman Andaj  : पंजाबरावांनी वर्तवलेला हवामान अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला आहे. 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडत असून, 16 आणि 17 नोव्हेंबरला पावसाचा जोर राहणार असल्याचे सांगितले आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Panjabrao Dakh Havaman Andaj कोणत्या भागांमध्ये पाऊस?

पंजाबरावांच्या अंदाजानुसार, सांगली, सातारा, कोल्हापूरसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह गोव्यातही 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील.

हे वाचा : दारुगोळा कारखाना महाराष्ट्र 2024:अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी

थंडीची लाट येणार

17 नोव्हेंबरनंतर हवामानात बदल होणार आहे. 18 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांमध्ये थंडी वाढेल. किमान तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात थंडीचा जोर दिसून येईल.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज

भारतीय हवामान खात्यानेही सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, हा पाऊस तुरळक स्वरूपाचा असेल. कोणत्याही भागासाठी हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

Panjabrao Dakh Havaman Andaj नागरिकांसाठी सूचना

पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील पिकाची योग्य काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे थंडीची लाट लक्षात घेऊन गरम कपड्यांची तयारी ठेवावी. हवामानाचा अंदाज पाहून पुढील नियोजन आखणे सोपे ठरेल. Panjabrao Dakh Havaman Andaj 

Leave a comment