Pashusavardhan vibhag yojana : ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच पशुपालक शेतकऱ्यांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करण्याचे साधन निर्माण व्हावे म्हणून सरकारकडून विविध शासकीय योजना राबवल्या जातात. यातच शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी योजना पशुसंवर्धन विभागाकडून राबवली जाते. पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना गाई/म्हशी, शेळ्या/मेंढ्या व कोंबड्यांसाठी अनुदान वाटप केले जाते. या घटकांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. पशुसंवर्धन विभागाकडून गाई म्हशी शेळ्या मेंढ्या व कोंबड्या या घटकांसाठी अर्ज मागवणे सुरू झालेले आहे.

कोणते लाभ मिळतील Pashusavardhan vibhag yojana
- गाई म्हशी खरेदीसाठी अनुदान
- 1000 कोंबड्या खरेदीसाठी अनुदान
- शेळी मेंढी गट खरेदीसाठी अनुदान
- तलंगा गट खरेदीसाठी अनुदान.
पशुसंवर्धन विभाग अंतर्गत यावरील घटकाला अनुदान दिले जाते. शासनाकडून पात्र असणाऱ्या किंवा निवड झालेल्या शेतकऱ्यांना वरील घटकासाठी ऑनलाइन रक्कम वाटप केले जाते.
कोणत्या घटकाला किती अनुदान मिळते
1. दुग्धजन्य प्राणी वाटप योजना
- लाभार्थी: अनु. जाती/जमाती, इतर मागासवर्गीय, लघु व अल्पभूधारक शेतकरी, शिक्षित बेरोजगार, महिला स्वयंसहायता गट.
- लाभ: 2 देशी/क्रॉसब्रेड गायी किंवा 2 म्हशींचे वाटप.
- अनुदान: अनु. जाती/जमातींसाठी 75% अनुदान.
- युनिट किंमत: गाय – ₹70,000, म्हैस – ₹80,000.
2. शेळी/मेंढी पालन योजना
- लाभार्थी: अनु. जाती/जमाती, लघु व अल्पभूधारक शेतकरी, शिक्षित बेरोजगार, महिला स्वयंसहायता गट.
- लाभ: 10 शेळ्या/मेंढ्या आणि 1 बोकड/मेंढा युनिटचे वाटप.
- अनुदान: अनु. जाती/जमातींसाठी 75% अनुदान.
- युनिट किंमत: उदा. उस्मानाबादी शेळी युनिट – ₹1,03,545.
3. कुक्कुटपालन योजना
- लाभार्थी: गरीब, भूमिहीन, मागासवर्गीय, लघु व अल्पभूधारक शेतकरी.
- लाभ: 100 दिवसांचे कोंबडे किंवा 25+3 पुल्लेट्सचे वाटप.
- अनुदान: सर्व श्रेणींसाठी 50% अनुदान.
- युनिट किंमत: उदा. 100 दिवसांचे कोंबडे – ₹29,500.
Pashusavardhan vibhag yojana अर्ज कसा करावा
अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला शासनाच्या https://ah.mahabms.com/ अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. शासनाने निर्गमित केलेल्या या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- बँक पासबुक
- राशन कार्ड
- अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
- अर्जदाराची सही
अर्जाबाबत महत्त्वाच्या सूचना
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराची वय हे 18 ते 65 दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.
- अर्जदार अर्ज अनुसूचित जाती जमातीमधून सादर करीत असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- एका कुटुंबात एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
- राशन कार्ड नुसार सर्व सदस्यांची नावे भरणे आवश्यक आहे.
- विचारलेली सर्व माहिती खरी देणे बंधनकारक आहे.
- अर्जदाराचा फोटो हा 80kb पर्यंतच्या साईज मध्ये असावा.
- अर्जदाराची स्वाक्षरी ही 40kb पर्यंत असावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
Pashusavardhan vibhag yojana पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदाराला 3 में 2025 ते 2 जुन 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या एक महिन्याच्या कालावधीमध्ये जे शेतकरी अर्ज करतील त्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट केली जाईल. या योजनेची तपासणी करून यामध्ये लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
Pashusavardhan vibhag yojana योजना राबवण्याचे वेळापत्रक
- ऑनलाइन अर्ज सादर करणे :- 03/05/2025 ते 02/06/2025
- रॅडमायझेशन पध्दतीने लाभार्थी प्राथमिक निवड :- 03/06/2025 ते 07/06/2025
- लाभार्थीमार्फंत कागदपत्रे अपलोड करणे :- 08/06/2025 ते 15/06/2025
- कागदपत्रे पडताळणी करुन निवड पुर्ण करणे :-16/06/2025 ते 24/06/2025
- कागदपत्रातील त्रुटि दुरुस्त करणे :- 25/06/2025 ते 27/06/2025
- कागदपत्रे तपासणी :- 28 जून2025 ते 30 जून 2025
- अंतिम लाभार्थी पात्रता यादी प्रसिद्ध कारणे : 02 जुलै 2025