pm suryaghar मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यात 31 हजार 153 सूर्यभान योजनेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. छतावरील पीएम सूर्यघर योजनेचे संच बसवण्याचे काम खूप वेगाने सुरू आहेत वेगाने काम सुरू असल्याची माहिती महावितरणाकडून देण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 31 हजार 153 या योजनेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यापैकी 31 हजार 102 अर्जांना मान्यता मिळालेली आहे .
पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेला मराठवाड्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून मोफत वीज मिळू शकतो. ही योजना केंद्र सरकारची आहे आणि या योजनेअंतर्गत तीन किलो वॅट क्षमतेपर्यंत च्या प्रकल्पासाठी ग्राहकांना 78 हजार रुपयापर्यंत सबसिडी मिळते. या योजनेला फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात झालेली आहे.
राज्यामध्ये ज्या नागरिकांनी सौर प्रकल्प बसवलेला आहे अशा 25 हजार 086 नागरिकांना अनुदानाची रक्कम रुपये 160 कोटी थेट नागरिकांना हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे.
पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत नागरिकांनी स्वतःच्या घरावर सौर ऊर्जा संच बसवलेला आहे अशा नागरिकांची वीज बिलापासून सुटका होणार आहे.शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट 30 हजार रुपये अनुदान 2 किलो वॅट पर्यंत मिळते. तीन किलो वॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो वॅट क्षमतेसाठी 18 हजार अनुदान दिले जाते. तीन किलो वॅट पेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण आमदार 78 हजार रुपये पर्यंत मर्यादित आहे.
20 हजार 781.43 किलोवॅट ऊर्जा निर्मिती अपेक्षित
मराठवाड्यामध्ये 31 हजार 153 नागरिकांनी प्रधानमंत्री पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज केलेले आहे. त्यापैकी 31 हजार 102 नागरिकांचे अर्ज मंजुर झाले आहे . यापैकी 20 हजार 781.43 किलोवॅट ऊर्जा निर्मिती होणार आहे. तर यातील 5225 नागरिकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीज निर्मिती सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे या नागरिकांना मोफत विजेचा लाभ मिळालेला आहे आणि त्यांची वीज बिलापासून कायमची सुटका झाली आहे.
pm suryaghar योजनेचे मराठवाड्यातील लाभार्थी
मंडळ कार्यालय लाभार्थी
- छत्रपती संभाजी नगर शहर 5,361 लाभार्थी.
- छत्रपती संभाजी नगर ग्रामीण 3,696 लाभार्थी.
- जालना मंडळ 3,096 लाभार्थी.
- छत्रपती संभाजीनगर परिमंडळ 12,153 लाभार्थी.
- लातूर मंडळ 4,481 लाभार्थी.
- बीड मंडळ 3,408 लाभार्थी.
- धाराशिव मंडळ 2,066 लाभार्थी.
- लातूर परिमंडळ 9,955 लाभार्थी.
- नांदेड मंडळ 3,746 लाभार्थी.
- परभणी मंडळ 3,348 लाभार्थी.
- हिंगोली मंडळ 1,900 लाभार्थी.
- नांदेड परिमंडळ 8,994 लाभार्थी
- छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक कार्यालय 31,102लाभार्थी.
pm suryaghar सौर उर्जेचा वापरण्याचे फायदे.
pm suryaghar सध्याच्या काळात उपलब्ध असलेला हा सर्वात शाश्वत आणि पर्यावरणपूरक विजेचा स्त्रोत मानला जातो. जर पृथ्वी हरित पर्यायांकडे वळू पाहत असेल तर उर्जेच्या या स्त्रोतामध्ये एखाद्या व्यक्तीसाठी आणि ग्रहासाठी फायद्याच्या दृष्टीने बरेच काही आहे. सौर ऊर्जेचे काही महत्त्वाचे फायदे येथे आहेत.
हे वाचा: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना
1. पर्यावरणस्नेही:
सौर ऊर्जेचा हा सर्वात मोठा फायदा आहे: यामुळे पर्यावरणाला फायदा होतो. सौरऊर्जेमुळे थेट वीज निर्मिती होते आणि धोकादायक हरितगृह वायूंचे उत्सर्जन होत नाही. यामुळे कार्बन फूटप्रिंट मोठ्या प्रमाणात कमी होते. तसेच, जीवाश्म इंधनाप्रमाणे यामुळे वायू प्रदूषण किंवा हवामान बदलात भर पडत नाही, त्यामुळे स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा मिळते.
2. खर्चाची बचत:
सोलर पॅनेल बसविण्यासाठी काही आगाऊ भांडवलाची आवश्यकता असते, परंतु दीर्घकालीन बचत लक्षणीय असते. स्थापित केल्यानंतर, सौर ऊर्जा जवळजवळ विनामूल्य आहे कारण सूर्य किरण े ही एक नैसर्गिक संसाधन आहे ज्यास प्राप्त करण्यासाठी काहीही खर्च होत नाही. ज्यांच्याकडे स्वत:ची घरे आहेत, त्यांचे वीज बिल वाचू शकते, तर काही जण अतिरिक्त वीज ग्रीडला विकून अतिरिक्त कमाई ही करतात.
3. ऊर्जा स्वतंत्र :
वापरकर्त्याला सौर ऊर्जेद्वारे त्याच्या ऊर्जा पुरवठ्यासाठी स्वतंत्र वाटते. जागेवर वीज निर्मिती करणाऱ्या व्यक्ती आणि व्यवसायांना पारंपारिक ऊर्जा पुरवठादारांकडून कमी गरज असते. ग्रीड विजेच्या स्त्रोतांपासून दूर असलेल्या ठिकाणी हे अगदी खरे आहे. सौर ऊर्जा प्रणालीद्वारे, एक ऊर्जा पुरवठा प्रदान केला जातो जो ग्रीड खंडित होणे आणि ऊर्जेची कमतरता यावर फारसा अवलंबून नसतो.
4. कमी देखभाल खर्च :
एकदा सोलर पॅनेल बसवले की, ते कार्यान्वित ठेवण्यासाठी थोडी देखभाल करावी लागते. त्यांचा खडतर स्वभाव त्यांना खराब हवामानाचा प्रतिकार करण्यास भाग पाडतो आणि अत्यंत कमी सेवेसह दशके टिकू शकतो. यामुळे घरे आणि व्यवसायांना वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा हे कमी देखभाल दीर्घकालीन साधन बनले आहे. pm suryaghar