रब्बी पिक विमा अर्ज भरणे सुरू लवकर करा अर्ज. rabbi pik vima 2024

rabbi pik vima 2024 : शेतकऱ्यांच्या पिकाला विविध आपत्ति संकटा पासून संरक्षण देण्यासाठी पिक विमा योजना राबवण्यात आली. ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे संरक्षण विमा भरता येतो. प्रधान मंत्री पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात आपल्या पिकाचा विमा काढता येतो. खरीप हंगाम सरासरी जून महिन्यापासून सुरू होते. रब्बी हंगाम ऑक्टोबर पासून सुरू होते. ज्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढायचा आहे त्यांनी दिलेल्या अंतिम तारखेच्या आत आपल्या पिकाचा विमा काढणे आवश्यक आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

रब्बी हंगाम मध्ये देखील 1 रुपायतच पिक विमा rabbi pik vima 2024

राज्य सरकार ने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वसमावेशक पिक विमा योजना राबवून शेतकऱ्यांना 1 रुपयात पिक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. सर्व समवेशक पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2024 मध्ये देखील 1 रुपयात पिक विमा अर्ज सादर करता येणार आहेत.

रब्बी हंगाम 2024 मधील पिक विमा अर्ज सुरू.

rabbi pik vima 2024 रब्बी हंगाम मधील पिक विमा अर्ज सुरू झाले आहेत. रब्बी हंगाम मधील समावेश असणाऱ्या सर्व पिकांचे पिक विमा अर्ज आता सुरू करण्यात आले आहेत. आपण स्वत: किंवा आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र च्या माध्यमातून आपण आपला पिक विमा अर्ज सादर करू शकतात.

रब्बी हंगाम मध्ये समाविष्ट असणारे पिके

  • हरभरा
  • गहू
  • ज्वारी
  • कांदा
  • करडई
  • जवस
  • मोहरी
  • वटाणे

या सारख्या अनेक पिकांचा समावेश रब्बी पिकामद्धे केला जातो.

 rabbi pik vima 2024

पिक विमा अर्ज करण्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्र

  • शेतकऱ्यांचे आधार कार्ड .
  • जमीन तपशील 712 आणि आठ अ .
  • बँक पासबूक .
  • पिक पेरा (डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा).
  • सामायिक खाते असल्यास सहमति पत्र.

1 thought on “रब्बी पिक विमा अर्ज भरणे सुरू लवकर करा अर्ज. rabbi pik vima 2024”

Leave a comment