ration card kyc देशभरात अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रामाणिकरण करणे गरजेचे आहे. रेशन कार्ड अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची ई केवायसी करणे अशा सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार देशभरातील सर्व रेशन धारकांना आपली केवायसी करणे बंधनकारक आहे. ई केवायसी मध्ये कुटुंबप्रमुख तसेच कुटुंबातील सर्व सदस्य यांची ई केवायसी देखील करणे शासनाने बंधनकारक केलेले आहे.

इ के वाय सी करण्यासाठी शासनाने वारंवार मुदतवाढ दिलेले आहे. यातच आता शासनाने दिलेल्या अंतिम मुदत 15 फेब्रुवारी रोजी समाप्त होत आहे. अद्याप पर्यंत ज्या रेशन कार्डधारकांनी आपल्या कुटुंबातील सदस्याची किंवा आपली केवायसी केली नसेल त्यांनी येत्या 15 फेब्रुवारीच्या आत आपली ई केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.
ई केवायसी महत्व ration card kyc
ration card kyc सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून राज्यातील सर्वच जिल्ह्यात रस्ता भाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण केले जाते. या अन्न धान्याचे व्यवस्थित वितरण होण्यासाठी व खरोखरच पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ देण्यासाठी शासनाने ई केवायसी करण्याचे धोरण आखले. यानुसार सर्वच रेशन कार्डधारकांनी आपल्या जवळील रेशन दुकानांमध्ये जाऊन आपली केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सूचना देखील दिल्या. केवायसी करण्यासाठी लाभार्थी स्वतः आपले आधार कार्ड घेऊन आपल्याजवळील रेशन कार्ड दुकानांमध्ये जाऊन आपली ई केवायसी पूर्ण करू शकतो. केवायसी करण्यासाठी लाभार्थ्याच्या बोटाचा ठसा म्हणजेच बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवणे आवश्यक आहे.
हे वाचा: राज्यात पीक नुकसान भरपाईसाठी ई-पंचनामा प्रकल्पाची अंमलबजावणी
अंतिम तारीख 15 फेब्रुवारीच
रेशन धारकांनी कोणत्याही परिस्थितीत येत्या 15 तारखेपूर्वी आपली केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. अशा सूचना देखील संबंधित विभागाकडून रेशन धारकांना तसेच स्वस्त धान्य दुकानदारांना देखील देण्यात आलेल्या आहेत. या आधीच 7-8 वेळा मुदत वाढ दिलेली आहे. या आधी बऱ्याच वेळा मुदत वाढ दिलेली असल्यामुळे परत मुदत वाढ मिळेल की नाही अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
अन्यथा लाभ होईल बंद
ration card kyc सद्यस्थितीमध्ये लाभ मिळत असलेल्या सर्वच रेशन धारकांनी आपली ई केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जे रेशन धारक आपले ई केवायसी करणार नाही त्यांना या योजनेमधून वगळण्यात येणार आहे. म्हणजेच ज्यांची ई केवायसी पूर्ण होणार नाही त्यांना इथून पुढे रेशन अंतर्गत मिळणारा कोणताही लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे अद्याप पर्यंत ई केवायसी न केलेल्या रेशन धारकांनी 15 फेब्रुवारी च्या आत आपली ई केवायसी करून घेणे आवश्यक आहे.
1 thought on “ration card kyc : रेशन धारकांनो आजच करा हे काम अन्यथा लाभ होईल बंद!”