e panchanama शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार
राज्यात ई-पंचनामा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवला जाणार असून, त्यामुळे पीक नुकसानभरपाई तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाला समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्ति चा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ति मुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शेती पिकाचे नुकसान झाल्यावर सरकार कडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली जाते. मदत जाहीर करण्यासाठी शेती पिकाची झालेले नुकसान याचा पंचनामा करणे आवश्यक आहे. या पंचनामा प्रक्रिया राबवण्यासाठी जस्त कालावधी लागतो व शेतकाऱ्याना मदत मिळन्यास उशीर होतो. शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी म्हणून आता e panchanama प्रणाली राबवली जाणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान
प्रत्येक वर्षी वादळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शासन मदतीसाठी भरपाई जाहीर करते, मात्र ती वेळेत मिळत नाही. यावर उपाय म्हणून ई-पंचनामा प्रणाली राबवण्यात येणार आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई कधी होणार वितरण
ई-पंचनामामुळे भरपाई वेळेत मिळणार
ई-पंचनामा पद्धतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करता येईल आणि भरपाई थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल. त्यामुळे मदत मिळण्यास विलंब होणार नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी म्हणून e panchanama प्रणाली महत्वाची ठरेल.
अतिरिक्त पुनर्वसन प्राधिकरण स्थापन होणार
याशिवाय, अमरावती आणि नाशिकमध्ये पुनर्वसन प्राधिकरण कार्यान्वित करण्यासह अतिरिक्त ८ पुनर्वसन प्राधिकरणांसाठी प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणार आहे. तसेच १९७६ पूर्वी पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा पूर्ण करून त्या ग्रामविकास विभागाकडे वर्ग करण्याचे नियोजन आहे.
निष्कर्ष
e panchanama ई-पंचनामा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना तातडीने पीक नुकसानभरपाई मिळेल. ही योजना यशस्वी ठरल्यास संपूर्ण राज्यात ती लागू केली जाऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होईल आणि मदत वेगाने पोहोचेल.
1 thought on “e panchanama राज्यात पीक नुकसान भरपाईसाठी ई-पंचनामा प्रकल्पाची अंमलबजावणी”