Ration card update केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. ज्या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना सरकारी योजनेचा लाभ मिळतो ज्यामध्ये बहुतांश गरीब आणि गरजू लोकांचा समावेश आहे. अशा कुटुंबांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत, केंद्र सरकार या गरीब आणि गरजू लोकांना खूप कमी दरात रेशन पुरवते. यामुळे अशा कुटुंबांना या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळतो आणि रोजच्या जीवनात लागणाऱ्या अति आवश्यक वस्तू कमी दरात मिळण्यास मदत होते.
केंद्र सरकारच्या कमी किमतीचा रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तींकडे शिधापत्रिका असणे खूप गरजेचे आहे. अशा व्यक्तींना कमी दराच्या रेशन योजनेचा लाभ देण्यासाठी पात्रता ठरतात. पण मात्र सध्या शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन नियम जारी केलेला आहे. त्यानुसार शिधापत्रिकाधारकांसाठी 1 नोव्हेंबर पासून रेशन बंद होणार आहे. या मागचे कारण काय आहे सविस्तर माहिती जाणून.
रेशन कार्ड धारकांना मिळणार 9 वस्तू
Ration card update ई केवायसी करणे आवश्यक आहे
जे व्यक्ती राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र आहेत अशा व्यक्तींनी ई – केवायसी करणे आवश्यक आहे. याबद्दलची सर्व माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने या अगोदरच दिलेली होती. तरी पण मात्र शिधापत्रिका धारकांनी अजूनही ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा व्यक्तींचे रेशन (Ration Card) 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे. त्यासाठी ज्या शिधापत्रिका धारकांनी ई – केवायसी केलेली नाही अशा व्यक्तींनी ई – केवायसी करून घ्यावी. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ई – केवायसी साठी 31 ऑक्टोंबर ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे.
म्हणजेच, जर शिधापत्रिकाधारकाने 31 ऑक्टोबर पर्यंत आपली ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर, त्या शिधापत्रिकाधारकांना पुढचा महिना रेशन मिळणार नाही. अशा शिधापत्रिका धारकांची नावे शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहेत. ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यास ती शिधापत्रिका रद्द केली जाईल. त्यानंतर त्या व्यक्तीला सरकारच्या या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
ई – केवायसी का केली जाते?
Ration card update रेशन कार्ड(Ration Card) ई- केवायसी बद्दल असे प्रश्न बऱ्याच व्यक्तींच्या मनात पडलेले आहे की ई- केवायसी का केली जाते. काय गरज पडते ई – केवायसी ची? अशा बऱ्याच व्यक्तींची नावे शिधापत्रिकेवर नोंदवली आहेत. तसेच रेशन कार्ड वर मोफत रेशन मिळवण्याच्या योजनेसाठी कोण पात्रता आहे की नाही, त्यामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत की ते या जगामध्ये नाहीत. ज्यांचा मृत्यू झाला आहे पण अजूनही त्यांची नावे शिधापत्रिकेमधून काढण्यात आलेली नाहीत अशा व्यक्तींसाठी ई – केवायसी करणे आवश्यक आहे.
Ration card update त्यासाठी सर्व शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्या व्यक्तींची नावे नोंदवलेली आहेत. या सर्वांना ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अशा व्यक्तीने आपल्या जवळच्या अन्नपुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात. जर कोणत्याही व्यक्तीने ई – केवायसी नाही केली, तर त्या व्यक्तीचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल. त्यासाठी सर्वांनी ई- केवायसी करून घेणे खूप गरजेचे आहे.