रिक्षा बॅच नियम
आपण आज या लेखामध्ये रिक्षा बॅच नियम याबद्दल माहिती पाहणार आहोत जेव्हा तुम्ही रिक्षा बॅच साठी अप्लाय करतात त्यावेळेस तुम्हाला ते नियम विचारले जातात. त्यावेळेस तुम्हाला ते नियम सांगता आले तर ठीक आहे नाहीतर तुमच एप्लीकेशन रिजेक्ट केलं जाऊ शकत. तर तसेच आपण आज या लेखामध्ये रिक्षा बॅच नियम पाहणार आहोत
- रिक्षा चालवायला जातान युनिफॉर्म घालणे आणि छातीच्या डाव्या बाजूस बॅच लावणे व लायसन्स सोबत असणे.
- रिक्षा चालवत असताना तंबाखू, गुटखा कसल्याही प्रकारच्या धूम्रपान करायचे नाही.
- रिक्षा ताब्यात घेताना स्वच्छ आहे का नाही ते पाहणे आणि तसेच रिक्षामध्ये गॅस बुक, फिटनेस, विमा, परमिट आहे की नाही ते पाहणे.
- पॅसेंजर ला जबाबदारीने पोहोचविणे.
- पॅसेंजरच्या काही वस्तू रिक्षामध्ये विसरल्यास त्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करणे आणि त्याची पोच पावती घेणे .
- पॅसेंजर ला आरडा ओरडा करून बोलू नये आणि रिक्षा चालवत असताना फोनवर पण बोलू नये.
- रिक्षा चालवत असताना दुसऱ्या गाड्या पासून दोन ते पाच फूट अंतरावर चालवावे.
- मीटर टाकने व मीटर प्रमाणेच जे भाडे होईल तेच भाडे पॅसेंजर कडून घेणे.
- लगेच भाडे नियमाप्रमाणे जेवढे होईल तेवढेच घेणे.
- दारू, गॅस सिलेंडर ,स्फोटक पदार्थ रिक्षामध्ये घ्यायचे नाही
वरील दिलेले हे सर्व रिक्षा बॅच चे नियम आहेत.