RPL Training Program 2024 इजराइल येथे बांधकाम कामासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी बांधकाम क्षेत्रांमधील अनुभवी प्रशिक्षण साठी आर पी एल ट्रेनिंग प्रोग्राम राबविण्यात येणार आहे येथे बांधकाम कामासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी 10 वी पास आणि नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना इजरायल येथे नोकरीची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्यामुळे या प्रशिक्षण योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे 17 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी करणे गरजेचे आहे.
RPL Training Program 2024 10 वी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण :
इजराइल येथे बांधकाम कामासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी 10 वी पास आणि नापास असणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी आर पी एल प्रशिक्षण कार्यक्रम शासन मार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोल्हापूर येथे राबविण्यात येणार असून दिनांक 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत सदर कार्यक्रमासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे.
बांधकाम कामगारांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण
प्रशिक्षण कालावधी दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते 20 सप्टेंबर 2024 सकाळी 10 ते सायंकाळी सहापर्यंत असा 30 तासांचा असणार आहे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या योजनेमधील प्रशिक्षणार्थी यांना बांधकाम क्षेत्रामध्ये इजराइल येथे काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या यंत्रणेमार्फत प्रचाराने प्रसार करणे आवश्यक आहेत
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट :
- RPL Training Program 2024 या कार्यक्रमाअंतर्गत 10 वी पास व नापास असणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे
- हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या योजनेतील प्रशिक्षणार्थी यांना बांधकाम क्षेत्रामध्ये इजराइल येथे काम करण्याची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी यंत्रणेमार्फत प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे
- प्रशिक्षणार्थ्यांना इजरायल येथे नोकरीची संधी
या योजनेसाठी पात्रता काय आहे :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे
- उमेदवार 10 वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असावा
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- इजराइल येथे जाण्यासाठी पासपोर्ट
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- इतर कागदपत्रे आवश्यक असल्यास
RPL Training Program 2024 या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ :
- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 1500 विद्यावेतन
- इजराइल येथे जाण्यासाठी पासपोर्ट
- इजराइल येथे प्रति महिना 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त वेतन आणि भत्ते
- सर्व प्रकारचे विमा संरक्षण