सारथी शिष्यवृत्ती योजना
सारथी शिष्यवृत्ती योजना
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण या लेखांमध्ये सारथी शिष्यवृत्ती योजना या विषयी माहिती पाहणार आहोत. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन 2020- 24 या शैक्षणिक वर्गातील इयत्ता 9 वी, 10 दहावी आणि 11 वी च्या मराठा कुणबी गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे (SARTHI PUNE) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त
संस्थेद्वारे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन 2020- 24 या शैक्षणिक वर्गातील इयत्ता नववी दहावी व अकरावी अर्ज मागविण्यात आले आहेत. तर आपण आज या , सारथी शिष्यवृत्ती म्हणजे काय? पात्रता काय आहे? कुणासाठी आहे? कुणासाठी आहे? यासाठी कागदपत्रे कोणती आवश्यक लागतात, अर्ज कोठे व कसा करावा लागेल? याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत.
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना
सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता नववी, इयत्ता दहावी व अकरावी मराठा कुणबी, कुनबी- मराठा व मराठा- कुणबी या गटातील विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन सादर करणे बाबत परिपत्रक व मार्गदर्शक सूचना छत्रपती शिवाजी महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे कडून मागविण्यात येतात. सारथी मार्फत 9 वी.10वी. आणि 11वी च्या विद्यार्थ्यांसाठी सदरील योजना राबवली जाते. या योजनेत लाभार्थ्याला सहभागी होण्यासाठी किंवा भाग घेण्यासाठी NMMS ही परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी.NMMS उत्तीर्ण मात्र शिष्यवृत्ती मध्ये अपात्र असावा, अशा विद्यार्थ्यांना या योजनेतून शिष्यवृत्ती चा लाभ दिला जातो.SARTHI PUNE संस्थे कडून वरील मराठा कुणबी गटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात प्रति महिना 800 रूपया प्रमाणे वर्षाला एकूण 9600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज तालुका स्तरावर गट शिक्षण धिकारी कार्यालयाकडे जमा करायचे आहेत.
सारथी शिष्यवृत्ती योजनेद्वारे इयत्ता नववी, इयत्ता दहावी आणि अकरावी मराठी व कुणबी समाजातील पात्र विद्यार्थ्यांना प्रति महिना 800 रुपये म्हणजे एका वर्षात 9600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीचा मराठा व कुणबी समाजातील आर्थिक परिस्थिती दुर्बल असणाऱ्या आणि हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
सारथी शिष्यवृत्ती योजना पात्रता
- लाभार्थी NMMS वित्तीर्ण पण शिष्यवृत्तीसाठी अपात्र झालेला असावा.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबातले वार्षिक उत्पन्न एकूण 3 लाख 50 हजार इतके असावे.
- लाभार्थी विद्यार्थी हा 9वी,10वी आणि 11 मध्ये शिकत असलेला असावा.
- NMMS उत्तीर्ण गुणपत्रिका सोबत जोडावे
- लाभार्थी विद्यार्थी हा 10 मध्ये असल्यास 9 वी. चे गुण 50% असावे.
- आणि लाभार्थी विद्यार्थी हा 11वी. मध्ये असेल तर 10 वी. चे गुण 60% असावे.
- या शिष्यवृत्ती चा लाभ कुणबी ,मराठा – कुणबी व कुणबी-मराठा या चार गटातील विद्यार्थी घेऊ शकतात.
- या योजनेसाठी राज्यातील सर्व शासकीय, शासनमान्य, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहे असे विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी खालील शाळेतील विद्यार्थी अपात्र आहे
- केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी
- जवाहर नवोदय विद्यालय शिकणारे विद्यार्थी.
- विनाअनुानित शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच स्वयं अर्थसहाय्यक शाळेतील विद्यार्थी व जुनियर कॉलेज मधील विद्यार्थी.
- शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी सैनिक शाळेमध्ये शिकणारी विद्यार्थी
सारथी शिष्यवृत्ती योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- विद्यार्थीच्या स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिष्यवृत्ती मागणी केलेला अर्ज.
- इयत्ता नववी, दहावी आणि अकरावी साठी स्वतंत्र्य अर्ज करणे आवश्यक आहे.
- मुख्याध्यापकाचे स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफारस पत्र.
- लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील उत्पन्न प्रमाणपत्र
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड
- लाभार्थी विद्यार्थ्यांचे स्वतःच्या नावाने बँक पासबुक.
- 10 वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 9 वी च्या वार्षिक परीक्षेत 55% गुणासह पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असलेली गुणपत्रिकेची सत्यप्रत.
- इयत्ता 11 वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी च्या वार्षिक परीक्षेत 60% गुणासह उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत.
- NMMS परीक्षेत उत्तीर्ण गुणपत्रक.
सारथी शिष्यवृत्ती योजना साठी अर्ज कसा करावा
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम
- खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
- https://sarthi-maharashtragov.in/
- लॉगिन करा आणि अर्ज करा.
- शिष्यवृत्तीचे तपशील काळजीपूर्वक वाचा
- फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक जोडा
- सबमिट या बटनावर क्लिक करा. अशाप्रकारे तुमचा अर्ज केला जाऊ शकतो.
सारथी शिष्य वृत्ती अंतर्गत लाभार्थी उमेदवारान अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र असणारे सर्व लाभार्थी हे 24 ऑक्टोबर पर्यन्त आपले नवीन अर्ज सादर करू शकतात. ज्या उमेदवारान अर्ज कारायचा आहे त्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा. अंतिम तारखे नंतर नवीन अर्ज सादर करता येणार नाहीत. त्या मुळे जे लाभार्थी अर्ज करणे बाकी आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.
2 thoughts on “सारथी शिष्यवृत्ती योजना”