शुभमंगल सामूहिक विवाह योजना 25000 अनुदान

शुभमंगल सामूहिक विवाह योजना

शुभमंगल सामूहिक विवाह योजना

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपण आज या योजनेअंतर्गत शुभ मंगल सामूहिक नोंदणी विवाह याविषयी माहिती पाहणार आहोत. ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू आहे जास्तीत जास्त याचा लाभ  शेतमजुरांच्या मुलीच्या सामूहिक विवाह साठी सुरू करण्यात आलेली ही एक खूप महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा लाभ हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलींना होणार आहे ज्यांची परिस्थिती खूप गरीब आहे अशा गरीब कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ  घेण्यात येईल . ज्या कुटुंबाची खूप गरीब परिस्थिती आहे.  रोज लोकांच्या इथं  मजुरी करणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील मुलीला या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विवाह साठी आवश्यक असलेले मंगळसूत्रे व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रति जोडप्याला दहा हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. 

शुभमंगल सामूहिक विवाह योजना

शुभमंगल सामूहिक विवाह योजना

आपण आज या योजनेअंतर्गत शुभ मंगल सामूहिक नोंदणी विवाह याविषयी माहिती पाहणार आहोत. ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू आहे जास्तीत जास्त याचा लाभ  शेतमजुरांच्या मुलीच्या सामूहिक विवाह साठी सुरू करण्यात आलेली ही एक खूप महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा लाभ हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलींना होणार आहे ज्यांची परिस्थिती खूप गरीब आहे अशा गरीब कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ  घेण्यात येईल . ज्या कुटुंबाची खूप गरीब परिस्थिती आहे.  रोज लोकांच्या इथं  मजुरी करणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील मुलीला या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विवाह साठी आवश्यक असलेले मंगळसूत्रे व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रति जोडप्याला दहा हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. 

शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेची उद्दिष्टे

 •  या योजनेचा लाभ हा आर्थिक दृष्ट्या गरीब असणारे शेतकरी व शेतमजूर  यांच्या मुलीच्या विवाह  सोहळ्याचा आर्थिक बोज कमी करणे या उद्देशाने शुभमंगल सामूहिक विवाह योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
 •  या योजनेचा लाभ हा रोज मजुरी करणाऱ्या महिला त्यांच्या मुलीचा विवाह  करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही व कोणाकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही असा या योजनेचा हेतू आहे.

शुभमंगल सामूहिक विवाह योजना वैशिष्ट्ये

 •  ही योजना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमजुराच्या मुलीच्या सामूहिक विवाह साठी सुरू करण्यात आलेली आहे.
 •  या योजनेचे निवेजन संपूर्णपणे जिल्हा नियोजन विकास समिती (DPDC) मार्फत राबविण्यात येते.
 •  जर एखादे जोडपे  सामूहिक विवाह सोहळ्यात सामील न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन विवाह करतील तर अशा जोडप्यांना पण या योजनेअंतर्गत 25 हजार रुपये अनुदान देण्यात येईल.
 • या योजनेअंतर्गत जे अनुदान दिले जातील ते मुलीच्या आई किंवा वडील दोन्हीपैकी एक जणांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या साह्याने जमा केली जाईल.

शुभमंगल सामूहिक विवाह योजना दिले जाणारे अनुदान

 •  या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीच्या आईला किंवा आई जर नसेल तर वडिलांना जर दोघेपण नसतील तर लाभार्थी मुलीला 25000 रुपये असे देण्यात येते तसेच विवाहचे आयोजन करणाऱ्या संस्थे दोन हजार रुपये देण्यात येतात.

शुभमंगल सामूहिक विवाह योजना लाभार्थी

 •  या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असणारे शेतकरी, शेतमजुरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुली, धुणं भांडी करणाऱ्याच्या मुली, ज्याची परिस्थिती खूप गरीब आहे असे लोक आपल्या मुलीचा विवाह साठी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता असतील.

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा फायदा.

 •  या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट गरीब असणाऱ्या कुटुंबातील मुली, व शेतमजुराच्या मुलीच्या विवाह साठी आवश्यक असलेले मंगळसूत्र व इतर वस्तूची खरेदी करण्यासाठी प्रति जोडप्याला 25 हजार रुपये अनुदान वधूच्या आईच्या नावाने जर त्या वधूची आई हयात  नसल्यास, वडिलांच्या नावाने जर त्या वधूचे वडील  हयात नसल्यास म्हणजे दोघे पण नसल्यास वधूच्या नावाने देण्यात येते. तसेच सामूहिक विवाह चे आयोजन करणाऱ्या संस्थेस दोन हजार रुपये अनुदान देण्यात येते.
 •  मंगळसूत्र आणि इतर खर्च विवाह संबंधित वस्तू खरेदीसाठी मदत दिली जाते.
 •  सामाजिक कार्यक्रमासाठी मदत दिली जाते.
 •  या योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थाना प्रोत्साहन अनुदान.
 •  या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबाला, शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबाला, आपल्या मुलीच्या विवाह साठी कोणाकडून पैसे काढण्याची गरज पडणार नाही कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. 

शुभमंगल सामूहिक विवाह पात्रता

 •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

शुभमंगल सामूहिक विवाह योजना अटी व शर्ती

 •  या योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील मुलींना दिला जाईल.
 •  महाराष्ट्र बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 •  अर्जदार मुलगी ही शेतकरी किंवा शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील असणे आवश्यक आहे .
 •  या योजनेचा लाभ हा फक्त पहिला विवाह करण्यासाठी दिला जाईल.
 •  लाभार्थी व्यक्तीच्या  कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा जास्त नसावे जर एक लाख रुपये पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला या योजनांमध्ये सहभागी होता येणार नाही.
 •  वधू ही महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे त्याबाबत ग्रामसेवक/ तलाठी यांचा दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे
 •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी वधूचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे कमी नसावे कमी असल्यास त्या वधूस या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण झालेले असावे 21 वर्षापेक्षा कमी वय असल्यास त्या मुलाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 •  वधू आणि वर पुनर्विवाह करत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 •  परंतु वधू विधवा किंवा घटस्फोटीत असल्यास तिचा पुनर्विवाह साठी या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येईल.
 •  या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती – जमाती, भटक्या जमाती, मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दांपत्यांना या योजनेचा लाभ दिलला जाणार नाही त्यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वातंत्र्य योजना राबविण्यात येत आहे.
 •  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला कमी वेळेमध्ये जोडप्यांची नाव नोंदणी करणे शक्य व्हावे, याकरिता एक स्वयंसेवा संस्थेस एका सोहळ्यात  100 जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी राहील.
 •  एका स्वयंसेवी  वर्षात फक्त दोन वेळा  समूहिक विवाह समारंभ आयोजित करता येतील त्यापेक्षा जास्त विवाह सोहळा आयोजित केल्यास त्यासाठी कोणतीही शासकीय अनुदान देण्यात येणार नाही.
 •   स्वयंसेवी संस्थेला लग्नाच्या एक महिना अगोदर महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्याकडे अर्ज व कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
 •  या योजनेमध्ये सहभाग घेतलेल्या जोडप्यांना लग्नाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

शुभमंगल सामुहिक विवाह आवश्यक लागणारी कागदपत्रे

 •  वधू-वराचे आधार कार्ड
 •  रहिवासी प्रमाणपत्र
 •  राशन कार्ड
 •  उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 •  बँक खाते क्रमांक
 •  लाभार्थी व्यक्तींच7/12 आठ उतारा
 •  मोबाईल क्रमांक
 •  ई-मेल आयडी
 •  पासपोर्ट आकाराचे फोटो
 •  उत्पन्नाचे प्रमाणपत्र (मुलीच्या आई-वडिलांचे)
 •  शाळा सोडल्याचा दाखला.
 •  जन्म नोंदणी प्रमाणपत्र

शुभमंगल सामुहिक विवाह अर्ज करण्याची पद्धत

 •  या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला महिला व बालविकास विभागात जाऊन शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
 •  अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्यक लागणारे कागदपत्रे अर्जासोबत जोडून घ्यावी.
 •  तो भरलेला अर्ज विभागातील अधिकाऱ्यांन जमा करावा लागेल.
 •   सामूहिक विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयास अर्जासह सर्व एकत्रित दाखले सादर करावेत .
 •  विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या जोडप्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र  स्वयंसेवी संस्थेने सादर करणे आवश्यक आहे.

शुभमंगल सामूहिक विवाह योजना

शुभमंगल सामूहिक विवाह योजना महत्त्वाची सूचना

या योजनेमध्ये या अगोदर दहा हजार रुपये सहभागी होणाऱ्या जोडप्यांना लाभ दिला जात होता पण आता यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

     राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात सादर केल. या अर्थसंकल्पात शुभमंगल योजनेच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याच्या निधीत 10000 वरून आत्ता २५ हजार रुपये करण्यात आलेली आहे. याची घोषणा राज्याची अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे.

5 thoughts on “शुभमंगल सामूहिक विवाह योजना 25000 अनुदान”

Leave a comment