विठ्ठ्ल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना

विठ्ठ्ल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना

विठ्ठ्ल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर येथील श्री विठ्ठल  रखुमाई आषाढी एकादशी म्हटले की सर्वांना पंढरपूर आठवते. दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीला राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरला येतात. आषाढी एकादशी म्हटले की वारकऱ्यासाठी हा खूप मोठा सोहळा आहे राज्यातल्या  कानाकोपऱ्यातील वारकरी या वारीमध्ये सहभागी असतात दरवर्षीप्रमाणे सुमारे 15 ते 20 लक्ष वारकरी या वारीमध्ये सहभागी असतात . हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात असतात. लोकसंख्या जास्त असल्यामुळे आणि 30 दिवसाचा प्रवास म्हणजे एक महिना पायी चालत असलेले वारकरी असे बरेच वेळा होते की गर्दी जास्त असल्यामुळे बऱ्याच वारकर्याचा  अपघात होतो, दुखापत होते, तर कोणाकोणाला ऊन पाऊस असल्यामुळे आजाराला बळी पडतात, तर काही काही चा तर मृत्यू पण होतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या उपचारासाठी किंवा त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसदारासाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केलेली आहे ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल रखुमाई  वारकरी विमा योजनेची घोषणा केलेली आहे. या योजनेअंतर्गत वारकरी किंवा त्यांच्या वारसदारास मदत दिली जाणार आहे. चला तर आपण आज या लेखांमध्ये पाहूया विठ्ठल रखुमाई वारकरी विमा योजना म्हणजे काय, याचा लाभ कोणाला दिला जातो, किती दिला जातो, यासाठी पात्रता कोण असेल, या सर्वांची माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.

विठ्ठ्ल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना

योजनेचे नाव

विठ्ठ्ल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना

कोणामार्फत राबवली जाते

महाराष्ट्र शासनाद्वारे

विभाग

सामाजिक कल्याण विभाग 

अर्ज प्रक्रिया

ऑफलाइन 

उद्देश

उपघात ग्रस्त वारकऱ्यांना विमा प्रदान करणे 

लाभ

4 लाख रुपये पर्यन्त 

लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील वारकरी 

अधिकृत संकेतस्थळ

उपलब्ध नाही 

विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना माहिती

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाई वारीसाठी येणाऱ्या पायी  वारकऱ्यांना विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना सुरू करण्यात आलेली आहे.Iffco – Tokio General Insurance Co.Ltd या विमा कंपनीने निवड केलेली आहे. आषाढी वारीसाठी येणाऱ्या कानाकोपऱ्यातून सुमारे 15 लक्ष वारकऱ्यांसाठी या योजनेची तरतूद केलेली आहे. या योजनेअंतर्गत वारकऱ्याचा अपघात दरम्यान मृत्यू झाल्यास एक लाखाचा विमा व चार लाख इतके रक्कम शासनाकडून देण्यात येणार आहे.

विठ्ठल रखुमाई वारकरी विमा योजनेअंतर्गत दिला जाणार लाभ

 • या योजनेअंतर्गत अपघात कायमचे अपंगत्व असल्यास एक लाख रुपये देण्यात येतील.
 •  वारकऱ्यांना अपघातात अंशत: अपंगत्व असल्यास वारकऱ्यांना 50 हजार रुपये देण्यात येतील.
 •  वारकरायला वारीच्या दरम्यान तीस दिवसात जर आजारी पडल्यावर औषध्येय उपचार करण्यासाठी 35 हजार रुपये देण्यात येतील.
 • लोकसंख्या जास्त असल्यामुळे वारीच्या दरम्यान एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला चार लाख रुपये अनुदान देण्यात येईल. असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे.

                     महाराष्ट्र शासनाचा जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना पात्रता

 •  ही योजना आषाढी एकादशी पंढरपूर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना किंवा खाजगी व सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्या ंसाठी लागू राहील.
 •  अपघातग्रस्त वारकरी आषाढी वारीकरिता गेल्याची ज्या गावाचा वारकरी आहे तेथील संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल.
 •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दिलेला PDF फॉर्म भरून जमा करणे आवश्यक आहे.
 •  मृत्यू अपघात दरम्यान मृत्यू झाल्यास अर्ज सोबत मृत्यू प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे             
विठ्ठ्ल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना

विठ्ठ्ल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना  GR आणि PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा.       

निष्कर्ष

विठ्ठ्ल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना  माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे जर तुमच्या नातेवाईकांमधलं कोणी किंवा तुमच्या गावातील जवळपासचं कोणी आषाढी एकादशी पंढरपूर वारी करण्यासाठी गेलेला असेल तर त्यांना या योजनेबद्दल कळवा जेणेकरून त्या वारकऱ्याला दुखापत किंवा आजारी पडल्यावर उपचारासाठी या योजनेचा लाभ घेता येईल.

विचारले जाणारे प्रश्न

 1. विठ्ठ्ल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना कोणी सुरू केली?
 •   विठ्ठल रुक्माई वारकरी विमा छत्र योजनेची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

2. विठ्ठ्ल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना अंतर्गत वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्या वारकऱ्यांच्या कुटुंबाला किती मदत दिली जाईल?

 •  विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनेअंतर्गत वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या वारकऱ्याच्या वारसदारास चार लाख रुपये मदत शासनाकडून दिली जाईल
 1. आषाढी एकादशी वारी करणारा वारकरी 30 दिवसात जर आजारी पडल्यास किती लाभ दिला जाईल?
 •  आषाढी एकादशी वारी करणारा वारकरी जर 30 दिवसात आजारी पडला तर त्या वारकऱ्याला 35 हजार रुपये वैद्यकीय उपचारासाठी  रक्कम दिली जाईल.
 1. वारकऱ्यांसाठी शासनाची कोणती योजना आहे?
 •  वारकऱ्यांसाठी शासनाची विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना आहे या योजनेअंतर्गत वारकऱ्यांना वारी करताना अपघात झाल्या शासनाकडून मदत दिली जाणार आहे.

1 thought on “विठ्ठ्ल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना”

Leave a comment