Satbara Utara : शेती किंवा बिनशेती जमीन खरेदी करताना अनेक जण फक्त जागेचा दर व लोकेशन आणि विक्रेत्याच्या शब्दावर विश्वास ठेवून व्यवहार करत असतात. पण या सगळ्या प्रोसेस मध्ये सर्वात महत्त्वाचा दस्तऐवजी असतो. तो म्हणजे सातबारा. सातबारा उताऱ्यावर जमिनीची मालकी, उपयोग, कोणती अट आहे का, कोणते हक्क लागू आहेत यासारख्या नोंदी स्पष्टपणे नमूद असतात . पण अनेक जण अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना आर्थिक आणि कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते. Satbara Utara

शेतीच्या जमिनीचे प्रकार काय आहेत?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 नुसार जमिनीचे खालील तीन मुख्य प्रकार आहेत .
- जुनी शर्तीची जमीन(वर्ग 1)
ही जमीन शेतकऱ्यांच्या संपूर्ण मालकीची असते या जमिनीवर मालकाला विक्रीसाठी कोणतीही शासकीय परवानगीची गरज लागत नाही .यासाठी ” खा” ( खासगी मालक)असे नमूद असते. - नवीन शर्तीची जमीन(वर्ग2)
अशा जमिनी राज्य शासनाकडून वतन , इनाम, पुनर्वसन किंवा भूसंपादनात अंती देण्यात येतात .यावर व्यवहार करत असताना शासनाची पूर्वपरवानगी असणे आवश्यक असते . - शासकीय पट्टीदार जमीन
शासकीय पट्टेदार ही जमीन फक्त वापरासाठीच शासनाकडून भाडेकरारा ने दिलेली असते .या जमिनीवर विक्री किंवा हस्तांतरण करण्यासाठी कठोर अटी असतात आणि परवानगीशिवाय व्यवहार केल्यास जमीन जप्त होऊ शकते .
हे वाचा : जनावरांच्या चाऱ्यासाठी सरकार देतयं अनुदान…!असा करा अर्ज…
सातबारावर शर्त आणि धारण प्रकारात नोंदवले गेले आहेत का?
जर तुमच्या सातबारावर शर्त किंवा धारण प्रकार नमूद असेल तर त्या जमिनीचा उपयोग आणि व्यवहार मर्यादित असतो का नाही हे समजून घेणे खूप कठीण होते .
म्हणजेच उदाहरणार्थ, नवीन शर्तीची जमीन आहे का हे जाणून घेण्यासाठी शर्त चाउल्लेख पाहणे गरजेचे आहे .अनेक वेळा काही होते की खरेदीदार किंवा शेतकरी याकडे लक्ष देत नाही अशा वेळी जमिनीवर व्यवहार करताना त्यांना पुढे कोर्ट कचऱ्यांना सामोरे जावे लागते यावरूनच शासनाला किती हिस्सा द्यावा याचाही निर्णय घेतला जातो .Satbara Utara
जमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी.
- जमीन खरेदी करताना खरेदीदाराने सातबारावर शर्त आणि धारण प्रकार नमूद आहे का हे तपासले पाहिजे .
- त्यानंतर शासकीय अट असल्यास महसूल अधिकाऱ्यांची लेखी परवानगी आहे का?हे पण तपासले पाहिजे
- जमीन खरेदी दराने विक्रेत्याजवळ सर्व आवश्यक परवाने व मंजुरी आहे का?हे ही तपासले पाहिजे .
- व्यवहाराचे सर्व कागदपत्रे कोणत्याही कायदेशीर सल्ला घराकडे तपासून घ्या .
नुकसान टाळण्यासाठी कुठे चौकशी कराल ?
जर तुम्हाला सातबाऱ्यात काही शंका असेल तर, तालुक्यातील तहसील कार्यालयात किंवा भूमी अभिलेख विभाग, जिल्हा निबंधक कार्यालयात जाऊन चौकशी करा .तसेच याशिवाय तुम्हाला, ऑनलाईन सातबारा उतारा पाहण्यासाठी या अधिकृत https://bhulekh.mahabhumi.gov.in/ पोर्टलचा वापर करा .Satbara Utara