she box portal
आपण या लेखांमध्ये she box portal विषयी माहिती पाहणार आहोत. हे पोर्टल शासनाने कशासाठी सुरू केलेले आहे , या फोटोचा उपयोग काय आहे. पोर्टलचा फायदा याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
Table of Contents
Toggleमहिला आणि बालविकास मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी she box portal सुरू केलेले आहे. हे पोर्टल तक्रारीची नोंदणी, देखरेख आणि निराकरण करण्यासाठी एक केंद्रीय कृत व्यासपीठ प्रदान करते.
she box portal माहिती
केंद्रीय मंत्री श्रीमंती अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली शी बॉक्स पोर्टल हे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेले आहे. शी बॉक्स पोर्टल अंतर्गत देशातील कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षाचा प्रश्न लक्षात घेऊन शी बॉक्स पोर्टल सुरू करण्यात आलेली आहे
नवी दिल्ली येथे आयोजित या प्रक्षेपण कार्यक्रमात मंत्रालयाच्या नवीन वेबसाईटचे अनावरणही करण्यात आले .कामाच्या ठिकाणी महिलांच्या सहन कराव्या लागणाऱ्या लैंगिक छळाच्या घटनावर केंद्र सरकारने लक्ष दिलेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या घटना थांबवण्यासाठी शी -बॉक्स पोर्टल नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. जेणेकरून कामाच्या ठिकाणी गेलेल्या महिलांना कुठलेही प्रकारचा त्रास सहन करण्याची वेळ येऊ नये असा या उपक्रमा मागचा उद्देश आहे
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाच्या विरोधात केंद्र सरकारने उचललेले मोठे पाऊल
she box portal हे भारत देशातील कामाच्या ठिकाणी गेलेल्या महिलांच्या लैंगिक छळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे पोर्टल सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात स्थापन केलेल्या अंतर्गत समित्या (lC) आणि स्थानिक समित्या (LC) बद्दल माहिती संकलित करेल. देशातील महिलांसाठी तक्रारी नोंदविणे, त्यांच्या स्थितीचे निरीक्षण करणे तसेच संबंधित अधिकाऱ्याकडून वेळेवर कारवाई करणे यासाठी हा उपक्रम आहे. अत्याचाराच्या तक्रारीवर जलद गतीने प्रक्रिया सुरू करणे आणि तात्काळ कारवाई करणे हा या पोर्टल सुरू करण्यामागचा उद्देश आहे.
तक्रारीची ए एन आय नुसार नियुक्त नोडल अधिकारी तक्रारीची दाखल घेईल. या अगोदर 2017 मध्ये शी बॉक्स पोर्टल हे सुरू करण्यात आले होते. पण त्यास पोर्टलची ही दुसरी आवृत्ती आहे; ज्यामध्ये अनेक सुधारणा सह बदल करण्यात आले केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी गुरुवारी दिल्लीत हे पोर्टल लॉन्च केले. अन्नपूर्णा देवी यांनी कार्यक्रमादरम्यान महिला आणि बाल विकासासाठी एक नवीन वेबसाईट देखील लाँच कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ थांबवण्यासाठी हे मोठे पाऊल असल्याचे सांगितले आणि त्यांनी पोर्टल ला सुरुवात केली.
ती बॉक्स पोर्टल चे फायदे
देशामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना याचा नक्कीच फायदा होईल. ज्या महिला विविध क्षेत्रांमध्ये काम करत होत्या त्यांना आता कसल्याही प्रकारची भीती राहणार नाही. कारण- त्या गुगल वर या पोर्टलचा शोध घेऊन सहज त्यामध्ये प्रवेश करू शकतात . अन्नपूर्णा देवी यांनी असे मत व्यक्त केले की आमच्याकडे खाजगी संस्थांनाही नोंदणी करावी आणि त्यात सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे जेणेकरून तेथे काम करणाऱ्या महिला निर्भयपणे काम करू शकते.
ती बॉक्स पोर्टल ची महिलांना कशी मदत होईल
अन्नपूर्णा देवी यांनी असे स्पष्ट केले की, देशातील कोणत्याही कामाच्या ठिकाणी गेलेल्या महिलांचा लैंगिक छळ झाल्यास महिला त्याबाबतीशी सर्व तक्रार शी – बॉक्स वर नोंदवू शकतील. त्यासाठी दोन प्रकारच्या समित्या स्थापन केल्या जातील. खाजगी संस्थांसाठी एक अंतर्गत समिती स्थापन केली जाईल आणि सरकारी संस्थांसाठी जिल्हा दंडाधिकारी किंवा उपयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक समिती किंवा त्यांच्याद्वारे अधिकारी नियुक्त केला जाईल.
she box portal अंतर्गत तक्रार नोंदविल्यास
जर एखाद्या महिलेने तक्रार नोंदविल्यास तिची ओळख पूर्णपणे गोपनीय आणि त्याद्वारे स्थानिक समिती किंवा अंतर्गत समितीकडे गुन्हा नोंदविला जाईल आणि त्यांच्याकडे वेळोवेळी कारवाई केली जाईल. जेणेकरून नोंदणीकृत प्रकरणाची संख्या आणि तक्रारीच्या टप्प्यावेही मंत्रालयाकडून लक्ष ठेवले जाईल.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.