Shet Rasta Kayda :तुमच्या शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता पाहिजे? तर या पद्धतीने करा मागणी..!

Shet Rasta Kayda : बऱ्याच वेळी असे होते की शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी वाट नसते किंवा वाट असली तरी पण शेजारी मालक जाऊन देत नाही. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी स्वतंत्र शेत रस्त्याची मागणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आता स्वतःच्या शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता मागण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी एक चांगला मार्ग उपलब्ध करून देता येतो. या रस्त्यासाठी एक विशिष्ट अर्ज प्रक्रिया असून, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही मागणी केली जाते.Shet Rasta Kayda

Shet Rasta Kayda

शेत रस्ता का महत्वाचा आहे?

शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी हा रस्ता (Shet Rasta Kayda) खूप महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात वेगवेगळी कामे करण्यासाठी एक रस्ता खूप आवश्यक आहे. शेतीची मशागत, कापणी, पेरणी, सिंचन, खते-औषध फवारणी तसेच शेतातील शेतीमाल बाहेर नेण्यासाठी अशा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्यांना शेत रस्ता खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा शेतजमिनीला सार्वजनिक रस्ता किंवा मुख्य रस्त्याशी थेट जोडणारा रस्ता नसतो. अशावेळी शेतकऱ्यांची शेतातील कामे वेगवेगळ्या कारणांमुळे अडकतात, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा शेत रस्ता स्वतःच्या शेत जमिनीपर्यंत जाण्यासाठी मार्ग पाहिजे असतो.Shet Rasta Kayda

यासाठी काय आहे कायदेशीर तरतुदी?

शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने गांभीर्याने घेतले आहे. महाराष्ट्र भू-राज्य संहिता 1966 च्या कलम 86 नुसार, कोणत्याही शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग उपलब्ध नसेल, तर त्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी किंवा थेट तहसीलदार यांच्याकडे जाऊन अर्ज करून शेत रस्त्याची मागणी करू शकतात

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

शेत रस्त्यासाठी अर्ज कसा करावा?

  • लिखित अर्ज तयार करा

सर्वात प्रथम तुम्हाला एक लिखित अर्ज तयार करावा लागेल या अर्जात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती स्पष्टपणे नमूद करावी लागेल .या अर्जात तुमचं पूर्ण नाव, पत्ता, सातबारा उतारा ची माहिती, संबंधित जमिनीचा गट क्रमांक आणि शेतात जाण्यासाठी सध्या कोणता मार्ग आहे किंवा नाही याबाबत स्पष्ट माहिती द्यावी लागेल

तसेच या अर्जामध्ये तुम्हाला ज्या मार्गाने रस्ता पाहिजे आहे तो मार्ग किंवा कोणाच्या शेतातून जावे लागेल,त्या शेतकऱ्यांचे गट क्रमांक व मालकाचे नाव याचा उल्लेख करावा.

  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा

या अर्जासोबत तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे जोडावी लागते .सातबारा उतारा, जमीन नकाशा(गाव नकाशा किंवा फेराफार पत्र),जर शेजारी मालक रस्ता देण्यास नाकार देत असेल,तर त्याचा लिखित नाकार किंवा माहिती

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria
  • तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा

लिखित तयार केलेल्या अर्ज व आवश्यक लागणारी कागदपत्रे हे सर्व तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल .त्यानंतर तलाठी अर्ज स्वीकारतो आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून अहवाल तयार करतो .हा अहवाल मंडल अधिकाऱ्यांकडे तपासला जातो .

  • तहसीलदारांचा निर्णय

तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केल्यानंतर याचा निर्णय तहसीलदार घेतात .दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून, त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून तहसीलदार स्वातंत्र्यक्षेत्र असता मंजूर करू शकतो .हा रस्ता मंजूर झाल्यानंतर जमिनीवर मोजून नकाशावर दाखवला जातो आणि त्या बदलाची नोंद महसूल अभिलेखात होते .

शेत रस्त्याची मागणी करणे म्हणजे कोणाच्याही मालकी हक्काचे उल्लंघन नाही . याचा उद्देश फक्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे .जर तुम्हालाही कोणाला तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्त्याची अडचण असेल तर तुम्हीया कायदेशीर प्रक्रियेचा वापर करून तुमच्या हक्काचा रस्ता मिळू शकतात .शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे .ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होऊ शकतात. Shet Rasta Kayda

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

Leave a comment