Smart Agriculture: कृषी विभागाच्या कामात येणार वेग: काम होणार स्मार्ट पद्धतीने

Smart agriculture; राज्यातील कृषी विभागाचे कामकाज अधिक स्मार्ट पद्धतीने करण्याचा कृषी विभाग कडून निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक पातळीवरील नियोजन आणि मालमत्तांचे नकाशे यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्यात आलेले आहे. कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचद्र रस्तोगी यांनी कामकाज हाती घेतल्याच्या सुरुवातीपासूनच स्मार्ट कामाला प्राधान्य दिलेले आहे. त्याच कृषी विभागातील कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडून जास्तीत जास्त कामकाज हे ऑनलाईन आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

20250407 225544

कृषी आयुक्त मांढरे यांच्याकडून पेपरलेस कामकाजाला अधिक प्राधान्य दिले जात आहे. यासाठी अनेक तज्ञांची मदत घेऊन दोन ॲप निर्मिती करण्यात आलेले आहेत. हे ॲपच्या माध्यमातून माहिती गोळा केली जात आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर यातील ९५ टक्के माहिती विभागाकडे प्राप्त देखील झालेली आहे.

क्षेत्रीय पातळीवरील आराखडा आता ॲपवर आणला जाणार आहे. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांसाठी विविध 28 उपक्रम राबवली जातील. ते सर्व उपर कामाचे नियोजन ॲपच्या माध्यमातूनच केले जाईल. हे ॲप एप्रिल अखेरपर्यंत चालू होऊन त्यामध्ये आराखडे भरण्याचे काम सुरू केले जाईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

Smart Agriculture

कृषी सहाय्यक यांनी स्थानिक पातळीवर आपण काय काम केले काय काम करणार आहोत याची माहिती जिओ टीव्ही छायाचित्रासह अपलोड करावे लागणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत देखील अचूक नोंद विभागाला प्राप्त होईल.

राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून खूप मोठा आधार मिळत आहे. यामुळे बदलणाऱ्या काळाची पावले ओळखून कामकाज आणि आधुनिक सुविधांचा वापर करण्याकडे सध्या कृषी विभाग जास्त लक्ष देत आहे. कृषी क्षेत्राच्या विकासाची उद्दिष्टे समोर असतानाच त्यासाठी आवश्यक कामाचे नियोजन आणि साधनसामग्रीचा योग्य वापर महत्त्वाचा ठरतो. यामुळेच कृषी विभाग असेट मॅपिंग करत आहे. Smart Agriculture

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

Leave a comment