Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजनेत शेतकऱ्यांची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया आता अधिक गतिमान झाली आहे . परंतु आता काही शेतकऱ्यांचा जॉईंट सर्व्हे (Solar Yojana Joint Survey) होत आहे.यात व्हेंडरची निवड, पेमेंट केल्यानंतर पेमेंट केल्याचा मेसेज,त्यानंतर झालेल्या अर्जाची छाननी आणि त्यानंतरची प्रक्रिया म्हणजे जॉईट
सर्व्हे होय. या महावितरणचे कर्मचारी येऊन आपल्या शेतावर पाहणी केली जाते. यानंतर अहवाल तयार करून पुढील प्रक्रियेसाठी पात्र असल्याचे जाते.
Solar Yojana Joint Survey जॉईन सर्विस होण्यासाठीची प्रक्रिया
ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोलार कृषी पंप योजनेमध्ये (Solar Krushi Pump) अर्ज केलेला होता. आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी पैसे भरले होते. पैसे भरल्यानंतर शेतकऱ्याच्या अर्जाची छाननी झालेली होती. अर्जाची छाननी झाल्यानंतर अर्जामध्ये त्रुटी आढळून आली आहे,त्यांना परत कागदपत्रे अपलोड चे ऑप्शन आलेले आहे आणि त्यांच्या अर्जामध्ये काहीही त्रुटी नाही,अशा शेतकऱ्यांच्या अर्जाचा काय होणार? हे समजून घेऊया …..
अर्जाची छाननी झाल्यानंतर तुम्हाला व्हेंडर निवडीचा पर्याय देण्यात येतो. त्यानंतर तुम्हाला व्हेंडर निवड करून घ्यावी लागते. व्हेंडर ची निवड केल्यानंतर तुमचा जॉईट सर्व्हे (Solar Yojana Joint Survey) होतो .पुढील पायरी म्हणून महावितरण कर्मचारी आणि व्हेंडर कंपनीचे कर्मचारी शेतावर जाऊन पाहणी करतात. त्यानंतर, अहवाल तयार केला जातो आणि शेतकऱ्याची जॉईट सर्विससाठी पात्रता निश्चित केली जाते.जॉईट सर्व्हे केल्यानंतर अर्जदार शेतकऱ्यास साहित्य दिले जातात .जॉईंट सर्व्हे कधी होणार आहे,याबाबत शेतकऱ्यांच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक एसएमएस येत असतो. या मध्ये जॉइट सर्व्हे करणाऱ्या अधिकारी यांचे नाव आणि मोबाइल नंबर देखील देण्यात येतो.
हे वाचा: सोलार योजनेसाठी शेतकऱ्यांनी पेमेंट केले तर सोलर मिळतो का?
जाइंट सर्व्हे म्हणजे काय
ज्या शेतकऱ्यांच्या सौर पंप मिळण्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अश्या शेतकऱ्यांना महावितरण किंवा मेड च्या अधिकारी यांच्या समवेत एक सर्व्हे करणे अवश्यक आहे. या सर्व्हे मध्ये शेतकऱ्यांचे जमीन आणि पाण्याची उपलब्ध सुविधा तपासणी केली जाते. त्या सोबतच जाइंट सर्व्हे अंतर्गत सौर कृषि पंप बसवण्यासाठी अवश्यक जागा उपलब्ध आहे का? या संबंधी सर्व तपासणी पूर्ण केली जाते. हा सर्व्हे करताना शेतकरी आणि महावितरण किंवा मेडा अधिकारी याचा एक सोबत फोटो अपलोड करून जॉइट सर्व्हे प्रक्रिया पूर्ण केली जाते.
जॉईंट सर्व्हे झालेला आहे की नाही,हे कसे तपासायचे?
ज्यांना जॉईट सर्विस( Solar Yojana Joint Survey )झाले आहे का नाही हे तपासायचं आहे, त्यासाठी खालील पद्धती फॉलो करा .
- सर्वप्रथम मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे.
- त्यानंतर तुम्हाला लाभार्थी सुविधांमध्ये अर्जाची सद्यस्थिती तपासा या पर्यावरण क्लिक करावे लागेल .
- आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा लाभार्थी क्रमांक टाकून शोधा या पर्यावरण क्लिक करायचे आहे .
- शोधा या पर्यावरण क्लिक केल्यानंतर पुढील विंडोमध्ये तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दाखवली जाईल .
- तुम्ही जर या अर्जामध्ये पुरवठादार किंवा व्हेंडरची निवड केली असेल तर ते पण या ठिकाणी दाखवले जाईल .
- आता काही जिल्ह्यांमध्ये कंपनी निवडल्यानंतर जॉइंट सर्व्हे सबमिट (Solar Yojana Joint Survey) केले जात आहेत .
- म्हणजेच तुमचाही लवकरच जॉईट सर्व्हे होण्याची शक्यता आहे .