Maharashtra Weather :विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट; राज्यात कुठे कुठे धो धो बरसणार ?
Maharashtra Weather: महाराष्ट्र राज्य मध्ये मागील काही दिवसापासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. आजही राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता देण्यात आली आहे. मान्सून पूर्व पावसाने काल (मंगळवारी) महाराष्ट्राला चांगले झोडपले आहे. पुणे मुंबई राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस , वारा ,गारपीट झाली असून आजही राज्यात वादळी वारा यासह मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. …