मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
आपण आज या लेखांमध्ये मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना याविषयी माहिती पाहणार आहोत. ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री यांनी 14 जुलै 2024 रोजी या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत साठ वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाईल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधानसभेत या योजनेची घोषणा केली . तर आज आपण या लेखामध्ये या योजनेमध्ये पात्रता कोण असेल, अटी व नियम, या योजनेचा उद्देश, आवश्यक लागणारे कागदपत्रे,अर्ज करण्याची पद्धत या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना माहिती
मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी . साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत देशातील विविध धार्मिक स्थळ म्हणजे चार धाम यात्रा, वैष्णवी देवी यात्रा, अंबरनाथ यात्रा, तसेच इतर आदरणीय धर्मीयांचीही मोठे तीर्थस्थळे आहेत जिथे जाण्याची राज्यातील नागरिकांची एकदा तरी इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांचे आर्थिक परिस्थितीमुळे पण त्यांच्या सोबत प्रवास करताना कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे टाळतात. या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. या योजनेअंतर्गत साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली या योजनेची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना वैशिष्ट्ये
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना साठ वर्ष किंवा त्याहून अधिक ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेचा लाभ आहे जेणेकरून त्या वयोवृद्ध माणसांना भारत देशातील विविध धर्मांचे व पंथांचे अनुयायी वास्तव्यास आहेत महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले आणि ज्या विचाराचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते तर अशाच महाराष्ट्रातील साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयोवृद्ध नागरिकांना या योजनेअंतर्गत देशातील हिंदू धर्मात चार धाम यात्रा माता वैष्णवी यात्रा, अमर नाथयात्रा तसेच इतर धर्मांचीही मोठे तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याची संधी अशा वयोवृद्ध नागरिकांना एकदा तरी मिळावी या हेतूने राज्य सरकारने या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची, भक्तिमार्गाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य, भक्ती मार्गाने करीत असतात. आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडीत असताना देखील आपल्या देवदेवतांचे /भगवंतांचे नामस्मरण, चिंतन करीत आयुष्य जगत असतात . तर अशा वयोवृद्ध नागरिकांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजना लाभ
- मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजनेचा लाभ राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लाभ दिला जाईल.
मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजना उद्दिष्टे
- या योजनेचे असे उद्दिष्ट आहे की महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देणे
- मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील.
- सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळा लाभ घेता येईल.
- प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती रु.30,000/-इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल.
मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजना उद्दिष्टे
- या योजनेचे असे उद्दिष्ट आहे की महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देणे
- मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील.
- सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळा लाभ घेता येईल.
- प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती रु.30,000/-इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल.
मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजना पात्रता
- मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजना चा लाभ महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना दिला जाईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक तेच या योजनेसाठी पात्र असतील
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
- मुख्यमंत्री तेथे यात्रा दर्शन योजनेचा कुटुंबातील एकाच व्यक्तीला दिला जाईल अन्यथा दुसऱ्या नाही.
मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजना अर्ज रद्द होण्याची कारणे
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतात त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानीक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबाची उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार /आमदार आहेत असे व्यक्ती पात्र ठरणार नाही.
- लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ते पात्र नाहीत.
- लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबात चार चाकी वाहने असतील तर ती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही पण (ट्रॅक्टर वगळून) इतर कोणतीही चार चाकी वाहने.
- लाभार्थी व्यक्तीला प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगानेग्रस्त नसावे जसे की (टीबी, हृदयात संबंधित श्वसन रोग, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी नसावी अन्यथा या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- या योजनेचा अर्ज भरताना अर्जाची खोटी माहिती भरल्यास ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहणार नाही.
मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजना आवश्यक लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- मतदान ओळखपत्र (शाळा सोडलेले प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला)
- उत्पन्न प्रमाणपत्र
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल क्रमांक
- हमीपत्र.
मुख्यमंत्री तीर्थ यात्रा दर्शन योजना अर्ज करण्याची प्रक्रिया
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्तीला योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाईल ॲप द्वारे/सेतू सुविधा केंद्र द्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात.या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येईल. पण या योजनेची घोषणा 14 जुलै 2024
म्हणजेच कालच झाली असल्यामुळे या योजनेचे अजून पोर्टल किंवा मोबाईल ॲप उपलब्ध नसल्यामुळे या योजनेचा अर्ज आत्ताच करता येणार नाही. जेव्हा या योजनेचे पोर्टल किंवा मोबाईल ॲप राज्य सरकारकडून कळवण्यात येईल तेव्हाआम्ही तुम्हाला या लेखाद्वारे लवकरच अपडेट करू.
2 thoughts on “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र tirth darshan yojana”