today crop rate सोयाबीन: भावावर दबाव कायम
- सध्या बाजार दर: सध्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल 3 हजार 900 ते 4 हजार 100 रुपयाच्या दरम्यान आहे.
- हमीभावाने खरेदी: सरकार खरेदी करत असले तरी ती धीम्या गतीने सुरू असल्याने खुल्या बाजाराला आधार मिळत नाही. या मुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे.
- आंतरराष्ट्रीय बाजार :
- आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात काही प्रमाणात चढ-उतार सुरू आहे. सोयाबीनचे वायदे 9.75 डॉलर प्रति बुशेलवर स्थिर.
- चढ-उतार सुरू असून बाजारातील दबाव कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
today crop rate कापूस: स्थिर बाजार
- देशांतर्गत दर: देशात कापसाच्या बाजारावर सध्या आवकेचा दबाव आहे. सध्या देशातील बाजारात 6 हजार 900 ते 7 हजार 200 प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला
- आंतरराष्ट्रीय बाजार :
- सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. .
- आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी कापसाचे वायदे 68 सेंट प्रति पाउंडवर होते .
- आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा प्रभाव देशातील कापूस बाजारावर जाणवतो.
- आवक स्थिती: कापसाची शिखर आवक सुरू असून आणखी काही आठवडे ती कायम राहील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
हे वाचा: कांदा चाळ अनुदान रखडले कधी मिळणार शेतकऱ्यांना अनुदान
कांदा: बाजार भाव
- खुला बाजार दर: कांदा या पिकाच्या भावामध्ये मागच्या 10 दिवसांमध्ये मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. कांद्याला सध्या 1 हजार ते 2 हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
- भाव घसरण्याचे कारण:
- खरीप कांद्याची काढणी जोरात सुरू.कांद्याच्या भावात मागील 10 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली त्याचे कारण म्हणजे बाजारात सध्या कांद्याची आवक वाढत आहे तसेच खरीप हंगामातील कांद्याची काढणी जोमाने सुरू आहे. पण मात्र, निर्यातीवर 20% शुल्क असल्याने कांदा बाहेर जाण्यात अडचणी निर्माण होत आहेत आणि याचे परिणाम बाजारातील दरावर दिसत आहेत..
- मागील 10 दिवसांत भाव निम्म्यावर आले असून, आवक वाढल्याने नरमाई कायम राहील, असा अंदाज बाजार अभ्यासक तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
today crop rate ज्वारी: दबावाखाली बाजार
- खुला बाजार दर: सध्या राज्यातील बाजारात ज्वारी ला सरासरी प्रतिक्विंटल 2 हजार 100 ते 2 हजार 600 रुपयांचा भाव मिळत आहे.
- स्थितीचे कारण:
- वाढलेले उत्पादन आणि आवक यामुळे दरावर परिणाम.
- सध्याचे दर हमीभावाच्या तुलनेत 20% कमी.
- रब्बी ज्वारीची शक्यता: रब्बी ज्वारीचा पेरा वाढण्याचा अंदाज असल्याने भावावर आणखी दबाव येऊ शकतो.
today crop rate लसूण : बाजार
- घाऊक बाजार दर: बाजारामध्ये लसणाची आवड खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे लसणाच्या भावामध्ये चांगलीच तेजी पहायला मिळते. लसणाला घाऊक बाजारात 24 हजार ते 28 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे .
- स्थितीचे कारण:
- मर्यादित उपलब्धता आणि वाढलेली मागणी.
- उच्च दरांमुळे उठाव काहीसा कमी झाला आहे, परंतु सध्याची स्थिती काही दिवस टिकेल, असा अभ्यासकांचा अंदाज.
today crop rate निष्कर्ष:
- सोयाबीन, कापूस, आणि ज्वारीच्या बाजारपेठांवर दबाव कायम आहे.
- कांद्याचे भाव नरमले असून आवकेमुळे ही स्थिती टिकेल.
- लसूण मात्र तेजीत आहे, आणि भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील बदलत्या स्थितीचा आढावा घेत निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.