weather maharashtra महाराष्ट्रात एक ते दोन दिवसात अनेक जिल्ह्यात वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटची शक्यता?

weather maharashtra सध्या कोणाचं वातावरण सुरू असताना मार्च महिन्यापासूनच राज्यात कडक ऊन पडायला सुरुवात झाली आहे. या बदलत्या ऋतूमध्ये आता राज्यात वातावरणात मोठा बदल होणार असल्याचे हवामान खात्याने माहिती दिली आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

राज्यात वातावरणात अचानक मोठा बदल होऊन अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 21 आणि 22 मार्च दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

weather maharashtra

राज्यातील अनेक जिल्ह्यात वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता.

weather maharashtra राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. यामुळे पिकांच्या नुकसानीची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या अरबी समुद्रात अत्यंत कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत.

यामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात ही लवकरच वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर काही जिल्ह्यातील वातावरणामध्ये बदल न होता जास्त उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे .

हे वाचा :

अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात काही भागांमध्ये प्रती तास 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

राज्यात तापमान तर काही जिल्ह्यातील वातावरणात बदल

मागील काही दिवसापासून राज्यात तापमान वाढ झाली आहे . सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हा 40 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास आहे . तर काही जिल्ह्यात पारा यापेक्षा जास्त गेला आहे . त्यामुळे सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळते .
तर येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात अचानक बदल पाहायला मिळणार आहे . काही जिल्ह्यात जोरदार वादळी वारे आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे . अरबी समुद्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील वातावरणात हा बदल होण्याची शक्यता दिसत आहे .

कोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस? weather maharashtra

महाराष्ट्रात हवामान खात्याने जो अंदाज दिला आहे त्या अंदाजे नुसार आता राज्यात काही जिल्ह्यांमध्ये 21 मार्च आणि 22 मार्च दरम्यान घट होऊन उष्णता कमी होणार असून,गारपीट सह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये 21 आणि 22 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. वाशीम आणि यवतमाळमध्ये देखील 21 मार्चला अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस उसळण्याची आणि गारपीटची सुद्धा शक्यता वर्तविण्यात आली असल्या मुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची आपल्या पिकासंदर्भात चिंता वाढलेली आहे. weather maharashtra

ब्रह्मपुरी येथे मंगळवारी राज्यात सर्वाधिक वाढते तापमान आणि यलो अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तापमान झपाट्याने वाढत आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक 41.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये 39 डिग्री सेल्सिअस तर इतर अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे. या वाढत्या तापमानामुळे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.weather maharashtra

Leave a comment

Close Visit Batmya360