Weather Update :विजांच्या कडकडाटसह पुढील 5 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Weather Update : महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मराठवाड्यात मागील चार दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाळी पिक आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे . महाराष्ट्र राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे.

Weather Update

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सूनच्या प्रगतीसाठी येत्या दोन ते तीन दिवस वातावरण अनुकूल राहणार आहे .यामुळे नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन , अंदमान आणि मध्य बंगालच्या उपसागरात आणखीन विस्तारण्याची शक्य दर्शविण्यात आली आहे .Weather Update

हे वाचा : घरकुल बांधकामासाठी मोफत वाळू; घरपोच मिळणार…!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

तापमानात घट आणि राज्यात अलर्ट जारी

पूर्व मोसमी पावसामुळे राज्यात तापमानात घसरण झाली आहे .यामुळे हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना येल्लो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे .तर, विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे .यामुळे वातावरणात बदल जाणवत असून सध्या गारवा निर्माण झाला आहे .Weather Update

या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

आज 17 मे रोजी (शनिवारी) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,जळगाव हे जिल्हे वगळता मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे यामध्ये ,परभणी, बीड नांदेड लातूर धाराशिव आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये ढगांच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर इतर जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे .Weather Update

पुढील काही दिवस पाऊस कायम

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , पुढील तीन दिवस ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे जळगाव हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह, ढगांच्या आणि विजांच्या कडकडाटसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे . यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे असे आव्हान हवामान विभागाकडून करण्यात आले आहे .Weather Update

Leave a comment