yojanadoot payment: राज्य शासनाने राज्यातील सरकारी योजनांचे प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एक व शहरी भागासाठी 5000 लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात योजना दूध हे पद भरले या पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
या योजना दूतांना शासनाकडून प्रति महिना 10000 हजार रुपये एवढे मानधन वितरित केले जाणार आहे. आता या मानधनाबाबत शासनाकडून एक खळबळ जनक बाब समोर आली आहे. ती म्हणजे या योजनादूत यांना आता पेमेंट (मानधन) वितरित केले जाणार नाही. मानधन वितरित न करण्यामागील नेमकं कारण काय त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आत्ता या लेखात पाहणार आहोत.
योजनादूतांची नेमणूक कशी व कोठे करण्यात आली
राज्य शासनाने कौशल्य विकास व रोजगार निर्मिती विभागामार्फत राज्यांमध्ये 50 हजार योजना दूत नियम होण्याचे ठरवले या माध्यमातून अर्जही मागवण्यात आले या अर्जातून निवड देखील करण्यात आली. निवड झालेल्या योजना दूतांना कामकाजाबद्दलचे प्रशिक्षण देण्यात आलं आणि या योजना दूतांना प्रति महिना दहा हजार रुपये एवढे मानधन देण्याचे देखील घोषित करण्यात आलं.
हे वाचा: आचार संहिता म्हणजे नेमके काय?
yojanadoot payment का नाहि मिळणार मानधन
राज्यात आचारसंहिता लागली असल्यामुळे राज्यातील शासकीय योजनांची प्रसार व प्रसिद्धी करणे नियमबाह्य आहे. त्यामुळे या योजना दूतांना कसल्याही प्रकारचं कामकाज करता येणार नाही. कामकाज न करता आल्यामुळे या योजना दूतांना मानधन देखील वितरित केलं जाणार नाही. याबद्दलची स्पष्टता देखील महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अकाउंट वरून करण्यात आली आहे. सर्व योजनादूत यांना याबद्दलची सूचना देण्यात आली आहे.
कधी पर्यंत नाही मिळणार मानधन.
yojanadoot payment राज्यातील आचारसंहितेचा कालावधी हा 15 ऑक्टोबर पासून 23 नोव्हेंबर पर्यंत जाहीर करण्यात आला आहे. आचार संहिता या काळामध्ये योजना दूत यांना कसलेही प्रकारचं शासकीय योजनांची प्रसार व प्रसिद्धी करता येणार नाही. त्यामुळे या योजना दूतांना या आचारसंहितेच्या काळामध्ये कसल्याही प्रकारचा निधी मानधन स्वरूपात दिला जाणार नाही. अशी सूचना देखील देण्यात आली आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर शासनाकडून या योजना दूतांना मानधन वितरित केलं जाईल आणि कामाचा स्वरूपही दिलं जाईल. त्यांच्यामार्फत शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसिद्ध या नुसार कामकाजाचे स्वरूप पाहून योजनादूत यांना मानधन देखील वितरित केलं जाईल yojanadoot payment. परंतु सद्यस्थितीमध्ये आचारसंहिते काळातील मानधन कसल्याही स्वरूपात मिळणार नाही. त्यासोबतच यांना कसल्याही प्रकारचं कामकाज देखील करता येणार नसल्याची माहिती देखील समोर आली आहे.