विश्वकर्मा शिलाई मशीन प्रशिक्षण येथे दिले जाते प्रशिक्षण.  

विश्वकर्मा शिलाई मशीन प्रशिक्षण येथे दिले जाते प्रशिक्षण.

केंद्र सरकारकडून विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना विविध असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रशिक्षण व साहित्य खरेदी तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र सरकारकडून पीएम विश्वकर्मा ही योजना राबवण्यात आली या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक भागातून विविध घटकांसाठी जसे की सोनार कुंभार लोहार शिंपी धोबी अशा विविध असंघटित कामगारांना नोंदणी करून साहित्य खरेदीसाठी 15000 रुपये आर्थिक सहाय्य व प्रशिक्षणा दरम्यानचे प्रति दिवस पाचशे रुपये याप्रमाणे निधी वितरित केला जातो बऱ्याच जणांना हे प्रशिक्षण कधी कोठे व कशा स्वरूपात घेतले जाते याबद्दलची माहिती नाही आजच्या लेखातून आपण विश्वकर्मा योजना अंतर्गत मिळणारे प्रशिक्षण कधी व कोठे दिले जाते याबद्दलची माहिती घेणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मोफत शिलाई मशिन योजना, अर्ज केलाय पण आता पुढे काय

विश्वकर्मा शिलाई मशीन प्रशिक्षण कोणाला दिले जाते.

विश्वकर्मा योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत त्यांचे त्यांच्या ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद स्तरावर पहिली तपासणी केली जाते त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत त्यांची दुसरी तपासणी केली जाते या तपासणीनंतर जे अर्ज मंजूर झाले ते अर्ज कौशल्य विकास विभागाकडे पाठवले जातात कौशल्य विकास विभागाकडून अर्जदारांना ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षण देण्यासाठी ठिकाण व वेळ निश्चित केली जाते त्यानुसार त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येते.

प्रशिक्षण कोठे असते

विश्वकर्मा शिलाई मशीन प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांची प्रशिक्षण घेणे करीता निवड झाली आहे त्याला आभार त्यांना कौशल विकास विभागामार्फत स्थान व वेळ निश्चित केली जाते हे प्रशिक्षण आपल्या भागातील जे आयटीआय कॉलेज आहे त्या ठिकाणी याचा आयोजन कौशल्य विभाग मार्फत केले जाते कारण त्या ठिकाणी प्रशिक्षणा दरम्यान आवश्यक लागणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध असतात त्यामुळे आपल्या जवळील आयटीआय कॉलेज यामध्ये आपले प्रशिक्षण निश्चित केले जाते ज्या कॉलेजमध्ये निश्चित केला आहे त्या कॉलेजचे नाव तसेच पत्ता आपल्याला एसएमएस द्वारे पाठवण्यात येतो

विश्वकर्मा शिलाई मशीन

या स्वरूपात असते प्रशिक्षण.

ज्याला लाभार्थी यांना प्रशिक्षण निश्चित झाला आहे त्यांना वेळ व स्थान दिले जाते त्यावेळी लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे लाभार्थी हजर झाल्यानंतर लाभार्थ्याची त्या ठिकाणी राहण्याची तसेच खाण्याची व्यवस्था केली असते त्यासोबतच अर्जदार लाभार्थी ज्या घटकासाठी अर्ज केला आहे त्या घटकाचा त्याला प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला त्या ठिकाणी परीक्षा द्यावी लागते ही परीक्षा म्हणजे लेखी स्वरूपात नसून प्रात्यक्षिक स्वरूपात असते ज्यामध्ये ट्रेनिंग दरम्यान जे शिकवलं आहे त्यावरच ही परीक्षा आयोजित केलेली असते. ही परीक्षा पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्याला प्रमाणपत्र देखील दिले जाते.

विश्वकर्मा शिलाई मशीन प्रशिक्षण दरम्यान मिळणारी रक्कम कधी जमा होते.

लाभार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला प्रशिक्षण पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट वितरित केले जातात त्यानंतर प्रशिक्षण दरम्यान प्रति दिवस पाचशे रुपये व प्रवास भत्ता एक हजार रुपये या प्रमाणात जी रक्कम दिली जाते ती प्रमाणपत्र मिळाल्यापासून दोन ते तीन दिवसात लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाते.

साहित्य खरेदीसाठी पंधरा हजार रुपये दिले जातात

ज्या लाभार्थ्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्याला आभार त्यांना ज्या घटकांतर्गत अर्ज केला आहे त्या घटकासाठी साहित्य खरेदी साठी अर्थसहाय केले जाते हे अर्थसहाय पंधरा हजार रुपये प्रति व्यक्ती या प्रमाणात केले जाते याकरिता लाभार्थ्यांनी आपल्या प्रशिक्षण पूर्ण केले असते गरजेचे आहे ज्या लाभार्थ्यांनी आपले प्रशिक्षण तसेच प्रशिक्षण दरम्यान घेण्यात आलेली परीक्षा यामध्ये उत्तीर्ण असल्यास लाभार्थ्याला ही रक्कम वितरित केली जात नाही. विश्वकर्मा शिलाई मशीन प्रशिक्षण

Leave a comment