अभिनव कर्ज योजना
नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी तंत्रज्ञान माहितीमध्ये आज आपण अभिनव कर्ज योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत . या अभिनव कर्ज योजनेचा लाभ कोणाला घेता येईल, याचे फायदे काय, हे कर्ज कशासाठी दिली जाते. याची सविस्तर माहिती आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा जेणेकरून या योजनेचा लाभ घेता येईल.
Table of Contents
Toggleअभिनव कर्ज योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल योग्य तो भाव येईपर्यंत त्या मालाची साठवणूक करण्यासाठी शेतकरी आपली उत्पादने वाकर महामंडळाच्या गोदामात ठेवतात. अशा मालाच्या तानावर, मूल्याच्या 70 टक्के इतका कर्जपुरवठा केवळ 9% व्याज दराने करण्याचे धोरण राज्य सरकारी बँकेने आखले आहे. अशी माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ठेवलेल्या मालावर केवळ चारच तासात कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
अभिनव कर्ज योजना माहिती
शेतकऱ्यांना शेतीमध्ये कोणतेही पीक घेण्यासाठी पैशांची गरज असते. बियाणे, खत, फवारणी व शेतामध्ये लागणारी मजूर. यासाठी शेतकऱ्यांना सर्वात अगोदर पैशांची गरज असते.त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. मग कर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. बरेच वेळा बँकेच्या नियमांची पूर्तता करून करून बऱ्याचशा दिवस वाट पाहावी लागते. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे की राज्य बँकेने एक नवीन कर्ज योजना अमलात आणलेली आहे. ती कर्ज योजना म्हणजे अभिनव कर्ज योजना आहे.
या कर्ज योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना फक्त 4 तासांमध्ये कर्ज मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता कोठेही फेऱ्या मारण्याची किंवा वाट पाहण्याची गरज पडणार नाही चला तर आज आपण या लेखांमध्ये या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अभिनव कर्ज योजनेअंतर्गत 4 तासांमध्ये कसे मिळणार शेतकऱ्यांना कर्ज
राज्य बॅंकेने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अभिनव कर्ज योजना सुरू केलेली आहे. या कर्ज योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 4 तासांमध्ये कर्ज दिले जाणार आहे. ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर आणि पटकन कर्ज देणारी योजना आहे. कर्जाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील शेतमालाला चांगला भाव येईपर्यंत आपल्या शेतमालाचे साठवणूक वखार महामंडळाच्या गोदामा त ठेवावा लागेल तर यावर शेतकऱ्यांना मूल्याच्या 70 टक्के इतका कर्जपुरवठा केवळ 9 टक्के व्याजदराने देण्यात येईल हा कर्ज पुरवठा राज्य सरकारी बँकेने आखलंय. यामुळे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार तासांमध्ये कर्ज (bank Loan)उपलब्ध होईल.
अभिनव कर्ज योजनेचे उद्देश
अभिनव कर्ज योजनेचे असे उद्देश आहे की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पटकन कर्ज उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच बरेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माल विकायचा नसतो. पण पैशांची अडचण असल्यामुळे तो माल विकावा लागतो . आणि त्या शेतकऱ्यांना त्यावेळी योग्य तो भाव मिळत नाही . त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते. यामुळे राज्य सरकारी बँकेचे असे उद्देश आहे की अभिनव कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे.
अभिनव कर्ज योजना वैशिष्ट्ये
- राज्य सरकारी बँक अंतर्गत शेतकऱ्यांना मालाच्या तारणावर, मूल्याच्या 70% इतका कर्ज पुरवठा अभिनव कर्ज योजनेअंतर्गत दिले जाते.
- शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जावर 9% टक्के व्याजदर करण्याचे धोरण राज्य सरकारी बँकेने मंजूर केलेले आहे.
- आतापर्यंत या योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या एकूण 4,543 अर्जाद्वारे बँकेने रु.100 कोटी अर्ज वितरणापैकी एकूण 2,555 शेतकऱ्यांनी सुमारे 55 कोटी इतक्या कर्जाची परतफेड केली आहे . आणि उर्वरित 1,988 शेतकऱ्यांकडे 45 कोटींची येणे बाकी आहे.
- या योजनेअंतर्गत चार तासांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध केली जाईल.
अभिनव कर्ज योजना लाभार्थी
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अभिनव कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.
अभिनव कर्ज योजना फायदे
- अभिनव कर्ज योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारेल
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारी बँकेकडून कर्ज दिले जाईल. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जाण्याची गरज पडणार नाही.
- राज्यातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतातील माल
- भाव नसेल त्यावेळेस विकण्याची गरज पडणार नाही.
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना पटकन कर्ज दिले जाईल म्हणजे चार तासांमध्ये कर्ज देण्यात येईल.
अभिनव कर्ज योजना पात्रता
- अभिनव कर्ज योजनेचे पात्रता महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आहेत.
- या योजनेसाठी पात्रता फक्त शेतकरीच राहतील.
- अभिनव कर्ज योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांन आपल्या शेतातील मालाची साठवणूक वखार महामंडळाच्या गोदामात करावी लागेल तर तो शेतकरी कर्ज घेण्यासाठी पात्रता असेल.
स्मार्ट कॉटन योजने अंतर्गत साठवणूक
कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे गट या योजनेमध्ये स्थापन केले जाणार आहे. त्यासाठी महामंडळातर्फे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाची प्रत उंचविण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अशा कापसाचे जिनिंग प्रेसिंग करून त्यांच्या गाठी बनविणे, योग्य भाव येईपर्यंत त्यांच्या मालाची साठवणूक महामंडळाच्या गोदामामध्ये करणे, अशा कापसाचे योग्य वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर ई – ऑक्शन द्वारे विक्री करणे ही सर्व कामे महामंडळाकडून करण्यात येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर स्मार्ट कॉटन योजनेअंतर्गत साठवणूक केल्या जाणाऱ्या कापसाच्या कारणावर अत्यंत तातडीने कर्ज मंजूर व वितरण करून देण्याची योजना, कापूस महामंडळ व ब्लॉक चेनच्या सहकार्याने राज्यातर्फे लवकरात लवकर राबवण्यात येणार आहे.
अभिनव कर्ज योजना आवश्यक लागणारे कागदपत्रे
- संबंधित वाकर केंद्रद्वारे बँकेने पुरस्कृत केलेल्या विविध नमन्यातील अर्ज.
- आवश्यक कागदपत्राची पूर्तता वापर महामंडळाकडून केली जाते.
- तसेच आधार कार्ड
पॅन कार्ड - रहिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
अर्ज करण्याची पद्धत
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या राज्यामधील 202 ठिकाणी वखार केंद्र मधून शेतकऱ्यांनी ठेवलेल्या मालधान्यपोटी त्यांना कर्जाची आवश्यकता असल्यास, संबंधित वखार केंद्रद्वारे बँकेने सादर केलेल्या विहित नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक कागदपत्राची पूर्तता वखार महामंडळाकडून केली जाते.
(आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो, मोबाईल क्रमांक इत्यादी) के. वाय. सी. नुसार आवश्यक कागदपत्राचे पूर्तता एकदाच केली जाणार आहे. सादर केलेली सर्व डॉक्युमेंट्स ब्लॉक चेन प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने बँकेस प्राप्त होते. कागदपत्राचे छाननी होऊन, संबंधित गोदाम पावतीवर ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या कर्ज बोजाची नोंद होते . त्यानंतर वखार महामंडळाने ठरवलेल्या मूल्याच्या 70 टक्के इतकी रक्कम लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यावर आरटीजीएस/एनईएफटीद्वारे कर्जाची रक्कम वितरित केली जाते. या सर्व प्रोसेस मध्ये जास्तीत जास्त 4 दिवसाचा कालावधी लागतो. या सर्व प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याला बँकेमध्ये जावे लागत नाही.
कर्जाची मुदत 6 महिने असल्याने , सदर मुदतीत आवश्यकतेनुसार कर्जाची परतफेड करून शेतकरी आपल्या मालाची सोडून व विक्री करू शकतात .
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
Mla kar pahije
Mla karj pahije