राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसाय बरोबर त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी नवीन योजनेची सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत महत्वपूर्ण असलेल्या दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेला मंजुरी 16 सप्टेंबर 2024 रोजी देण्यात आलेली आहे. तसेच 13 ऑगस्ट 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाने विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मंजुरी दिलेली होती, ज्यामध्ये उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या दुधाळ गाईचे आणि भृण प्रत्यारोदित कालवडीचे शेतकऱ्यांना अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे.
गाय म्हैस वाटप योजनेची माहिती
राज्य मंत्रिमंडळाने विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये 16 सप्टेंबर रोजी दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविण्यात मंजुरी दिलेली आहे. राज्याची अर्थव्यवस्था 2028 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचविण्यासाठी ज्या 7 घटकांना चालना देण्याची आवश्यकता स्पष्ट केली आहे, त्यामध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायांचा समावेश आहे. शेतीपूरक व्यवसायामध्ये या विभागाशी संबंधित असलेल्या दुगंध व्यवसायाचा समावेश करण्यात आलेला आहे.
योजनेची उद्दिष्टे
- या योजनेचे असे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांच्या दारात गाई – म्हशीमध्ये पारंपरिक पद्धतीच्या तसेच, लैंगिक वर्गी कृत केलेल्या गोठीत रेतमात्राचा वापर करून कृत्रिम रेतनाची सुविधा तसेच भृण प्रत्यारोपणद्वारे दुधाळ जनावरांची संख्या वाढवणे असे या योजनेचे उद्दिष्टे आहेत.
- शेतकरी आणि पशुपालन यांना संतुलित आहार सल्ला देणे, वैरण विकास कार्यक्रम आणि दर्जेदार चारा पुरवठा करून पशूंच्या आहार पद्धतीत सुधारणा करणे.
- या योजनेअंतर्गत गाव पातळीवर पशु आरोग्य सेवा पुरविणे.
- तसेच उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या गाई- म्हशीचे वाटप करणे.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांची आर्थिक स्थिती वाढविण्यास मदत करणे.
- या योजनेअंतर्गत एक चांगली रोजगार निर्मितीची संधी निर्माण करणे.
गाय म्हैस वाटप प्रकल्प अंतर्गत नऊ घटकांचा समावेश
गाय म्हैस वाटप विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये सण 2024- 25-26-27 या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच 2 वर्षानंतर मागील दोन वर्षाचा आढावा घेऊन सण 2026-27 मध्ये प्रकल्प राबविण्याबाबत विभागाच्या स्तरावर निर्णय घेण्यात येईल.
दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत विविध 9 घटकांचा समावेश खालील प्रमाणे दिलेला आहे.
- उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या दुधाळ गायी – म्हशीचे शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे. त्याच्यासाठी 13400 गाई म्हशींचे शेतकऱ्यांना 50 % अनुदानावर वाटप केले जाणार आहे.
- 1,000 उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडीचे शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर दिले जाणार आहे.
- 1लाख पशु प्रजनन खाद्य चा पुरवठा 75 टक्के अनुदानावर आणि 25% लाभार्थी हिस्सा घेऊन होणार आहे.
- 33 हजार दुधातील फॅट व एसएनएफ वर्धक खाद्यांचे वाटप देखील 75 टक्के अनुदानासह करण्यात येणार आहे.
- बहुवर्षीक चारा पिकांसाठी शंभर टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे.
- तसेच शेतकऱ्यांना कडबा कुट्टी साठी सुद्धा 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
- 30 टक्के अनुदानावरती मुरघासाच वाटप देखील शेतकऱ्यांना याच योजनेअंतर्गत केले जाणार आहे
अशा पद्धतीने विदर्भ व मराठवाड्यातील दुग्ध विकास प्रकल्प 19 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
गाय म्हैस वाटप योजनेचे पात्रता आणि निकष
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी दोन दुधाळ जनावरे असावी.
- दूध उत्पादकाने मागील वर्षभरात किमान तीन महिने खाजगी/सरकारी यांच्या दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे, असे शेतकरी दुसऱ्या टप्प्यात सदर घटकांचा लाभ घेण्यास पात्र ठरणार नाही.
- या योजनेसाठी कुटुंबातील एकच व्यक्ती निवडीसाठी पात्र राहील.
- या योजनेसाठी एका गावातील जास्तीत जास्त पाच लाभार्थी निवडीस पात्र राहतील.
गाय म्हैस वाटप खरेदी व अनुदान वाटप
- दुधाळ जनावरे खरेदी करताना शेतकरी राष्ट्रीय दुग्ध विकास मंत्रिमंडळाची सेवा घेतील किंवा ते खुल्या बाजारातून उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई -म्हशीची खरेदी करू शकतील.
- प्रति गाय/म्हशीची किंमत सर्वसाधारणपणे एक लाख रुपये इतकी गृहीत धरण्यात आलेली असून, त्यामध्ये दुधाळ जनावरांसाठी डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम व दुधाळ जनावरांच्या वाहतुकीचा खर्च व 03 वर्षाचा विमा याबाबतीचा समावेश राहील.
- लाभार्थ्यांना यासाठी 50% किंवा 50 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय राहील.
- गाय/म्हैस खरेदीचा पुरावा व विमा पावती सादर केल्यानंतर त्याबाबत भारत पशुधन प्रणाली वर खातरजमा केल्यानंतर संबंधित जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त यांच्याकडून लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्यात येईल.
- संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त यांनी प्रकल्प अंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या गाई – म्हशींचा स्वतंत्र तपशील ठेवण्यात येईल.
योजनेच्या अटी व शर्ती
गाय म्हैस वाटप खालील दिलेल्या अटी व शर्ती चे लाभार्थ्यांनी पालन करावे.
- या योजनेअंतर्गत एका लाभार्थ्यास प्रकल्पाच्या कालावधीत प्रतिदिन किमान आठ ते दहा लिटर दूध उत्पादन क्षमता असलेली 1 गाय/ म्हशीचे वाटप करण्यात येईल.
- लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणारा दुधाळ जनावरांना Digital Tracking Cow Collar लावणी आणि जिओ टॅगिंग करणे बंधनकारक राहील.
- या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना गाय /म्हशीचे वाटप करण्यात येईल त्या शेतकऱ्यांना 3 वर्षापर्यंत गाय/ म्हैस विकता येणार नाही.
- वाटप केलेली गाय/ म्हैस प्रकल्प संचालक, विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यांचे नावे तारण ठेवण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे जनावरे खरेदी करताना त्या जनावरांचा तीन वर्षासाठी विमा उतरविणे बंधनकारक राहील.
- विमा उतरविलेले दुधाळ जनावर मृत पावल्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करणे अनिवार्य राहील. रोग प्रतिपूर्ती करण्यात येणार नाही .
गाय म्हैस वाटप योजनेची अंमलबजावणी
या योजनेची अंमलबजावणी विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी होईल. शेतकऱ्यांना या योजनेतून मोठे आर्थिक अनुदान मिळणार आहे. ज्यामुळे दुग्ध उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. आणि तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये पण वाढ होण्यास मदत होईल.
उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे शेतकऱ्यांना वाटप
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या कालवडींचे 75 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1,000 लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना या कालवडींचा लाभ दिला जाणार तसेच याबरोबर, फर्टिलिटी फीड आणि दुधातील फॅट एस एन एफ वर्धक खाद्य पुरवठ्याचे अनुदानही देण्यात येणार आहे .
कालवडींचे वाटप, पात्रता आणि निकष
75% अनुदानावर शेतकऱ्यांना उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या कालवडींचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांपैकी माननीय 5 जानेवारी असावीत. तसेच या योजनेअंतर्गत गर्भधारणेच्या प्रमाणामध्ये सुधारणा करण्यासाठी फलट्रिलिटी फीड पुरवठा देखील योजनेतून केला जाईल. यासाठी एकूण एक हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.
गाय म्हैस वाटप अनुदान
60 दिवसासाठी गाई मशीन साठी प्रतिदिन पाच किलोग्रॅम फर्टिलिटी पूरक खाद्य देण्यात येणार आहे. या खाद्याची किंमत प्रति किलो 35 रुपये असेल. प्रत्येक जनावराला 9,600 रुपयांचे खाद्य देण्यात येईल, त्यासाठी शेतकऱ्यांना 25 टक्के अनुदान दिले जाणार आहे. ही खाद्य शेतकऱ्यांनी खरेदी केल्यानंतर अनुदानाची रक्कम त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाईल.
दुधातील फॅट एसएनएफ खाद्य
शेतकऱ्यांना 25% अनुदानावरती दुधातील फॅट एसएनएफ वर्धक खाद्य पुरवठ्यासाठी दिले जाणार आहे. 4500 रुपये खाद्य प्रत्येक गाई म्हशीसाठी दिले जाईल. यासाठी 200 रुपये दर निश्चित करण्यात आलेला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना या अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा केली जाईल.
चारा पीक आणि कडबा कुट्टी अनुदान
या योजनेअंतर्गत 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारा पीक लागवडीसाठी आणि कडबा कुट्टी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेत 22,000 एकर क्षेत्रावर बहुवर्षीक चारा पीक लागवडीसाठी शंभर टक्के अनुदानावर ठोंबाच्या बियाण्याचे वितरण करण्यात येईल. तसेच या योजनेअंतर्गत कडबा कुट्टी यंत्रणासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
चारा पीक लागवडीसाठी अनुदान
19 जिल्ह्यातील 22,000 लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 6,000 ठोंबाच्या बियाणाचे शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी चार दुधाळ जनावरे असावेत आणि एक एकर जमीन आवश्यक आहे. त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
कडबा कुट्टी अनुदान
या योजनेअंतर्गत कडबा कुट्टी यंत्रणासाठी 15,000 रुपयांचे अनुदान दिले जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांना 30 हजार रुपये किमतीची कडबा कुट्टी ग्राह्य धरली जाईल. या योजनेअंतर्गत 10,000 कडबा कुट्टी यंत्र वाटप केले जाणार आहे. लाभार्थ्याने आयएसआय मार्क असलेले किमान दोन एचपी चे यंत्र खरेदी करणे आवश्यक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी खरेदी केलेली पावती जीएसटी क्रमांकासह सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाईल.
शेतकऱ्यांसाठी नऊ महत्त्वाच्या योजनांचा समावेश
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन शासनाच्या माध्यमातून योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विविध बाबींचा समावेश करून उच्च दूध उत्पादन, चारा पीक, मुरघास वाटप, वंध्यत्व निवारण, आणि दुग्ध व्यवसायात प्रगतीसाठी लाभ दिला जाणार आहे.
गाय म्हैस वाटप योजनांची सविस्तर माहिती
गाय म्हैस वाटप या योजनेअंतर्गत मुरघास वाटपासाठी प्रति दुधाळ जनावराला रोज पाच किलोग्रॅम मुरघास दिला जाईल. ज्यामध्ये प्रति किलो तीन रुपया अनुदान दिले जाणार आहे. तसेच या योजनेमध्ये 33 हजार लाभार्थ्यांना सहभागी केले जाईल.
तसेच गाय म्हैस वाटप या योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख गाई म्हशीवर या आधुनिक थेरपीद्वारे उपचार केला जाईल.
या गाय म्हैस वाटप योजने अंतर्गत आधुनिक दूध व्यवसायात शेतकऱ्यांची प्रगती व्हावी म्हणून 19 जिल्ह्यातील 36,000 शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गाय म्हैस वाटप योजनेचा निधी
राज्य शासन गाय म्हैस वाटप या योजनेसाठी 328 कोटी 42 लाख रुपये तर शेतकरी 179 कोटी 16 लाख रुपये निधी उपलब्ध करणार आहे. याची अर्ज प्रक्रिया अजून सुरू नाही पण लवकरात लवकर सुरू होईल अर्ज प्रक्रिया सुरू होताच तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोण कोणती लागतात याबद्दल माहिती अपडेट मध्ये लवकरात लवकर दिली जाईल.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
1 thought on “गाय म्हैस वाटप नवीन योजना पहा सविस्तर माहिती”