मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असा करा अर्ज
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत सर्व धर्मीयांमधील दर्शनाचा लाभ देण्याचे ठरवलेला आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्ष किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांची मोफत दर्शन घेण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. राज्य सरकारने घेतलेला निर्णय ही ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना माहिती
मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन या योजनेची घोषणा 14 जुलै 2024 रोजी करण्यात आलेली आहे. ही घोषणा सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केलेली आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्ष किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे मोफत दर्शनाचा लाभ दिला जाणार आहे.
किती तीर्थस्थळांचा समावेश असणार आहे?
मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील एकूण 73 तर महाराष्ट्रातील 66 अशी एकूण 139 तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थस्थळांचे दर्शनाचा लाभ दिला जाणार आहे. तर देशातील 73 तीर्थस्थळांची दर्शनाचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक तीर्थदर्शनाची खूप मोठी संधी आहे. जेणेकरून या जेष्ठ नागरिकांनी तीर्थस्थळावर जाऊन मोफत दर्शन घेता येईल. देशभरातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यात यावे यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. यामुळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
तीर्थयात्रा दर्शनासाठी कोणकोणती सुविधा, आणि किती लाभ दिला जाईल
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना दर्शनासाठी 60 वर्ष किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत दर्शनाचा लाभ दिला जाईल. तसेच या योजनेअंतर्गत देशातील किंवा राज्यातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून निश्चित केलेल्या तीर्थस्थळांपैकी एका यात्रेसाठी पात्र व्यक्तीला या योजनेचा एकच वेळा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला प्रवास खर्च कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30 हजार रुपये देण्यात येणार आहे.
तसेच या व्यतिरिक्त भोजन, प्रवास, निवास इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक 75 वयावरील असल्यास त्या नागरिकांसोबत जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एक जणांना न्यायची परवानगी आहे .
जीआर व अधिक माहितीसाठी : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
कोण कोणत्या तीर्थयात्रेचा समावेश केलेला आहे
मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन योजनेच्या माध्यमातून हिंदू धर्मात चार धाम यात्रा, माता वैष्णवी यात्रा, अमरनाथ यात्रा इतर धार्मियांची ही मोठी तीर्थस्थळे आहेत. ज्येष्ठ नागरिकांना एकदा तरी ते जाण्याचा लाभ मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- जन्म प्रमाणपत्र,
- रेशन कार्ड,
- आधार कार्ड,
- रहिवासी प्रमाणपत्र,
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र,
- वैद्यकीय प्रमाणपत्र,
- पासपोर्ट आकाराचे फोटो,
- जवळील नातेवाईकांचा मोबाईल नंबर ,
- हमीपत्र.
अर्ज डाउनलोड कण्यासाठी येथे क्लिक करा- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन अर्ज
अर्ज करण्याची प्रक्रिया
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना साठी ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करायचा असेल तर यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे घेऊन पंचायत समिती कार्यालय मध्ये जावे लागेल तेथे भरलेला अर्ज व आवश्यक लागणारे कागदपत्रे सर्व जमा करावी लागतील आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.