अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) बांधकाम कामगारांना मिळणार घर

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)

     आज आपण या योजनेमध्ये अटल बांधकाम कामगार आवास योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दिनांक 30 ऑक्टोंबर, 2018 रोजीच्या बैठकीत ग्रामीण भागातील नोंदित (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागातस्वतःच्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

     बांधकाम कामगार आवास योजना ( ग्रामीण) योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगार त्यांचे हक्काचे घर बांधण्यासाठी किंवा घराचे नवीनीकरण/दुरुस्तीसाठी दोन लाख रुपये पर्यंत बांधकाम कामगार अनुदान देण्यात येत आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) माहिती

  अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)  योजनेअंतर्गत बांधकाम कामगारस त्यांच्या स्वतःचे हक्काचे घर बांधण्यासाठी बांधकाम कामगारास घराचे बांधकाम करण्यासाठी दोन लाख रुपये पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. तसेच अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगार असतात नवीन घर बांधण्यासाठी किंवा जुन्या कच्च्या घराचे पक्के घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये पर्यंत बांधकाम कामगारास अनुदान देण्यात येत आहे.

  अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)  योजनेअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आकडे नोंदणी असलेल्या ग्रामीण भागातील बांधकाम कामगार स्वतःच्या हक्काचे घर बांधण्यासाठी एक नवीन सुवर्णसंधी आहे. तर या सुवर्णसंधीचा लाभ पत्नी किंवा पतीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा जुन्या कच्चा घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी 1.50 लाख रुपये इतके अनुदान देण्यात येत आहे हे अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) पात्रता

  •  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) चा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करून घर बांधणीच्या पूर्ण तत्वाचा दाखला सादर केला आहे असे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अर्थसहाय्य मिळवण्यास पात्रता राहणार आहेत.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत (सक्रिय) असावा तथापि अर्ज करताना तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे अधिक, हा बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
  •  नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगाराचे स्वतःच्या पती/पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के (सिमेंट, वाळवणी बांधलेले) घर नसावे
  • . या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदित बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वतःच्या पती किंवा पत्नीच्या नावाने मालकीची जागा असणे आवश्यक आहे किंवा मालकीची कच्चे घर असलेल्या ठिकाणी बांधता येईल.
  •  बांधकाम कामगारांनी शासनाच्या इतर कोणत्याही गृह निर्माण योजनेचा लाभ घेतलेला असल्यास तो व्यक्ती या योजनेसाठी पात्रता असणार नाही.
  •  अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) प्रती कुटुंबासाठी आहे.
  •  या योजनेचा लाभ एकदा  घेतल्यानंतर बांधकाम कामगार पुनश्र: या योजनेच्या लाभास पात्र राहणार नाही.
  •  नोंदणीकृत (सक्रिय) बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.

अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे स्वरूप

   महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नांदेड (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी मंजूर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे(ग्रामीण) स्वरूप खालील प्रमाणे आहे.

  •  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडून नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या पती/पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी 1.50 लाख अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.
  •  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेच्या धर्तीवर (MGNREGA) अनुज्ञेय असणारी रू.18,000/- तसेच स्वच्छ भारत अभियान द्वारे शौचालय बांधण्यासाठी अनुज्ञेय असलेले रु.12,000/- असे एकूण रु.30000/-अनुदान रु.1.50 लाख मध्ये समाविष्ट असल्याने संबंधित योजनेचा दुसऱ्यांदा लाभ घेता येणार नाही.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) घराचे क्षेत्रफळ

  • पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत किमान 269 चौ. फुट इतके चटई क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे गरजेचे आहे  त्यासाठी रू.1.50 लाख एवढे अनुदान देण्यात येईल. पण मात्र, लाभार्थ्यास त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम स्वखर्चाने करण्यास मुभा राहील.
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घराची रचना
  •  पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी संपूर्ण बांधकाम विटा, वाळू वसीमिटाचे असणे आवश्यक आहे.
  •  लाभार्थी व्यक्तीने घरकुलामध्ये एक स्वयंपाक घर व बैठक हॉल याचा समावेश असावा.
  • शौचालय व स्नानघर बांधणे अनिवार्य राहील.
  •  जोत्यापासून घराची उंची कमीत कमी दहा फुटा असावी
  • या योजनेअंतर्गत छतासाठी स्थानिक गरजेनुसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंट पत्रे  अथवा कौलांचा वापर करण्यास मुभा राहील.
  •  या योजनेअंतर्गत घराच्या दर्शनी भागावर मंडळाचे  बोधचिन्ह (लोगो) लावणे गरजेचे आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकार्याने नांदेड बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची प्रत .
  •  लाभार्थी व्यक्तीचे आधार कार्ड.
  •  7/12 उतारा /मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र/ग्रामपंचायती मधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा
  •  लाभधारकाचे स्वतःच्या नावे कार्यरत असलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची छायांकित प्रत.
  •  प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र/प्रमाणित यादी.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  •  या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम बांधकाम कामगाराला आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जाऊन किंवा अधिकृत पोर्टलवरून अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
  •   या  योजनेचा अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी. त्यानंतर आवश्यक लागणारे सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज लाभार्थी व्यक्तीने आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करायचा आहे.
  • अशा पद्धतीने तुम्ची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

1 thought on “अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) बांधकाम कामगारांना मिळणार घर”

Leave a comment