आधार कार्ड मोफतअपडेट करण्यासाठी शेवटचे बारा दिवस, अधिकृत नोंदणी केंद्र कसं शोधायचं ते जाणून घ्या

आधार कार्ड मोफतअपडेट करण्यासाठी शेवटचे बारा दिवस, अधिकृत नोंदणी केंद्र कसं शोधायचं ते जाणून घ्या

   आपण आज या लेका मध्ये मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अधिकृत नोंदणी केंद्र कसे शोधायचं याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
ज्या कोणी व्यक्तींना आधार कार्ड अपडेट करायचे असेल त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे की मोफत आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर शेवटचे बारा दिवस शिल्लक राहिलेले आहेत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आधार कार्ड अपडेट

   आधार कार्ड (Aadhaar Card) धारकांना अनेक कारणासाठी आधार कार्ड अपडेट करावे लागते. प्रत्येकाची कारणे ही वेगवेगळी असतात. कोणा कोणाला त्यामधली माहिती दुरुस्ती करायची असते. तर काही जणांचा पत्ता बदललेला असतो. तर काही जणांच्या नावांमध्ये बदल झालेला असतो. तर, काही काही जणांची जन्मतारीख नोंदवायची राहून गेलेली असते. 

   यासाठी आधार कार्ड नोंदणी केंद्रामध्ये(Aadhaar Enrollment Centre)जाण्याची गरज असते. याशिवाय यूआयडीएआयन ज्यांचं आधार कार्ड 10 वर्षापेक्षा जुनं असलेल आहे त्यांना ते आधार कार्ड अपडेट करून घेणे बंधनकारक केलेली आहे.
   आधार कार्ड मधील बायोमेट् रिक डिटेल्स मोफत अपडेट करायची आहे त्यांच्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पण मात्र, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ज्या व्यक्तींना आधार कार्ड अपडेट करायचे आहे त्यांना आधार नोंदणी केंद्रात जावे लागेल. हे आधार नोंदणी केंद्र कसे शोधायचे आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत.

आधार नोंदणी केंद्र कसे शोधायचे आहे

   हे आधार नोंदणी केंद्र कसे शोधायचे आहेत त्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत.

  • तुम्हाला सर्वप्रथम यासाठी युनिक आयडेंटीफिकिशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या
    https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx या वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.
  • या वेबसाईटला भेट दिल्यानंतर आधार नोंदणी केंद्र शोधण्यासाठी राज्य, पोस्टल पिनकोड आणि सर्च बॉक्स या तीन पर्यायाचा वापर करता येईल.
  • राज्य हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला प्रथम राज्य निवडावे लागेल.
  • जो व्यक्ती ज्या राज्यामधील असेल त्या व्यक्तीला ते राज्य निवडावे लागेल
  • आधार कार्ड धारक हा महाराष्ट्र राज्यातील असल्यास त्या व्यक्तीला महाराष्ट्र निवडावे लागेल.
  • त्यानंतर जिल्हा, उपविभाग किंवा तालुका, गाव, शहर नोंदवा, त्यानंतर कायमस्वरूपी नोंदणी केंद्र दाखवा या  चेक बॉक्स वर क्लिक करावा लागेल,
  • यानंतर कॅप्चा कोण नोंदवून तुम्ही तुमच्या जवळच आधार नोंदणी केंद्र कोणत आहे ते पाहू शकतात.
  • पोस्टल पिनकोड पर्यायाचा वापर केल्यास तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा सहा अंकी पिनकोड आधारच्या वेबसाईटवर नोंदवावा लागेल.
  • यानंतर कॅप्चा क्रमांक नोंदवून आधार नोंदणी केंद्र शोधता येईल.
  • त्यानंतर सर्च बॉक्स हा पर्याय निवडल्यास तुम्हाला तुमच्या गावाच किंवा शहराच नाव नोंदवाव लागेल.
  • यानंतर कॅप्चा कोड नोंदवून तुम्हाला आधार नोंदणी केंद्र शोधता येईल.

महत्वाची माहिती

    ज्या व्यक्तीचे आधार कार्ड काढून 10 वर्षे पूर्ण झालेली असल्यास त्यातील माहिती आणि बायोमेट् रिक नोंदी अपडेट करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. यूआयडीएआयनं यासाठी मुदत वाढ दिलेली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीचे आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झालेली असतील तर त्या व्यक्तीने ते आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. यासाठी त्या व्यक्तीला वरील दिलेली माहिती आधार नोंदणी केंद्र कसे शोधायचे यासाठी उपयोगी पडेल.

दरम्यान, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अधिकृत केंद्रावर भेट देऊनचं आधार कार्ड मधील सर्व माहिती अपडेट करावी.

1 thought on “आधार कार्ड मोफतअपडेट करण्यासाठी शेवटचे बारा दिवस, अधिकृत नोंदणी केंद्र कसं शोधायचं ते जाणून घ्या”

Leave a comment