ई-पीकपाहणी राज्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ई – पीकपाहणी करण्याची आव्हान देण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची आपली ई – पीकपाहणी करायची राहिली असेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी. ज्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई, आणि विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ही ई – पीकपाहणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई – पीकपाहणी करून घ्यावी असे आव्हान करण्यात आलेले आहे.
ई-पीकपाहणी सर्व्हर डाऊन चा प्रॉब्लेम
ई-पीकपाहणी नोंदणीला ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात झालेली आहे परंतु ज्यावेळेस ई – पीकपाहणी सुरुवात झालेली होती त्यावेळेस सर्व्हर डाऊन चा प्रॉब्लेम येत होता. ज्यामुळे बऱ्याचश्या शेतकऱ्यांची ई – पीकपाहणी करायची राहून गेली. पण प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन सर्व्हर डाऊन चा प्रॉब्लेम सॉल केला आणि सर्व्हरची गती वाढवली. तरीपण ऑगस्ट पासून आतापर्यंत 55.75 टक्के शेतकऱ्यांनी आपली ई- पीकपाहणी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. परंतु राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई- पीकपाहणी करून घ्यावी.
ई पीक पाहणी 2024 -अशी करा आपल्या मोबाइल वरुन
उर्वरित शेतकऱ्यांसाठी ई-पीकपाहणी करण्याचे आव्हान
सर्व्हर डाऊन चा प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे ज्या शेतकऱ्यांची ई – पीकपाहणी करायची राहिली आहे. अशा शेतकऱ्यांची नोंदणी व्हावी, यासाठी सोमवार पर्यंत म्हणजे 23 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यासाठी राहिलेले शेतकऱ्यांनी ई – पीकपाहणी लवकरात लवकर करून घ्यावी असे आव्हान करण्यात आलेले आहे.
कृषी पतपुरवठा सुलभ होण्यासाठी शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग राहणे आवश्यक आहे. पण बऱ्याच वेळा असे होते की शेतकरी काही कारणामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे आपली नोंदणी वेळेवर पूर्ण करू शकत नाही . त्यामुळे परिणाम असा होतो की शेतकऱ्यांना गरज असताना पण योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई – पीकपाहणी ॲपच्या माध्यमातून ‘रियल टाईम क्रॉप डेटा’ संकलनासाठी ई – पीकपाहणी नोंदणी आवश्यक केलेली आहे.
मागच्या वर्षीची ई- पीक पाहणी
मागच्या वर्षी सोयाबीन अनुदानाचा लाभ देत असताना ई – पीक पाहणी नोंदणी खूप फायद्याची ठरलेली होती. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त शेतकरी ई – पीक पाहणी नोंदणी करण्याची शक्यता होती. परंतु शेतकऱ्यांचा यावर्षी तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण 5 लाख 15 हजार 833 शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे, त्यामध्ये सर्वाधिक साडेचार लाख हेक्टर वर कापूस आणि सव्वादोन लाख हेक्टर सोयाबीनचा पेरा आहे.
यावर्षीची ई – पीक पाहणी नोंदणी
यावर्षीच्या पेरणीची ई – पीक पाहणी नोंदणी एक जुलैपासून झाली. यावर्षीच्या नोंदणी प्रक्रियेला शेतकऱ्यांकडून तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. दीड महिन्यामध्ये फक्त 56.75 टक्के म्हणजे 2 लाख 84 हजार 233 शेतकऱ्यांच्या 5 लाख 4 हजार 99 हेक्टरची ई – पीकपाहणी नोंदणी ऑनलाइन झालेली आहे. आता राहिलेल्या शेतकऱ्यांकडे ई – पीक पाहणी ऑनलाइन नोंदणीसाठी सोमवार पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून घ्यावी, असे आव्हान महसूल विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे .
शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना
ई-पीकपाहणी नोंदणी प्रक्रियेत सुरुवातीला येणारा सर्व्हरचा प्रॉब्लेम. तसेच अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येत नाही. काही काही शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी नोंदणी कशी करायची हेच माहित नाही. अशा शेतकऱ्यांची मदत महसूल किंवा कृषी विभागाच्या तलाठी, मंडळ अधिकारी किंवा कृषी सहायकांनी करणे आवश्यक आहे .