डिझेल पंप अनुदान योजना शेती उपयोगासाठी

डिझेल पंप अनुदान योजना

नमस्कार मित्रांनो , महाराष्ट्र राज्यात राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. जास्तीत जास्त योजना तर शेतकऱ्यांसाठीच आहे जेणेकरून येणारी ही नवीन पिढी शेतीकडे आकर्षित व्हावे यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतीचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे जास्तीत जास्त लोक हे शेतीच करतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती करण्यात येते महाराष्ट्र राज्यात जास्तीत जास्त शेती ऊस, कापूस, सोयाबीन ,कांदा, मोसंबी, केळी ,डाळिंब, आंबा, चिकू, पेरू इत्यादी फळे आणि वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला या सर्व पिकांना पाण्याची गरज असते पण विजेच्या आनियिमत्तेमुळे तसेच ग्रामीण भागातील वाढत्या लोड शेडिंग मुळे शेतकऱ्यांना शेतात वेळेच्या वेळेवर पाणी देण्यात येत नाही त्यामुळे पिकाचे खूप मोठे नुकसान होते ते पीक वाळून जाते .

ग्रामीण भागामध्ये वाढत्या लोड सीडींग मुळे  शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी दिवसा वीज उपलब्ध नसते दिवसा वीज उपलब्ध नसल्याने रात्री वीज उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे शेतकऱ्याला अंधारात शेतात जावे लागते रानटी जनावराच्या भीतीने शेतकऱ्याला पिकाला पाणी देण्यासाठी मोठ्या समस्या निर्माण होतात. या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला नुकसान होते आणि शेतकऱ्याला खूप मोठा फटका बसतो या सर्व गोष्टीचा सरकारने विचार करून डिझेल पंप अनुदान योजना ही अमलात आणली .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:

या डिझेल पंप अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांना विहीर ,नदी ,तलाव पिकांना पाणी उपसा करून देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. राज्यातील बऱ्याचश्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध असते पण वीज नसते आणि जरी वीज असेल तरी वाढत्या लोड शेडिंग मुळे टिकत नाही त्यामुळे डिझेल पंप अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे.

या योजनेचा लाभ गरीब आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करणे परवडत नाही त्यामुळे डिझेल पंप अनुदान शेतकऱ्यांना शासनाकडून पंप खरेदीसाठी देण्यात येत आहे . चला तर आपण या लेखांमध्ये या योजनेचे लाभार्थी कोण आहे, पात्रता काय आहे, आवश्यक लागणारे कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत या सर्वांची माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.

ग्रामीण गोदाम योजना

हे पण वाचा:
Agriculture News Agriculture News :जमिनीची वाटणी झाल्यास सामूहिक 7/12 उताऱ्यातून वेगळा 7/12 उतारा कसा काढायचा ? पहा सविस्तर

डिझेल पंप अनुदान

 पाईप लाइन योजना

योजनेचे नावडिझेल पंप अनुदान योजना disel pump yojana
कोणामार्फत राबवली जातेमहाराष्ट्र शासनाद्वारे
विभागकृषि विभाग महाराष्ट्र
अर्ज प्रक्रियाऑफलाइन / ऑनलाइन
उद्देशशेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे
लाभ50 टक्के अनुदान
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
अधिकृत संकेतस्थळhttps://mahadbt.maharashtra.gov.in/

डिझेल पंप अनुदान योजना वैशिष्ट्य

  • डिझेल पंप अनुदान योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आलेली आहे.
  •  या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
  • डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल.
  •  डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात (DBT )च्या साह्याने जमा करण्यात येईल.
  •  या योजनेमुळे शेतकऱ्यांना विजेवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
  •  या योजनेची अर्ज करण्याची प्रोसेस ही ऑनलाइन पद्धतीची आहे त्यामुळे हा अर्ज तुम्हाला घरी बसल्या  मोबाईलच्या सहाय्याने करू शकतात.
  •  डिझेल पंप अनुदान  योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला कोणत्या सरकारी कार्यालयात पडणार नाही.

मोटार पंप अनुदान

हे पण वाचा:
KRUSHI SAMRUDH YOJANA शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी ‘कृषी समृद्धी’ योजना: हवामान बदलाच्या संकटातून बाहेर पडून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग: KRUSHI SAMRUDH YOJANA

डिझेल पंप अनुदान योजना लाभ

  •  डिझेल पंप अनुदान योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिला जाईल.
  •  या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतातील बोरवेल, विहीर, नदी, शेततळे यातून पाणी उपसा करण्यासाठी, शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी 50% अनुदान देण्यात येते.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा खूप मोठा लाभ होईल.

महात्मा फुले जन आरोग्य योजना

डिझेल पंप अनुदान योजनेची उद्दिष्ट

  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.
  • डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
  •  या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठी मदत होणार आहे.
  • राज्यातील विजेच्या आनियिमतातेमुळे शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यात येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते ते नुकसान कमी करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  •  डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विजेवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
  • डिझेल पंप अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांना डिझेल पंप खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याची गरज पडणार नाही.

डिझेल पंप अनुदान योजना पात्रता

  •  डिझेल पंप अनुदान योजनेसाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.

किसान विकास पत्र योजना

डिझेल पंप अनुदान

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana July Installment Ladki Bahin Yojana July Installment: लाडकी बहीण योजनेत बदल होणार? सर्व महिलांना पैसे मिळणार, शासनाचा नवीन निर्णय

ऊस तोडणी यंत्र अनुदान

डिझेल पंप अनुदान योजना अटी व नियम

  • डिझेल पंप अनुदान योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना घेता येईल.
  • डिझेल पंप अनुदान योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य बाहेरील शेतकऱ्यांना दिला जाणार नाही.
  •  या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आलेली आहे
  •  ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  •  शासनाकडून 50 टक्के अनुदान डिझेल पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येईल परंतु उर्वरित 50% रक्कम शेतकऱ्यांना स्वतःकडील जमा करावे लागेल.
  •  लाभार्थी शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
  •  लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक कार्ड आधार लिंक असणे आवश्यक आहे.

डिझेल पंप अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे

  1.  आधार कार्ड
  2.  रहिवासी प्रमाणपत्र.
  3.  मोबाईल क्रमांक
  4.  बँक खाते क्रमांक
  5.  राशन कार्ड
  6.  ई-मेल आयडी
  7.  पासपोर्ट आकाराचे फोटो
  8. 7/12 व 8 अ
  9. स्वयं घोषणापत्र
  10.  शेतकरी अनुसूचित जाती जमातीचा असल्यास प्रमाणपत्र
  11. डिझेल पंप खरेदी बिल

ट्रॅक्टर योजना 50 % अनुदान

डिझेल पंप अनुदान अर्ज रद्द होण्याची कारणे

  •  डिझेल पंप अनुदान योजनेसाठी अर्जदार महाराष्ट्र बाहेरील असेल तर अर्ज रद्द केला जाईल.
  •  अर्जदार व्यक्तींनी अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्तीने या अगोदर शासनाच्या कोणत्या योजनेतून डिझेल  पंपाचा लाभ घेतलेला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार शेतकऱ्यांच्या सातबारावर विहीर ,बोरवेल, शेततळे किंवा शेतामध्ये पाण्याची सुविधा नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.

डिझेल पंप अनुदान योजना अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाइन

हे पण वाचा:
Shet Rasta Kayda Shet Rasta Kayda :तुमच्या शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता पाहिजे? तर या पद्धतीने करा मागणी..!
  •  डिझेल पंप अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जिल्हा कार्यालयाच्या कृषी विभागात जावे लागेल.
  • कृषी विभागात जाऊन तेथून डिझेल पंप अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  •  त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
  •  परत नंतर तो अर्ज कृषी विभागात जमा करून त्याची पोच पावती घ्यावी.

अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाइन

  •  डिझेल पंप अनुदान योजनेसाठी सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  •  त्यानंतर होम पेजवर आधार कार्ड किंवा Username च्या साह्याने लॉगिन करावे लागेल.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये अर्धा करा वर क्लिक करावे लागेल
  •  अर्ज ओपन झाल्यानंतर अर्जात विचारलेले सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
  • माहिती भरल्यानंतर तो अर्ज सबमिट करावा लागेल.

अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

हे पण वाचा:
Ladki bahin yojna Ladki bahin yojna: या लाडक्या बहिणींचे लाड झाले 7 प्रकारच्या कारणामुळे बंद! जाणून घ्या काय आहे कारण?

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना

Leave a comment