महाराष्ट्र घरकुल योजना – राज्यात 10 लाख घरांना मंजूरी: असा करा अर्ज !

महाराष्ट्र घरकुल योजना : राज्यातील प्रत्येक नागरिकांना पक्के व हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी नवीन नाव नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेले आहे. घरकुल योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय असणाऱ्या कुटुंबांना स्वतःचे घर मिळणार आहे. राज्यातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने 20 लाख घरकुल मंजूर करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. या उद्दिष्ट नुसारच पहिल्या टप्प्यामध्ये दहा लाख घरांना मंजुरी दिली जाणार आहे. पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. योजनेमध्ये केलेले नवीन बदल आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लवकरात लवकर दर्जेदार घर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

महाराष्ट्र घरकुल योजना अनेक कुटुंबांना मिळणार लाभ

महाराष्ट्र घरकुल योजना केंद्रशासन देशातील प्रत्येक नागरिकांना घरकुल देण्यासाठी कटिबद्ध आहे. घरकुल योजनेबाबत सध्या सरकार खूप मोठ्या प्रमाणावर मिशन राबवत आहे. प्रत्येक राज्य शासनाकडून देखील विशेष प्रयत्न या योजनेसाठी केले जात आहेत. महाराष्ट्र राज्य शासन देखील या प्रयत्नामध्ये कुठेही कमी नाही. राज्यातील खऱ्या गरजू लाभार्थ्यापर्यंत घरकुल योजनेचा लाभ देण्याचे ध्येय शासनाने ठेवले आहे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनेमध्ये सहभाग नोंदवता यावा. याकरिता सेल्फ सर्विस ची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सरकारने हाती घेतलेले या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील तसेच देशातील प्रत्येक पात्र असणाऱ्या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

घरासाठी जागा देखील दिली जाणार

मागील काही वर्षापासून अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत लाभ वितरित केला. असताना त्यांना घरकुल बांधणीसाठी जागा उपलब्ध नसल्याच्या अडचणी शासनाच्या लक्षात आल्या. या अडचणीवर अनेक वेळा अधिवेशनात देखील चर्चा करण्यात आली. यावरच पर्याय म्हणून राज्य शासनाने ज्या नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशा नागरिकांना राज्य शासनाकडून जागा देखील वाटप केली जाणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Pradhan Mantri Awas Yojana Pradhan Mantri Awas Yojana: घरकुल संदर्भात मोठी खुशखबर! नवीन घरकुल सर्वेची मुदतवाढ

महाराष्ट्र घरकुल योजना राज्यातील पात्र असणाऱ्या घरकुल लाभार्थ्याकडे जर स्वतःची जमीन नसेल. अशा लाभार्थ्यांना गायरान जमीन, गावठान वाढ किंवा दीनदयाळ योजनेतून जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्य शासनाने आखलेले हे धोरण अत्यंत गरीब व पात्र कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या शासनाचा निर्णयाच्या माध्यमातून आतापर्यंत स्वतःच्या घराचे स्वप्न देखील न पाहिलेल्या नागरिकांना हक्काचे व पक्के घर मिळणार आहे.

वाढीव अनुदान घरांची गुणवत्ता वाढवणार

महाराष्ट्र घरकुल योजना मागील काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांना अतिरिक्त पन्नास हजार रुपये निधी वाटप करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या माध्यमातून घरकुल योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून अतिरिक्त 50000 रुपये निधी वितरित केला जाणार आहे. या वाढीव निधीच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे घर अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण होणार आहे. जास्तीची रक्कम लाभार्थ्यांना मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या घराचे गुणवत्ता सुधारली जाणार आहे. वाढती महागाई आणि मजुरांचा खर्च पाहता राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आता अतिरिक्त पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान घरकुल योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

लाभार्थी निवड पारदर्शकपणे

घरकुल मिळवण्यासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची निवड ही पारदर्शकपणे करण्याचे उद्दिष्ट शासनाने हाती घेतले आहे. पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पात्रता चाचणी करूनच होणार आहे. या योजनेमध्ये ज्या नागरिकांना पक्के घर उपलब्ध नाही किंवा जागा उपलब्ध नाही अशा नागरिकांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांची निवड करताना सामाजिक न्याय या तत्त्वांचा वापर केला जाणार आहे. यामधून राज्यातील अनुसूचित जाती/जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय गरीब सर्वसामान्य कुटुंबांचा विचार करून अशा लाभार्थ्यांना हा लाभ दिला जाणार आहे. लाभार्थी निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच पात्रता तपासणी पूर्ण केली जाणार आहे. ज्यामुळे खरच पात्र असणारे लाभार्थी यामध्ये निवड केले जातील. या शासनाच्या पारदर्शक पद्धतीमुळे खरंच गरजू व गरीब असणाऱ्या नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.

हे पण वाचा:
PM Awas Yojana PM Awas Yojana: तुम्हाला घर मंजूर झालं आहे की नाही? कसं चेक करणार? जाणून घ्या…

घरकुल योजना नाव नोंदणी

घरकुल योजनेमध्ये नाव नोंदणी (घरकुल सर्वे) करण्यासाठी आता ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यादी ग्रामपंचायतच्या माध्यमातून लाभार्थ्यांची यादी सादर केली जात होती. परंतु आता सरकारच्या पारदर्शकपणे निवड प्रक्रियेमुळे नागरिकांना आपले नाव नोंदवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करण्यासाठी नागरिकांना आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपला सेल्फ सर्वे करणे आवश्यक आहे. सेल्फ सर्वेच्या माध्यमातून नागरिक पात्र असतील तर त्या लाभार्थ्यांची नावे प्रपत्र ड यादीमध्ये समाविष्ट केले जाते.

सर्वे कसा करावा

घरकुल सर्वे करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये आवास प्लस 2024 आणि आधार फेस आरडी हे दोन मोबाईल ॲप इंस्टॉल असणे आवश्यक आहे. या दोन्ही ॲपच्या माध्यमातून आपण आपल्या राहत्या घराचा सर्वे करून शासनापर्यंत आपली माहिती पाठवू शकता. या माहितीच्या आधारे शासन निर्णय घेऊन पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देणार आहे. आवास प्लस 2024 या ॲपच्या माध्यमातून आपण आपला सेल्फ सर्विस पूर्ण करू शकता. सर्वे करण्याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहावा.

घरकुल सर्वेक्षण करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात

घरकुल संरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. घरकुल संरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे यांची यादी खालील प्रमाणे:-

हे पण वाचा:
gharkul survey last date gharkul survey last date: घरकुल सर्वेसाठी मिळाली मुदतवाढ आता या तारखेपर्यंत करता येणार सर्वे..!
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  • लाभार्थ्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार कार्ड.
  • लाभार्थ्याचे बँक पासबुक.
  • लाभार्थ्याचे जॉब कार्ड (रोजगार हमी योजना कार्ड).
  • लाभार्थ्याचा मोबाईल क्रमांक.
  • दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • फिटनेस प्रमाणपत्र (काही मोठा आजार असल्यास त्याचा पुरावा/ लागू असल्यास)
  • लाभार्थ्याच्या राहत्या घराचे फोटो.
  • लाभार्थ्याच्या घर बांधणी जागेचे फोटो.

1 thought on “gharkul survey last date: घरकुल सर्वेसाठी मिळाली मुदतवाढ आता या तारखेपर्यंत करता येणार सर्वे..!”

Leave a comment