मुख्यमंत्री योजना दूत ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात, येथे करा अर्ज

मुख्यमंत्री योजना दूत ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात, येथे करा अर्ज

   महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना मुख्यमंत्री योजना दूत योजनेअंतर्गत संधी दिलेली आहे. कामाच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

    योजना दूत ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या तरुणांना मुख्यमंत्री योजना दूत अर्ज करायचा असेल तर त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे अर्ज कसा करायचा या प्रक्रियेसंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.

योजना दूत ऑनलाइन अर्ज माहिती

   मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्रामध्ये युवकांसाठी खूप प्रसिद्ध झालेली आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यता विभागाने मुख्यमंत्री जल कल्याण कक्षा यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.

युवा प्रशिक्षण या योजनेची सुरुवात 9 जुलै 2024 रोजी करण्यात आलेली आहे. तसेच मुख्यमंत्री योजना दूत हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जलकल्याण कक्षा यांच्यामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी  योजना दूत हे प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी नेमले जाणार आहेत. तर आपण जाणून घेऊया या योजना दूतांचे काम काय आहे.

योजना दूतांना काय काम करावे लागेल?

     या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या योजना दूतांना योजना दूत म्हणून नियुक्ती  झाल्यानंतर  योजना दूतांना घरोघरी जाऊन महाराष्ट्र शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनेची माहिती पोहचविण्याचे काम करावे लागणार आहे. या कामासाठी योजना दूतांना दरमहा 10 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यानंतर नियुक्त कालावधी हा 6 महिन्याचा असणार आहे. या कालावधीमध्ये वाढ केली जाणार नाही. तसेच, सहा महिने योजनादूत म्हणून काम केल्यानंतर त्या व्यक्तीला महाराष्ट्र शासनाकडून प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्रामुळे भविष्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही मार्केटिंगचे काम मिळण्यास सोपे होईल. पण या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 दरम्यान असावे. योजना दूत ऑनलाइन अर्ज

योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  •   रहिवासी प्रमाणपत्र
  •   पदवी प्रमाणपत्र
  •   संगणक प्रमाणपत्र (MSClT) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

योजना दूत साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

  •  योजना दूत साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी योजना दूत च्या mahayojanadoot.org या वेबसाईटवर जा.
  • या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर उमेदवार नोंदणी असे नाव दिलेले असेल तेथे क्लिक करा.
  •  Accept the कन्सेंत येथे क्लिक करावे लागेल , आणि त्यानंतर आधार नंबर टाकावा लागेल. आणि खालील दिलेल्या बटनावर क्लिक करावे लागेल.
  •  त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती व्यवस्थित भरा. आणि Consent या बटनावर क्लिक करा. तुम्हाला एक OTP येईल तो ओटीपी टाका आणि रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक करा.
  •  आता तुमच्यासमोर नवीन एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही अगोदर भरलेली सर्व माहिती दिसेल ती एकदा चेक करून घ्या.
  •  सर्व माहिती चेक करून घेतल्यानंतर खाली तुम्ही शाळा सोडलेला दाखला. टाकून घ्या. आणि खालील दिलेल्या शिक्षणाविषयी माहिती व्यवस्थित भरून घ्या.
  •  व्यवस्थित माहिती भरून घेतल्यानंतर आवश्यक लागणारे डॉक्युमेंट अपलोड करा.
  •  डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही योजना दूत या योजनेचा अर्ज भरू शकतात.

Leave a comment

Close Visit Batmya360