शेतकरी ओळखपत्र: शेतकऱ्यांनो शेतकरी ओळख पत्र काढले का ? येथे पहा शेतकरी ओळखपत्र यादी.

शेतकरी ओळखपत्र केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व शेतकरी उपक्रम राबवण्यासाठी देशात ऍग्री स्टॅक योजना राबवण्याचे धोरण आखले. या योजनेचे अंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक क्रमांक वितरित केला जाईल. ज्या क्रमांकाच्या साह्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती पासून निर्माण झालेले नुकसान झालेल्या पिकाचे मिळणारे अनुदान, पिक विमा योजना, शासकीय योजनेचे लाभ, पिकांची हमीभावाने विक्री.

यासारख्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकरी ओळख पत्र बंधनकारक करण्यात आले. या ओळखपत्राच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना लाभ वितरित करणे अत्यंत सोयीचे होणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
शेतकरी ओळखपत्र

देशातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळख पत्र काढणे बंधनकारक आहे. यापुढे शेतकरी ओळख पत्र असेल तरच शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित केला जाईल. ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख पत्र उपलब्ध नसेल अशा शेतकऱ्यांना शासकीय योजने अंतर्गत मिळणारा लाभ देखील बंद करण्यात येणार आहे.

शेतकरी ओळखपत्र कोठे काढावे

शेतकरी ओळख पत्र काढण्यासाठी प्रत्येक राज्याने आपापले संकेत स्थळ निर्माण केले आहे. या संकेतस्थळावर जाऊन आपण आपल्या शेतकरी ओळख पत्र काढू शकता. त्यासोबतच आपल्या जवळील सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन देखील आपण आपले शेतकरी ओळखपत्र काढू शकता. शेतकरी ओळख पत्र काढण्या करिता आपल्यासोबत आपले आधार कार्ड, आपल्या जमिनीचा आठ अ , आपला मोबाईल नंबर इत्यादी माहिती आवश्यक आहे.

असे काढा शेतकरी ओळखपत्र

अशी पहा गावातील शेतकरी ओळखपत्र काढलेले शेतकऱ्यांची यादी

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी फार्मर आयडी करिता ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत आपल्या गावातील किती शेतकऱ्यांचे फॉर्म आयडी कार्ड तयार झाले आहेत याची माहिती खालील प्रमाणे पहा.

  • सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • त्यानंतर आपल्याला वर लॉगिन विथ सीएससी हा पर्याय दिसेल.
  • लॉगिन विथ सीएसी या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला सीए सीआयडी व पासवर्ड इंटर करावा लागेल.
  • त्यानंतर आपल्यासमोर रिपोर्ट हा पर्याय दिसून येईल
  • रिपोर्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडावा लागेल.
  • तालुका निवडल्यानंतर आपल्याला आपले गाव निवडावे लागेल
  • गाव निवडल्यानंतर आपल्याला आपल्या गावातील शेतकरी ओळख पत्र काढलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होईल.
  • ही यादी आपण डाउनलोड देखील करू शकता.

Leave a comment

Close Visit Batmya360